कार इंडस्ट्रीत एक नावाजलेले नाव असलेली Hyundai बाजारात Alcazar 2024 गाडी घेऊन आली आहे. दक्षिण कोरियाच्या या कंपनीने भारतात SUV गाडीचे मॉडेल लॉन्च करण्यात आले आहे. या गाडीचा लूक तर जबरदस्त आहेच पण ही गाडी पेट्रोल आणि डिझेल अश्या दोन्ही इंजिन पर्यायासोबत उपलब्ध करून देण्यात आली आहे. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार ही गाडी आधीच्या मॉडेल आणि SUV पेक्षा अधिक चांगली आहे कारण त्यात बरेच बदल करण्यात आलेले आहेत. चला तर मग पाहूया या गाडीचे फीचर्स, किंमत आणि इतर माहिती.
Hyundai Alcazar 2024 price in India
एक्स शोरुम किमती नुसार पेट्रोल व्हेरीयंटची starting price म्हणजेच सुरुवातीची किंमत १४.९९ लाख रुपये तर डिझेल गाडीची starting price १५.९९ लाख रुपये ठरवण्यात आली आहे.
Hyundai Alcazar पहिल्यांदा कधी लाँच करण्यात आली होती ?
पहिल्यांदा Hyundai Alcazar ही तीन वर्षाआधी म्हणजेच २०२१ मध्ये पहिल्यांदा भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात आली होती. ही SUV मध्यम आकाराची होती आणि याची चांगलीच चर्चा बाजारपेठेत होती. आता सहा आणि सात सीटर असे दोन ऑप्शन कंपनीने बाजारपेठेत लाँच केले आहेत. या गाडीच्या इंटर्नल आणि external दोन्ही डिझाईनमध्ये मोठा बदल पाहायला मिळत आहे.
When can the Hyundai Alcazar be booked?
कंपनीने एक्झिक्युटिव्ह, प्रेस्टीज, प्लॅटिनम आणि सिग्नेचर अश्या चार ट्रिममध्ये ही गाडी लाँच केली आहे. ही गाडी बुक करण्याची तुमची इच्छा असेल तर २५०००/- रू. टोकन amount भरून गाडी बुक करता येऊ शकते. अधिकृतरित्या या गाडीचे बुकिंग सुरू झाले आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा अधिकृत dealership द्वारे ही गाडी बुक करता येऊ शकते.
Awesome design and new look of the Hyundai Alcazar
अल्काझर फेसलिफ्टला आउटगोइंग मॉडेलच्या तुलनेत, एच आकाराचे DRL म्हणजेच Daytime running Lights हे LED लाईट देण्यात आले आहेत. याशिवाय समोर मोठी ग्रील देखील दिली गेली आहे.
जर आपण याची size प्रोफाइल पाहिली तर त्यात फारसे बदल दिसून येत नाहीयेत. यात नवे १८ इंच अलॉय व्हील आणि फंक्शन रुफ रेल देण्यात आले आहे. याला स्पोर्टी लूक देण्यासाठी याच्या बंपरवर सिल्व्हर हायलाइट्स देण्यात आले आहेत.
Alcazar Colour Options
Hyundai Alcazar ही आठ मोनोटोन रंगात आणि एका ड्युअल रंगात असे एकूण ९ external colour ऑप्शन यात आहेत. टायटन ग्रे मॅट, स्टाररी नाईट, रेंजर खाकी, ॲबिस ब्लॅक, ॲटलस व्हाइट, रोबस्ट एमराल्ड पर्ल, रोबस्ट एमराल्ड मॅट आणि फायरी रेड हे मोनोटोन रंगाचे पर्याय आहेत. यातील शेवटचे तीन रंग पहिल्यांदाच या गाडीत पाहायला मिळत आहेत. ॲबिस ब्लॅक रूफसह फक्त ॲटलस व्हाइट हे पर्याय ड्युअल रंगात आहेत.
Alcazar – सर्वात मोठे केबिन
क्रेटा फेसलिफ्टमध्ये जसा डॅशबोर्ड वापरला गेला आहे तसा Hyundai Alcazar मध्ये वापरला गेला आहे. यात एक इन्फोटेनमेंटसाठी आणि दुसरा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसाठी अशी ड्युअल १०.२५ इंच स्क्रीन दिली गेली आहे. केबिनला रॉयल किंवा प्रीमियम फील येण्यासाठी यात ड्युअल टोन टॅन आणि डार्क कलर स्कीम आहेत.
केबिन मधील सर्वात मोठे update आपल्या सेकंड रोमध्ये पाहायला मिळत आहे. प्री-फेसलिफ्ट मॉडेलमध्ये कॅप्टन सीट्स दरम्यान ठेवलेला फिक्स्ड सेंटर कन्सोल Hyundai ने काढून टाकलेला आहे. या बदलामुळे आता सीट्स मध्ये जास्त स्पेस निर्माण झाली आहे. आता सीट्स ना स्वतंत्र आर्म रेस्ट मिळतात आणि मोकळ्या जागेतून एखादी व्यक्ती अगदी आरामात तिसऱ्या रोमधे जाऊ शकते.
Alcazar Power and Performance
आपण आधीच पाहिले ही गाडी पेट्रोल आणि डिझेल अश्या दोन्ही इंजिन पर्यायासह उपलब्ध आहे. यात प्रत्येकी १.५ लिटर टर्बो पेट्रोल आणि डिझेल इंजिन उपलब्ध आहे. १६०hp पॉवर आणि २५३Nm टॉर्क जनरेट करण्यासाठी पेट्रोल इंजिन सक्षम आहे. हे इंजिन ६-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि ७-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे.११६hp पॉवर आणि २५०Nm टॉर्क जनरेट करण्यासाठी १.५ लिटर डिझेल इंजिन सक्षम आहे. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. या दोन्ही प्रकारच्या गाड्यांमध्ये फ्रंट व्हील ड्राइव्ह कॉन्फिगरेशन आहे. यात ट्रॅक्शन कंट्रोल मोड (वाळू, चिखल आणि बर्फ) देखील दिलेले आहेत.
Hyundai Alcazar Features
सुरक्षेच्या दृष्टीने आणि या SUV ची safety अजून वाढावी यासाठी कंपनीने यात ADAS म्हणजेच Advanced Driving Assistance System सूट समाविष्ट केले आहे. कंपनीच्या दाव्यानुसार यात ७० पेक्षा अधिक सुरक्षा फीचर्स देण्यात आले आहेत. यात 6 एअरबॅग्ज, व्हॉईस ऍक्टिव्हेटेड पॅनोरामिक सनरूफ, पॅडल शिफ्टर्स, पॉवर ड्रायव्हर आणि पॅसेंजर सीट्स, हवेशीर फ्रंट सीट्स, वायरलेस चार्जिंग पोर्ट, लेदर अपहोल्स्ट्री, BOSE साउंड सिस्टम, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, रेन सेन्सिंग वायपर, अनुक्रमिक टर्न इंडिकेटर, ऑन-बोर्ड आहेत. नेव्हिगेशन 360-डिग्री कॅमेरा आणि इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल सारखे फीचर्स उपलब्ध आहेत.
FAQ
1) What is the mileage of Hyundai Alcazar 7 seater car?
The Manual Petrol variant has a mileage of 18.8 kmpl. The Automatic Petrol variant has a mileage of 18.8 kmpl. The Manual Diesel variant has a mileage of 24.5 kmpl. The Automatic Diesel variant has a mileage of 23.8 kmpl.
2) Which is the top class of Alcazar?
Hyundai Alcazar price starts at ₹ 16.77 Lakh and top model price goes upto ₹ 21.28 Lakh. Alcazar is offered in 23 variants – the base model of Alcazar is Prestige Turbo 7 Seater and the top model Hyundai Alcazar Signature (O) AE 7Str Diesel AT.
1 thought on “Hyundai Alcazar 2024 आली बाजारात आता TATA – बाय बाय”