Lata Mangeshkar यांच्या जयंती निमित्त जाणून घेऊया त्यांचा संगीत प्रवास, पारितोषिके आणि त्यांची संपत्ती

By Pratiksha Majgaonkar

Published on:

Lata Mangeshkar
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लता मंगेशकर:- Lata Mangeshkar नाव हे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच परिचयाचे. गानकोकिळा लता दीदी या सर्वांच्या लाडक्या आणि आवडत्या गायिका म्हणून प्रसिद्ध होत्या आणि आजही त्यांची स्मृती प्रत्येकालाच आहे. २८ सप्टेंबर हा दिवस म्हणजे Lata Mangeshkar यांचा जन्मदिवस म्हणजेच जयंती. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याबद्दल थोडी माहिती.

Lata Mangeshkar यांचा जीवन प्रवास

लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ मध्ये इंदोरमध्ये झाला. त्यांचा जन्म इंदोर मधला असला तरी त्यांची कर्मभूमी मुंबई होती. त्या इंदोर मधील शीख गल्लीमध्ये जन्मापासून वयाच्या सातव्या वर्षीपर्यंत वास्तव्यास होत्या. यानंतरच मंगेशकर कुटुंबीय महाराष्ट्रात आले.

Lata Mangeshkar यांचे सुरुवातीला जया नाव ठेवण्यात आलेले होते पण त्यांच्या वडिलांनी त्यांच्या एका नाटकाच्या पत्रातून प्रेरित होऊन त्यांचे नाव लता असे बदलून घेतले. मंगेशकर कुटुंबात एकूण पाच भावंडे! मीना, आशा, उषा अश्या तीन बहिणी तर हृदयनाथ एक भाऊ आणि लता दीदी सगळ्यात मोठ्या.

लता दीदी मुंबईत आल्या तरीही त्यांना आपल्या जन्मभूमी विषयी प्रेम होते. त्यांना इंदोर बद्दल एक आत्मीयता होती. त्यांना इंदोरच्या सराफा खाऊ गल्लीतील रबडी, गुलाबजाम आणि दही खूप आवडायचे.

Lata Mangeshkar
Lata Mangeshkar

Lata Mangeshkar यांचा संगीत प्रवास

संगीतप्रेमी कुटुंब असल्याने त्यांना अगदी बालपणापासून संगीताचे बाळकडू मिळत गेले. मंगेशकरांच्या या पाचही भावंडांनी अगदी बालपणापासून आपल्या वडिलांकडून शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षापासून लता दीदींनी आपल्या वडिलांच्या संगीत नाटकात काम करण्यास सुरुवात केली होती. पुढे अमानत खान, पंडित तुलसीदास शर्मा आणि अमन अली खान साहेब यांच्यासारख्या उस्तादांकडूनही त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले.

त्या शाळेत न गेल्यामुळे फक्त त्यांच्याकडे औपचारिक शिक्षण नव्हते पण सुरेल आवाज आणि संगीतातील शिक्षण मात्र अमाप होते. सर्व काही ठीक सुरू असताना त्यांच्या वयाच्या १३ व्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि घरातील मोठी मुलगी या नात्याने सर्व कुटुंबाची आर्थिक जबाबदारी लता दीदींच्या खांद्यावर येऊन पडली.

आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी त्यांनी १९४० च्या सुरुवातीच्या दशकात चित्रपटांमध्ये काम करणे आणि गाणी गाणे सुरू केले. “आप की सेवा में” या चित्रपटासाठी “पा लगून कर जोरी” या गाण्याने त्यांना एक मोठा ब्रेक मिळाला परंतु 1949 चा महल चित्रपट आणि त्यातील “आयेगा आने वाला” या गाण्याने त्यांना खऱ्या अर्थाने प्रसिध्दी मिळाली.

लता दीदींनी त्यांच्या आयुष्यात जवळजवळ जगातील ३६ भाषांमध्ये सुमारे तीस हजारांपेक्षा अधिक गाणी गायली आहेत. १९४२ ते २०१० या कालावधी दरम्यान त्यांनी २५००० गाणी गायली.


Lata Mangeshkar

Lata Mangeshkar यांची कमाई आणि Net Worth

लता दीदींना त्यांची पहिली कमाई स्टेजवर गाण्यासाठी मिळाली होती. त्यांची ही पहिली कमाई २५/- रू. होती. जसे सूर्याची किरणे लपवली तरी सगळीकडे आपली प्रभा पाडतात अगदी तसेच लता दीदींच्या गाण्यांनी सर्वत्र प्रसिद्ध मिळवली.

Trustednetworth.com यांच्या अहवालानुसार लता दीदींच्या एकूण संपत्तीचा आकडा ५० दशलक्ष यूएस डॉलर्स आहे. जर भारतीय चलनात पाहिले तर हा आकडा ३७० कोटी रुपये इतका होतो. त्यांच्या संपत्तीपैकी बरीचशी त्यांची कमाई ही त्यांच्या गाण्यातील रॉयल्टी आणि गुंतवणुकीतून आलेली आहे.

त्यांनी खूप आधी एका मुलाखतीत सांगितले होते की त्यांना गाड्यांची खूप आवड आहे. याच कारणामुळे त्यांच्याकडे गाड्यांचे एक खूप मोठे कलेक्शन म्हणजेच संग्रह होता. मिळालेल्या माहितीनुसार लता दीदींनी त्यांच्या आईच्या नावाने पहिल्यांदा Chevrolet खरेदी केली होती.

यांनतर त्यांच्या गॅरेज मध्ये एक Buick, Chrysler या गाड्या देखील होत्या. एवढेच नाही तर त्यांच्याकडे एक मर्सिडीज गाडी देखील होती जी त्यांना यश चोप्रा यांनी लता दीदींना ‘वीरझारा’ च्या म्युझिक रिलीजच्या वेळी भेट म्हणून दिली होती असे लता दीदींनी एका मुलाखतीत सांगितले होते.



Lata Mangeshkar यांना मिळालेले पुरस्कार

त्यांचे काम, त्यांचा आवाज आणि आजही त्या आपल्यात नसताना त्यांच्या आवाजाची जादू आजही आहे हे पाहता त्यांना भारतातील सर्वात मोठे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते यात काही आश्चर्य नाही. त्यातील काही महत्त्वाचे पुरस्कार खालील प्रमाणे:

  • भारतरत्न (२००१): भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान
  • पद्मविभूषण (१९९९)
  • पद्मभूषण (१९६९)
  • दादासाहेब फाळके पुरस्कार (१९८९): भारतातील चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार
  • महाराष्ट्र भूषण पुरस्कार (१९९७)
  • NTR राष्ट्रीय पुरस्कार (१९९९)
  • ANR राष्ट्रीय पुरस्कार (२००९)
  • सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेसाठी तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (१९७२, १९७४, १९९०)
  • फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार (१९९३)
  • लीजन ऑफ ऑनर (२००७): फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार

याचबरोबर भारत सरकारने संगीतातील उत्कृष्ठतेला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या नावाने अनेक राष्ट्रीय पुरस्कारांची स्थापना केली.

Lata Mangeshkar यांचा अंतिम प्रवास

एक सुरेल आवाज, एक गानकोकिळा आणि सर्वांच्या लाडक्या लता दीदींनी अखेर ६ फेब्रुवारी २०२२ मध्ये वयाच्या ९२ व्या वर्षी अनेक अवयव निकामी झाल्याने अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अश्या जाण्याने संपूर्ण भारतात एक शोककळा पसरली होती. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले होते.

त्यांच्या जाण्याने दोन दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला होता. तेव्हा त्यांच्या अश्या जाण्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, “येत्या पिढ्या त्यांना भारतीय संस्कृतीच्या दिग्गज म्हणून स्मरण ठेवतील, ज्यांच्या मधुर आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अतुलनीय क्षमता होती.”



Leave a Reply