Taarak Mehta ka ooltah chashmah: सर्वांचे निखळ मनोरंजन करणारी तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका सध्या जोरदार चर्चेत आहे. या मालिकेत Sonu Bhide च्या भूमितेक काम करणारी Palak Sindhwani ने मालिकेचा निरोप घेतला आहे. मालिकेच्या निर्मात्यांनी तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची तयारी केली आहे तर दुसरीकडे पलकने निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका जवळजवळ १७ वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. यातील पात्रे, प्रसंग सर्वकाही प्रेक्षकांना आपले वाटतात. बहुतांश भारतीयांच्या घरी तारक मेहता मालिका पाहता पाहता रात्रीची जेवणे होतात आणि सर्व कुटुंबीय एकत्रित बसून याचा आनंद घेतात पण आता ही मालिका वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. काही वर्षांपासून एकापाठोपाठ एक कलाकार ही मालिका सोडून जात आहेत.
आत्ताच आलेल्या बातमीनुसार नुकतेच Sonu Bhide
प्रोडक्शन हाऊसचे म्हणणे
पिंकविला मधून मिळालेल्या माहितीनुसार, या निवेदनात निला टेलेफिल्म्सने म्हणले आहे की, Palak Sindhwani ने कराराचे उल्लंघन केले आहे. तिने शो मध्ये काम करत असतानाच इतर ठिकाणीही काम केल्याने प्रोडक्शन हाऊसचे नुकसान झाले. यासाठी तिला अनेकवेळा ताकीद देण्यात आली होती तरीही तिने नियमांचे उल्लंघन केल्याने निर्माते नाराज झाले आणि तिला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली.
Palak Sindhwani चा निर्मात्यांवर मानसिक छळाचा आरोप
Palak Sindhwani नी आणि तिच्या टीमने एक लांबलचक स्टेटमेंट जारी केले आहे ज्यात त्यांनी तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतील काही धक्कादायक खुलासे उघडकीस आणले आहेत. पलकने मालिकेच्या निर्मात्यांवर मानसिक छळ केल्याचा आरोप आहे असे टाइम्स नाऊच्या प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार समोर आले आहे.
अभिनेत्री पलकने केलेल्या दाव्यानुसार १४ सप्टेंबर रोजी तिला सेटवर पॅनिक अटॅक आला होता त्यामुळे तिला डॉक्टरांकडे जावे लागले होते. या अटॅक नंतर डॉक्टरांनी तिला बेड रेस्ट घेण्याचा सल्ला दिला होता आणि तरीही तिला निर्मात्यांनी सीन करायला भाग पाडले असे पलकने आपल्या दाव्यात म्हणले आहे.
एवढेच नव्हे Palak Sindhwani ने आपल्या निवेदनात म्हणले आहे की निर्मात्यांनी तिच्यावर जे काही आरोप केले आहेत ते सर्व खोटे आहेत. तिने सांगितले की, २०१९ मध्ये जेव्हा तिला तारक मेहता का उलटा चष्मा या शोसाठी सोनुची भूमिका साकारण्यासाठी ऑफर देण्यात आली तेव्हा तिच्याकडून एका करारावर स्वाक्षऱ्या करून घेण्यात आल्या. तिच्या म्हणण्यानुसार तिला करार वाचण्यास वेळही दिला गेला नाही. तिने जेव्हा प्रोडक्शन हाऊस कडून कराराची प्रत मागून घेतली तेव्हाही तिला ती देण्यात आली नाही आणि प्रत देण्यास नकार देण्यात आला.
Palak Sindhwani ची कमाई देखील बुडवली
सोनू अर्थात पलक सिंधवानीने आपल्या निवेदनात पुढे असेही सांगितले आहे की तिची निर्मात्यांसोबत १८ सप्टेंबर रोजी एक बैठक झाली होती. ती या शोचा भाग असूनही जाहिरातीत काम करत होती आणि हे कराराचे उल्लंघन आहे असे त्यांनी तिला सांगितले होते.
या बैठकीत तिला तिचे करिअर उद्ध्वस्त करू, तिचे सोशल मीडिया अकाऊंट बंद करू अशी धमकीही दिली गेली होती. या बैठकीनंतरच तिला मानसिक धक्का बसला आहे. एवढेच नाही तर तिने पुढे म्हणल्याप्रमाणे तिला आजपर्यंत तिची २१ लाखांपेक्षा अधिक असलेली थकबाकी अजूनही देण्यात आलेली नाही. पलक सिंधवानीने केलेल्या या आरोपांवर अद्याप निर्मात्यांनी काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही.
यावर पलकच्या टीमने असे सांगितले आहे की, पलकने तारक मेहता का उलटा चष्मा या शोमध्ये पाच वर्ष काम केले आहे. तिने ८ ऑगस्ट रोजी निर्मात्यांना शो सोडणार असल्याचे कळवले तेव्हा त्यांनी तिला राजीनामा देण्यासाठी ऑफिशियल मेल आयडी देऊ असे सांगितले पण तो काही तिला दिला गेला नाही. तसेच तिने केलेल्या कामाची कल्पना निर्मात्यांना होती आणि त्यांनी परवानगी देखील दिली होती अशी माहिती पलकने दिली आहे.
E times सोबत बोलताना Palak Sindhwani चे वक्तव्य
ETimes शी बोलताना पलक म्हणाली, “त्यांनी माझ्याशी कोणत्याही एक्सक्लुझिव्हिटी कॉन्ट्रॅक्टवर कधीही चर्चा केली नाही पण मी ऑगस्टमध्ये शो सोडण्याची इच्छा व्यक्त करताच शोषण सुरू झाले. त्यांना वाटले की मी मे पर्यंत निघून जाण्यासाठी थांबणार नाही म्हणून त्यांनी माझ्याशी अन्यायकारक वागणूक सुरू केली. जेव्हा त्यांनी माझ्यावर कराराचा भंग केल्याचा आरोप केला तेव्हा शोषण शिगेला पोहोचले. मीडिया रिपोर्ट्सचा माझ्यावर परिणाम झाला पण मी गप्प बसले नाही. मी अधिकृतपणे राजीनामा कधी देऊ शकते असे विचारत राहिले. भावनिकदृष्ट्या मला त्रास होत होता आणि त्याचाच मानसिक परिणाम माझ्यावर झाला होता. मी माझ्या मेकअप रूममध्ये रडत असे.”
प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणाऱ्या कलाकारांनी याआधीही निर्मात्यांवर गंभीर आरोप करून मालिका सोडली आहे आणि निर्माते अडचणीत आले आहेत. आता यावर निर्माते आणि कलाकार नक्की काय पावले उचलतील हे महत्त्वाचे ठरेल.