Laapataa Ladies या चित्रपटाची अखेर ऑस्करसाठी निवड : किरण राव यांचे स्वप्न पूर्ण

By Swamini Chougule

Published on:

Laapataa Ladies
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

किरण राव आणि अमीर खान यांची निमिर्ती असलेला सर्वांग सुंदर असा चित्रपट Laapataa Ladies हा चित्रपट आता 97व्या 2024-2025 या वर्षीच्या ऑस्कर पुरस्कारासाठी जाणार आहे.

चित्रपट निर्माती किरण राव यांच्या ‛Laapataa Ladies’ या चित्रपटाने 2024-2025 ऑस्करसाठी अधिकृत प्रवेश केला आहे. प्रत्येक निर्मात्याचे स्वप्न असते की आपला चित्रपट हा ऑस्कर पुरस्कारसाठी जावा आणि किरण राव यांचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. किरण राव ‛ फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया सर्वोत्कृष्ट चित्रपटाची निवड करेल.’ असं म्हणाल्या होत्या. 97व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील श्रेणीसाठी 2024-2025 ऑस्करसाठी ‛लपता लेडीज’ने प्रवेश केल्यानंतर किरण राव ही आनंदित आहेत. या पूर्वी ही अभिनेता आणि निर्माता आमिर खान यांचा ‛लागण’ हा चित्रपट ऑस्करसाठी गेला होता. पण त्यावेळी ऑस्करने आमिर खान यांना हुलकावणी दिली होती. आता दुसऱ्यांदा त्यांची आणि किरण राव यांची निर्मिती असलेला ‛Laapataa Ladies’ चित्रपट ऑस्करमध्ये जात आहे यावेळी अमीर खान आणि किरण राव यांच्या आणि चित्रपटाच्या देखील पदरात ऑस्कर पडणार का हे पाहण्यासारखे असणार आहे.


Sajni (Song): Arijit Singh, Ram Sampath | Laapataa Ladies | Aamir Khan Productions

Laapataa Ladies जाणार ऑस्करला

फिल्म फेडरेशन ऑफ इंडियानं 97 व्या अकादमी पुरस्कारासाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून ‛Laapataa Ladies’ चं नाव घोषणा केलं असून आता या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहेत. अनेकजण किरण राव यांचं अभिनंदन करत आहेत. किरण राव दिग्दर्शित, ‛Laapataa Ladies’ सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फिचर फिल्म श्रेणीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल. इतर उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटांसह प्रतिष्ठित सन्मान मिळवण्यासाठी हा चित्रपट भारताकडून प्रयत्न करताना दिसेल. भारतात आधीच धुमाकूळ घालणारा हा चित्रपट आता ऑस्करकडे वळला आहे.


Laapataa Ladies
Laapataa Ladies

किरण राव याबद्दल काय म्हणतात

एका वृत्तसंस्थेशी बोलताना किरण राव यांनी म्हटलं होतं “ कथा माझ्याशी अशा प्रकारे जोडली गेली की, त्यामागच्या विचारानं मला एक प्रेरणा दिली आहे. जर दोन मुली हरवल्या तर त्यांचे काय होईल आणि त्या स्वतःबद्दल काय शिकू शकतील? जेंव्हा मी स्क्रिप्ट वाचली तेंव्हा मला वाटलं, की ही स्क्रिप्ट मला अनेक गोष्टी एक्सप्लोर करण्याची संधी देईल. मला असं वाटलं की आता काही करू शकतो.” लैंगिक समानतेवर लक्ष केंद्रित करणाऱ्या या चित्रपटाचा गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहोत्सवात(TIFF) प्रीमियम झाला. या चित्रपटात रवी किशन, प्रतिभा रत्न, निशांती गोयल आणि स्पर्श श्रीवास्तव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‛ऍनिमल’ आणि ‛अट्टम’ सह इतर 28 स्पर्धकांना मागे टाकत, किरण रावच्या चित्रपटाची निवड ज्येष्ठ चित्रपट निर्माते जाह्नू बरुआ यांच्या नेतृत्वाखाली प्रतिष्ठित ज्यूरीने केली आहे.


Laapataa Ladies
Laapataa Ladies

Laapataa Ladies चित्रपटाची वैशिष्ट्य काय आहेत?

  • किरण राव यांच्या लापता लेडीज चित्रपटाची कथा 2001 सालची म्हणजेच 23 वर्षांपूर्वीची आहे.
  • किरण राव यांनी संभाव्य वादविवादचे धोके लक्षात घेऊन कोणत्याही राज्याचे नाव न घेता निर्मल प्रदेश नावाचे काल्पनिक राज्य घेतले आहे. हे राज्य हिंदी भाषिक म्हणजे मध्यप्रदेश किंवा बिहारसारखे आहे. तरी ही यात भारतातील कोणत्याही खऱ्या राज्याचे नाव नाही.
  • किरण राव यांनी या निर्मल प्रदेशाची सामाजिक संरचना दाखवत त्यात असलेली पुरुषप्रधान मानसिकता उघड गेली आहे.
  • चित्रपटाच्या लेखक आणि दिग्दर्शकाने अत्यंत सहज आणि सुंदरपणे समाजातील लैगिंक भेदभाव आणि रूढी परंपरांवर आधारित एका छोट्या कथेतून दोन स्त्रियांचे चरित्र मांडले आहे.
  • कोणत्याही प्रकारचा निषेध, भडक संवाद किंवा घोषणाबाजी न करता स्त्रीवादी विचारसरणीचा आधार न घेता कथा मांडली असली तरी संपूर्ण कथा ही दोन स्त्रियांबद्दल असून स्त्रीवादाशीच संबंधित आहे.
  • या चित्रपटात गवई समाज आणि त्यांच्या रूढी परंपरा दाखवल्या असल्या तरी त्या कुठेही हास्यास्पद वाटणार नाही याची काळीज घेतली आहे.
  • लेखक-दिग्दर्शकांनी हिंदी भाषिक समाजातील महिलांची अवस्था आणि भावनांना संवेदनशील पध्दतीने रोजच्या जीवनातील लहान-लहान प्रसंगांमधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
  • चित्रपटामध्ये गाव,खेडे,शेतं आणि गावकुसतील दैनंदिन आयुष्यात वापरल्या जाणाऱ्या वस्तू आणि साधनसुविधांचे दर्शन होते. तसेच त्यांना भेडसावणाऱ्या समस्या यांचा ही उहापोह चित्रपटात होतो.
  • हा चित्रपट गाव-खेड्यातील उपेक्षित आयुष्य जगणाऱ्या महिलांच्या जीवनावर प्रकाश टाकतो आणि विकसित भारताच्या वल्गना करणाऱ्या सत्तारूढ पक्षाला उघडे पाडतो.
  • स्वातंत्र्य आणि आधुनिकतेचा गंध ही अजून तिथंपर्यंत न पोहोचलेला नाही. तसेच समाजात होणारा बहुतांश बदल खूप संथ गतीने होत आहे याची जाणीव आपल्याला हा चित्रपट करून देतो.
  • चित्रपटातील बहुतांश दृश्य, संवाद आणि स्त्रियांची एकूण सामाजिक आणि मानसिक स्थिती या सर्वांमधून आपल्याला सामाजिक विसंगतीचे दर्शन होते.
  • एकूण चित्रपटात एकही बडा कलाकार नसताना आणि चित्रपटाला कोणतेही ग्लॅमर नसताना चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता लापता लेडीज ऑस्कर जिंकून येतो का हे पाहण्यासारखे आहे.

Leave a Reply