आता पुन्हा आपल्या भेटीला Bhool Bhulaiyaa 3 हा चित्रपट 1 नोव्हेंबर रोजी येणार असून त्यात पुन्हा आपल्याला मोंजोलिकाच्या भूमिकेत विद्या बालन दिसणार आहे याचा टिझर नुकताच लॉन्च झाला आहे.
2007 मध्ये आलेला भूलभुलय्या चित्रपट आणि त्यातली विद्या बालन हिने मोंजोलिकाची साकारलेली अंगावर काटे आणि काळजाचा थरकाप उडवणारी भूमिका तुम्हाला आठवतच असेल. त्यातले ‛ आमी जे तोमार..’ हे गाणे आणि विद्या बालनचा उत्कृष्ट अभिनय तर विसरणे शक्यच नाही. या चित्रपटत विद्याबालन, शायनी आहुजा आणि अक्षय कुमार यांच्या मुख्य भूमिका होत्या. त्यानंतर भुलभुलैय्या दोन 2022 मध्ये आला त्यात तब्बूने केलेली भूमिका लक्षात राहिली.
पुन्हा ऐकू येणार ‘आमी जे तोमार
‛ आमी जे तोमर’ हे गाणे कानावर पडले की आपल्याला आठवते ती विद्या बालन आणि तिचा उत्कृष्ट नाच आणि अंगावर काटे आणणारा अभिनय. भुलभुलैय्याचा पहिला भाग 2007 मध्ये आला होता. त्यात अक्षय कुमार,शायनी आहुजा आणि विद्या बालन यांच्या मुख्य भूमिका होत्या. अगदी सुंदर भयपट म्हणून भुलभुलैय्या चित्रपट आपल्या चांगलाच लक्षात आहे.
त्यानंतर 2022 मध्ये आला ‛भुलभुलैय्या दोन’ हा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला त्यात अक्षय कुमारची जागा घेतली कार्तिक आर्यनने तर विद्याबालनची जागा घेतली तब्बूने यात कार्तिक आर्यनची हिरोईन म्हणून कियारा अडवाणीने काम केले आहे. हा सिक्वेल ही एक उत्कृष्ट भयपट म्हणून लोकांच्या पसंतीस उतरला होता.
आता येत आहे याच सिक्वेलचा पुढचा भाग Bhool Bhulaiyaa 3 या चित्रपटाचे टिझर नुकतेच लॉन्च झाले आहे. त्यात आपल्याला पुन्हा एकदा कार्तिक आर्यन रुह बाबाच्या भूमिकेत दिसून येत आहे तर विद्या बालन आपल्याला पुन्हा एकदा मोंजोलीकाच्या भूमिकेत पाहायला मिळतेय तर कार्तिक आर्यनच्या प्रेमिकेच्या भूमिकेत तृप्ती डिमरी दिसत आहे.
काय आहे नेमका टिझर?
पुन्हा एकदा ‛आमी जे तोमार’ गाणे ऐकायला मिळते तर विद्या बालन पुन्हा आपल्याला भुताची भूमिका करताना दिसणार आहे. पुन्हा एक महाल आणि त्यात असणारा बंद दरवाजा. कार्तिक आर्या म्हणत आहे की ‛ क्या लगा आपको की कहानी खत्म हो गई? दरवाजे बंद होते है फिरसे खुलने के लिए!’ टिझर तसा घाबरगुंडी उडवणारा आहे. पहिल्या भुलभुलैय्या मध्ये जसा विद्या बालन एका हाताने खाट उचलताना दिसते. तसेच या सिक्वेलमध्ये विद्या बालन एका हाताने सिंहासन उचलताना दिसत आहे. ती रागाने म्हणताना दिसते की ‛ कितनी बार मुझसे मेरा सिंहासन छीनोगे?’ तिचा तो भयंकर अवतार पाहून आपल्याला भीती वाटल्या शिवाय राहत नाही. आणि पुन्हा एकदा कार्तिक आर्यन हा रुह बाबा म्हणजे भूते पळणाऱ्या व्यक्तीच्या भूमिकेत दिसतो. यावेळी रक्त पाहून आत्मा बाहेर पडताना दिसून येतो. तसेच कार्तिक आर्यन आणि तृप्ती डिमरीचे काही रोमँटिक सिन देखील आपल्याला टिझर मध्ये पहायला मिळतात. या चित्रपटात माधुरी दीक्षित झळकणार असल्याची जोरदार चर्चा होती पण टिझरमध्ये ती कुठेच दिसत नाही.
Bhool Bhulaiyaa 3 चे उत्कृष्ट एनिमेशन
Bhool Bhulaiyaa 3 च्या टिझरमध्ये एनिमेशन देखील उत्कृष्ट प्रकारचे असलेले आपल्या लक्षात येते आणि नेमकी चित्रपटाची कथा काय असेल आता विद्या बालन म्हणजे मोंजोलिकाचा त्या महालाशी काय संबंध असेल? कार्तिक आर्यन या वेळी रुह बाबाच्या भूमिकेत काय कमाल करणार आहे? आणि काय असेल या मोंजोलिकाची कहाणी? हे सगळे प्रश्न डोक्यात पिंगा घालायला लागतात आणि चित्रपट पाहण्याची उत्सुकता आपल्याला लागून राहते.
‛Bhool Bhulaiyaa 3’ या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद आकाश कौशिक यांनी लिहले असून अनिस आज्मी हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. हा चित्रपटाचा तिसरा भाग असून कॉमेडीपेक्षा हॉरर असल्याचं टिझरवरून आपल्या लक्षात येते. ‛भुलभुलैय्या दोन’ बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. कोरोनाच्या कठीण काळात हा चित्रपट रिलीज झाला असून सुद्धा या चित्रपटाने 185 कोटींचा गल्ला जमवला होता.
Bhool Bhulaiyaa 3 आणि Singham Again होणार टक्कर
पण यावेळी मात्र ‛ Bhool Bhulaiyaa 3’ च्या समोर ‛सिंघम अगेन’ हा चित्रपट असल्यामुळे बॉक्स ऑफिसवर दोन्ही चित्रपटाची काटे की टक्कर असणार आहे. ‛सिंघम अगेन’ हा रोहित शेट्टी यांच्या सिंघम या एक्शन चित्रपटाच्या फ्रेंचायजीचा चौथा भाग आहे. पहिल्या ‛ सिंघम’ मध्ये अजय देवगण याची मुख्य भूमिका होती तर नंतरच्या ‛सिंम्बा’ मध्ये मुख्य भूमिकेत रणवीर सिंग होता तर ‛ सूर्यवंशी ’ मध्ये अक्षय कुमार यांनी अभिनय केला होता. आता ‛ सिंघम अगेन्स’ मध्ये पुन्हा अजय देवगण दिसणार आहे. आता या दोन चित्रपटांपैकी प्रेक्षकांना कोण खेचून आणते आणि कोणता चित्रपट बाजी मारतो हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
इतक्या वर्षानंतर देखील विद्या बालन तिचं मोंजोलिका उभी करू शकेल का? कार्तिक आर्यन पुन्हा त्याची कमाल दाखवू शकेल का? आणि हा हॉरर चित्रपट प्रेक्षकांना भीती दाखवून लोकांची माlने जिंकू शकेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आपल्याला मात्र 1 नोव्हेंबरची वाट पहावी लागणार आहे.