14 lane highway News – मुंबई पुणे हायवे असो किंवा पुणे बंगळूरू हायवे असूद्यात एवढे मोठे रस्ते असूनही वाहतूक कोंडी हि दररोज ची समस्या होऊन बसली आहे. काही कामानिमित्त निघायचे झाल्यास या दोन हायवेवर तासान तास अडकून बसावे लागते. याच रस्त्यांची वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. भारताचे रस्ता आणि वाहतूक मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी हि महत्वाची बातमी जाहीर केली आहे. त्यांनी असेही सांगितले आहे कि, मुंबई –पुणे- बंगळूरू हा हायवे १४ पदरी करण्यात येणार आहे आणि लवकरच हा हायवे तयार होऊन वाहतूक कोंडी ची समस्या संपणार आहे. यासाठी टेंडर हि निघाले आहे.
काय केली घोषणा
केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी पुण्यात श्री. गणपती उत्सव पहायला आले होते. तत्यावेळेस ते म्हणाले कि ज्या वेळेस मुंबई पुणे एक्प्रेस वे चे काम झाले त्यावेळेस आम्हाला वाटले होते कि, पुढच्या पन्नास वर्ष या मार्गावर वाहतूक कोंडी सारखी समस्या येणार नाही. परंतु वाहने एवढी वाढली आहेत कि एवढा मोठा महामार्ग वाहतुकीला कमी पडत आहे आणि तासान तास या मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. याचमुळे आम्ही असा निर्णय घेतला आहे कि मुंबई –पुणे- बंगळूरू हा 14 lane highway तयार करणार आहे. यामुळे 50 टक्के वाहतूक नवीन महामार्गावर जाईल.
नितीन गडकरी यांनाही जावे लागले वाहतूक कोंडीला सामोरे
नितीन गडकरी म्हणाले कि, पुण्याला यायला माझा मुलगा आणि पत्नी मुंबईवरून निघाले आणि मी नागपूर वरून निघालो. मी नागपूर वरून पुण्यात पोहोचलो तरी मुलगा आणि पत्नी यांना उशीर झाला. त्यांना लोणावळ्यात वाहतूक कोंडी मुळे एक तास अडकून रहावे लागेल. टे असेही म्हणाले कि आम्ही घेतलेला नवीन मुंबई –पुणे- बंगळूरू होणार 14 lane highway चा निर्णय योग्यच आहे.
कसा असेल 14 lane highway
केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी सांगितल्याप्रमाणे नवीन हायवे हा पुण्याच्या रिंग रोड ला जोडून असेल आणि अटल सेतू
वरून उतरल्यावर लगेच नवीन हायवेवर जाता येईल. वाहतूक कोंडी ची मोठी समस्या लक्षात घेता मुंबई –पुणे- बंगळूरू होणार 14 lane highway हा केंद्र सरकार ने पुढच्या सहा महिन्यात पूर्ण करायचा ठरवले आहे. तसेच हाच रोड पुढे पुणे औरंगाबाद रोड ला जोडणार असल्यामुळे वाहतूक पुण्याच्या आत येणारच नाही.
लोकसंख्या वाढतेय गडकरी यांचा हास्य विनोद
विनोदी भाषेत श्री. नितीन गडकरी म्हणाले कि, भारतीय सायन्स, टेक, रिसर्च आणि इन्होवेषण मध्ये एक नंबर आहेत. असेच लोकसंख्या कशी वाढवायची हे तंत्रज्ञानही चांगले विकसित झाले आहे. त्यामुळे ऑटोमोबाईल आणि लोकसंख्या वाढीवर कुणी कितीही प्रयत्न केला तरी हे थांबतच नाही. त्याचप्रमाणे गडकरी असेही म्हणाले कि , पुण्याचे जे सध्याचे चित्र आहे हे कृषी अर्थव्यवस्था याकडे केलेले दुर्लक्ष आहे. देशात स्मार्टसिटी नाही तर स्मार्ट व्हिलेज बनवायला पाहिजे.
2 thoughts on “मुंबई –पुणे- बंगळूरू होणार 14 lane highway , कामाला सुरुवातही झाली – Nitin Gadkari”