सध्या Maharashtra Gov. र बऱ्याच योजना राबवत आहे. देशातील प्रत्येक नागरिकाचा विचार करून योजना आखून त्या राबवल्या जात आहेत. योजना नुसत्या आखून किंवा आणून त्याचा काहीच उपयोग नसतो. जेव्हा ती संबंधित योजना त्या त्या व्यक्तीपर्यंत पोहोचते तेव्हाच खऱ्या अर्थाने ती योजना सार्थकी लागते.
Maharashtra Gov. कडून कोणती योजना सुरू झाली की बातम्या आणि ऑफिशिल साईट वरून येणारे जी.आर. यातून त्याची माहिती सामान्य माणसांपर्यंत पोहोचते. अजून एक मार्ग म्हणजे योजना दूत!
Maharashtra Gov. च्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालया मार्फत आता योजना दूत हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाव्दारे योजनांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
सध्या आपण पाहत आलोय राज्य सरकारकडून योजनांची चलती सुरू आहे. लाडकी बहिण योजने नंतर तरुण मित्रांसाठी देखील योजना आल्या. या योजना दूत उपक्रमामुळे देशातील 50 हजार तरुणांना राज्य सरकार बरोबर काम करण्याची संधी प्राप्त होणार आहे. मागेच या बाबतची एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. आता याच कारणासाठी अर्ज करण्याची मुदतवाढ मिळाली आहे. ही मुदत आता १७ सप्टेंबर पर्यंत वाढविण्यात आली असून ज्या तरुणांना राज्य सरकार सोबत काम करण्याची इच्छा असेल त्यांनी official site वर जाऊन अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्य सरकार कडून राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती सर्व सामान्य नागरिकांना मिळावी यासाठी हे योजना दूत काम करणार आहेत. इच्छुक तरुणांनी सरकारच्या www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात आले आहे.
ग्रामीण भागात एक हजार लोकसंख्येमागे आणि शहरी भागात पाच हजार लोकसंख्येमागे एक योजना दूत याप्रमाणे ५० हजार योजना दूत नेमण्यात येणार आहेत. यासाठीच आता आणखी मुदत वाढ मिळाली आहे. हे काम सहा महिन्यांचे असेल. या योजना दूतांना दरमाह रू. १००००/- मानधन देण्यात येणार आहे. हे योजना दूत राज्य सरकारच्या लोककल्याण योजनांची माहिती सामान्य नागरिकांना करून देतील. आत्तापर्यंत या उपक्रमासाठी १ लाख ६६ हजारांपेक्षा अधिक अर्ज केले गेले आहेत.
Maharashtra Gov. योजना दूत उमेदवार पात्रता
- ज्या उमेदवारांना यात सहभागी व्हायचे आहे त्यांचे वय १८ ते ३५ वयोगटातील असावे.
- उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
- उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराला संगणक ज्ञान असावे.
- उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) असणे गरजेचे आहे.
- आधारकार्ड सलग्न बँक खाते असणे गरजेचे आहे.
योजना दूत उपक्रमासाठी नियुक्ती वेळी लागणारी कागदपत्रे
- योजना दूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज
- आधार कार्ड
- पदवी उत्तीर्ण असल्याची पुरव्यादाखल कागदपत्रे
- सक्षम यंत्रणेने दिलेला अधिवास दाखला
- आधार लिंक असलेले बँक खाते पासबुक
- पासपोर्ट size फोटो
- अर्ज करताना दिलेले हमीपत्र
योजना दूत उपक्रमाची शेवटची तारीख
ज्या उमेदवारांना या कार्यक्रमाचा एक भाग व्हायचे आहे त्यांनी १७ सप्टेंबर पर्यंत सरकारच्या ऑफिशीयल साईटवर अर्ज करावा.
योजना दूत अर्ज करण्याची प्रक्रिया
- इथे क्किक करून सर्व माहिती वाचा.
- www.mahayojanadoot.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.
- वरील माहिती वाचल्यावर त्याप्रमाणे अर्ज करा
योजना दुतांना मिळणार प्रमाणपत्र
योजना दूत म्हणून नेमणूक झालेल्या उमेदवाराला घरोघरी जाऊन शासनाच्या योजनांची माहिती नागरिकांना द्यावी लागणार आहे. ही नियुक्ती ६ महिन्यांसाठी असून यात दरमाह १००००/- (दहा हजार रुपये) मानधन दिले जाणार आहे. त्याचबरोबर हे काम पूर्ण झाल्यावर Maharashtra Gov. चे प्रमाणपत्र देखील मिळणार आहे. या प्रमाणपत्रामुळे भविष्यात मार्केटिंगची कामे मिळणे सोपे होणार आहे.
FAQ
योजना दूत अर्ज करण्यासाठी वेबसाईट कोणती?
www.mahayojanadoot.org
योजना दूत काम किती कालावधीसाठी आहे?
सहा महिने
योजना दूत म्हणून नियुक्ती झाल्यास किती पगार मिळेल?
दरमाह रू. १००००/-
योजना दूत अर्ज करण्यासाठी शिक्षणाची अट काय?
संगणकीय ज्ञान आणि कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त असावी.
1 thought on “Maharashtra Gov. योजना दूत व्हा आणि कमवा १०००० रुपये महिना”