Eknath Shinde – राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे आणि विद्यमान सरकार बरेच निर्णय घेत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. आणि या बैठकीत eknath shinde यांनी विविध विभाग अंतर्गत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. शालेय विभागाअंर्तगत राज्यात विशेष शिक्षक पदाची निर्मिती केली जाणार असून या अंतर्गत 4860 पदांची मेगा भरती केली जाणार आहे. तर गृह विभागाकडून राज्यातील होमगार्डच्या भत्त्यात भरीव वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सुमारे 40 हजार होमगार्डना लाभ मिळणार आहे.
आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय झाले निर्णय?
आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली असून विविध विभागांअंतर्गत eknath shinde यांच्याकडून महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत त्यातलेच काही महत्त्वाचे निर्णय पुढील प्रमाणे आहेत.
नियोजन विभाग
- ग्राम रोजगार सेवकांना आता महिन्याकाठी 8000 रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान.
- आर्य वैश्य समाजासाठी श्री वासवी कन्यका आर्थिक विकास मंडळ
नगर विकास विभाग
- ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामात गती देणार. 12 हजार 200 कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता.
- ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गासाठी 15 हजार कोटी कर्जरूपाने उभारणार.
- रमाबाई आंबेडकर नगर, कामराजनगर झोपडपट्टी पुर्नवसन योजनेला गती देणार. एमएमआरडीएला जमीन अधिमूल्य भरण्यास सवलत.
- ऑरेंज गेट ते मरिन ड्राईव्ह भुयारी मार्गाच्या कामास गती देणार. एमएमआरडीएला बिनव्याज दुय्यम कर्ज सहाय्य देण्यास मान्यता
पशुसंवर्धन विभाग
- देशी गाईंच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना
क्रीडा विभाग
- भारतातील खेळ प्राधिकरणाला आकुर्डी, मालाड व वाढवण येथील जागा नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणार
महसूल विभाग
- रसायन तंत्रज्ञान संस्थेस ठाणे येथील मौजे खिडकाळीची जागा देणार.
- महसूल उत्पन्न वाढवण्यासाठी मुद्रांक अधिनियमात सुधारणा.
- मेट्रो तीन प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मुद्रांक शुल्काला सवलत
- कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ. अनुकंपा धोरणही लागू. धुळ्याच्या बीएपीएस स्वामीनारायण संस्थेस ग्रामस्थांच्या विकासासाठी जमीन
जलसंपदा विभाग
- लातूर जिल्ह्यातील हासाळा, उंबडगा,पेठ, कव्हा कोल्हापूर बांधाऱ्याच्या कामास मान्यता.
- राज्य जलसंपत्ती माहिती केंद्र स्थापणार. जलस्रोतांचे उत्तम नियोजन करणार.
- जळगाव जिल्ह्यातल्या भागातून उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता. 30हजार हेक्टर जमीन सिंचत होणार.
इतर मागास बहुजन कल्याण महामंडळ
- सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ
- जामखेड पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सूत गिरणीला अर्थसहाय्य करणार
- बार्टीच्या धर्तीतीवर वनार्टी स्वायत्त संस्था.
कृषी विभाग
- अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी कृषी स्वावलंबन योजनेचे आर्थिक निकष वाढवले, अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ होणार.
- डाळींच, सीताफळ इस्टेट उभारणार उत्पादकांना मोठा लाभ.
गृहनिर्माण विभाग
- केंद्राच्या मिठागाराच्या जमिनी राज्य शासनाकडे हस्तांतरित करणार. दुर्बलांसाठी घरांच्या योजनांना वेग येणार.
- धारावीतल्या आपात्र झोपडीधारकांसाठी परवडणारी भाडेतत्त्वावरील घरे योजना, धरावी पुनर्वसन प्रकल्पावर जबाबदारी
बंदरे विभाग
- पालघर जिल्ह्यातील मुरबे येथे बहुउद्देशीय बंदर प्रकल्प जेएसडब्यू इन्फ्रास्ट्रक्चर विकासक.
वित्तीय विभाग
- सेवानिवृत्ती उपदान, मृत्यू उपदानाची मर्यादा वाढवून 20 लाख
- शासन हमी शुल्काचा दर कमी करण्याचा निर्णय. हमी शुल्क माफी मिळणार नाही.
ग्रामविकास विभाग
- जिल्हा परिषदेतील 2005 नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना एक वेळ पर्याय.
उद्योग विभाग
- पंचगंगा नदी प्रदूषणासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अद्यावत करणार
शालेय विभाग
- राज्यात विशेष शिक्षक पदाची निर्मिती. 4860 पदे निर्माण करणार.
- राज्यात सैनिकी शाळांसाठी आता सुधारित धोरण.
विधी व न्याय विभाग
- श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर समितीवरील सदस्यांची संख्या वाढवून 15 केली जाणार.
वैद्यकीय शिक्षण विभाग
- अवयव दान व अवयव प्रत्यारोपणासाठी यंत्रणा. जनजागृतीवर भर.
- नाशिकचे वैद्यकीय पदवी महाविद्यालय व रुग्णांलय शासनाच्या अखत्यारीत घेणार.
- आयुर्वेद, युनानी महाविद्यालयातील पदभरतीसाठी निवड समिती.
कौशल्य विकास
- राज्यातील आणखी 26 आयटीआय संस्थांचे नामकरण
सामान्य प्रशासन विभाग
- अधिसंख्या कर्मचाऱ्यांचा एक दिवसांचा तांत्रिक खंड क्षमापित.
- माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल स्वीकारला.
गृह विभाग
- राज्यातील होमगार्डच्या भत्त्यात भरीव वाढ. सुमारे 40 हजार होमगार्डना लाभ.
मुख्यमंत्री eknath shinde यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
मुख्यमंत्री eknath shinde यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 38 निर्णयांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यात बऱ्याच विभागीतल महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सगळ्यात मोठा निर्णय शालेय विभागासाठी घेण्यात आला असून राज्यात विशेष शिक्षकांची 4860 पदे निर्माण करून शिक्षकांची मेगा भरती होणार आहे. तसेच कोतवालपदाच्या वेतनात भरघोस वाढ करण्यात आली आणि होमगार्ड यांचा भत्ता देखील वाढवण्यात आला आहे. वैद्यकीय आणि तांत्रिक शिक्षणाबाबत देखील महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले. तसेच ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी 12 हजार 200 कोटी सुधारित निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. कृषी आणि गृह निर्माण विभागासाठी देखील चांगले निर्णय घेतल्याचे आपल्या लक्षात येते.
ऐकून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर eknath shinde सरकारने आजच्या बैठकीत ठोस आणि लोकांच्या नजरेत भरतील असे निर्णय घेतले आहे. जेणे करून त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत या निर्णयांचा फायदा होईल.