कंगना रानौवत यांची मुख्य भूमिका असलेला आणि त्यांची सहनिर्मिती असलेला ‛Emergency’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा चित्रपट भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1975 मध्ये लागू केलेल्या आणीबाणीवर बेतलेला आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत म्हणजे पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत आपल्याला कंगना रानौवत पहायला मिळणार आहेत. पण हा चित्रपट सेन्सरच्या कचाट्यात सापडला आहे या चित्रपटाला सेन्सरने मान्यता दिली नसून काही सिन कट करायला सांगितले होते. सेन्सर बोर्डाने ‛Emergency’ या चित्रपटात एकूण 13 बदल सुचवले आहेत. आधी कंगना रानौवत यांनी म्हंटले होते की त्या या चित्रपटात कोणताही बदल करणार नाहीत पण आता त्या सेन्सरने सुचवलेले बदल करायला तयार झाल्या आहेत.
शीख समाजाने घेतला होता आक्षेप
या चित्रपटातल्या काही सीन्सवर शीख समाजाने आक्षेप घेतला होता. शीख गटांनी या चित्रपटात त्यांच्या समाजाचे चुकीचे चित्र उभे केल्याचा आरोप केला होता. कंगनाच्या ‛Emergency’ चित्रपटात एका बससमोर शीख नसलेल्यांच्या गटावर शीख लोक गोळीबार करतानाचा सीन आहे. ज्यावर शीख समाजाने आक्षेप घेतला होता. ज्यामध्ये त्यावेळच्या वाढत्या फुटीरतावादी खलिस्तान चळवळीतील प्रमुख व्यक्तिमत्त्व जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांच्याशी संवाद साधण्यापर्यंत यादी आहे. हे सीन कट करून चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो असे सेन्सर बोर्डाने उच्च न्यायालयामध्ये सांगितले आहे.
कोणते आहेत हे सीन आणि सूचना?
Emergency चित्रपटाच्या सुरवातीला सत्यते बाबत ‛ही घटनांची नाट्यमय आवृत्ती आहे.’ असे डिस्क्लेमर द्यावे
CBFC च्या समितीने चित्रपटाच्या सुरवातीलाच सूचना द्यायला सांगितली आहे. ती म्हणजे की, आम्ही प्रेक्षकांना स्पष्ट करू इच्छितो की, ही घटनांची नाट्यमय आवृत्ती आहे.” जेणे करून तेथे सादर केलेली प्रत्येक गोष्ट परिपूर्ण सत्य आहे म्हणून घेतले जाणार नाही.
पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आसमला भारतातून तोडले त्याचे पुरावे सादर करावेत
Emergency चित्रपटाच्या सुरवातीला पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी आसामला भारतापासून तोडले आहे. या वस्तुस्थितीचा इशारा देताना ऐकले आहे. बोर्डाने चित्रपट निर्मात्यांना या माहितीचा वास्तविक स्रोत दाखवण्यास सांगितले आहे.
भिंद्रनवाला आणि संजय गांधी यांच्यात जर करार झाला तर त्याचे पुरावे दाखवा अन्यथा सीन कट करा
त्यानंतर चित्रटात 1 तास 52 मिनिटांनी भिंद्रनवाले संजय गांधींना तुमच्या पक्षाला मते हवी आहेत, आम्हाला खलिस्तान हवा आहे. असे म्हणताना दिसते. त्यामुळे सीबीएफसीने हा संवाद काढून टाकण्यास सांगितले आहे. कारण भिंद्रनवाले आणि संजय गांधी यांच्यात खरंच असा काही करार झाला होता का? हे निश्चितपणे माहीत नाही. आणि तसा करार झाला असेल तर या दाव्याचे समर्थ करणारे पुरावे सादर करा अन्यथा हा सीन चित्रपटातून कट करा असे सांगण्यात आले आहे.
भिंद्रनवालाचे नाव तीन सीन मधून काढून टाका
त्याच बरोबर भिंद्रनवाले यांचे नाव कमीत कमी तीन सीन मधून काढून टाकावे असे सुचवण्यात आले आहे. ज्यामध्ये भिंद्रनवालेचे पात्र सीनमध्ये नाही पण इतर व्यक्तींमधील संभाषणात नावाची चर्चा केली जात आहे. त्यामुळे ज्या संभाषणातमध्ये त्याचे नाव आहे ते सीन काढून टाकण्याची सेन्सर बोर्डाने विनंती केली आहे.
शिखांनी केलेल्या हिंसाचाराची दृश्य कमी करा
बोर्डाने चित्रपट निर्मात्यांना चित्रपटात 2 तास 11 मिनिटांच्या एका दृश्यात शीखांनी बिगर शीखांच्यावर केलेल्या हिंसाचाराची दृश्ये कमी करायला सांगितले आहे.ज्यामध्ये शीख बसमोर बिगर शीखांवर गोळी झाडताना दिसत आहेत. या चित्रपटाच्या विरोधात निवेदन करणाऱ्या शीख गटांना आक्षेपार्ह आढळलेल्या सीन पैकी हा एक आहे.
Emergency चित्रपटात इंदिरा गांधी आणि तत्कालीन लष्करप्रमुख ऑपरेशन ब्यु स्टारबद्दल चर्चा करतात तो सीन काढा
चित्रपटात 2 तास 12 मिनिटांच्या सीनमध्ये इंदिरा गांधी आणि तत्कालीन लष्करप्रमुख ऑपरेशन ब्यु स्टारवर चर्चा करताना दिसत आहेत. CBFC ने चित्रपट निर्मात्यांना अर्जुन दिवसचा संदर्भ काढून टाकायला लावले आहे.
चित्रपटात जिथे वास्तविक फुटेज घेतल्या आहेत इथे डिस्क्लेमर टाका
बोर्डाची इच्छा आहे की, चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटात वापरल्या जाणाऱ्या वास्तविक फुटेजसाठी, जेथे लागू असेल तिथे डिस्क्लेमर टाकावेत. असे सांगितले आहे.
चित्रपटात नमूद केलेली आकडेवारी आणि विधाने यांचे पुरावे दाखवावेत.
Emergency चित्रपट निर्मात्यांना चित्रपटात नमूद केलेल्या सर्व आकडेवारी, विधाने आणि संदर्भांसाठी कागदोपत्री पुरावे सादर करण्यास सांगितले आहे.
हे आठ प्रमुख बदल करून चित्रपटला मान्यता दिली जाणार होती आणि छोटे मोठे पाच म्हणजे एकूण तेरा बदल करून चित्रपट प्रदर्शित व्हावा असे स्पष्टपणे सेन्सर बोर्डाने सांगितले होते. आणि 30 सप्टेंबर रोजी न्यायालयात चित्रपट निर्माते हे सर्व बदल करण्यास तयार असल्याचे सेन्सर बोर्डाने सांगितले. कंगना रानौवत यांचा हा चित्रपट प्रदर्शना आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला असून आता इतके बदल केल्यानंतर चित्रपटाची हवा तर जाणार नाही ना हा देखील प्रश्न आहेच.