हे काय वेगळच ! मुलगा अठरा वर्षाचा झाला म्हणून या Japan राजघराण्याने केला आनंद साजरा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जगात आज अनेक देश कमी होणारी लोकसंख्या आणि देशात वाढत जाणाऱ्या वृद्धांच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. Japan हा देश देखील सध्या देशातील घटती लोकसंख्या आणि वृद्धांची वाढती संख्या यामुळे त्रस्त आहे.या समस्येला जपानचा शाही परिवार देखील अपवाद नाही. जपानमध्ये शेकडो वर्षांपासून राज्य करणारे राज घराणे आहे पण त्यात आज तब्बल चाळीस वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षे नंतर एक राजकुमार अठरा वर्षांचा म्हणजे प्रौढ झाला आहे.

Japan च्या शाही कुटुंबातील एक सदस्य 40 वर्षांनंतर प्रौढ झाला आहे. अठ्ठावन्न वर्षीय क्राऊन प्रिन्स फुमिहितो आणि सत्तावन्न वर्षीय प्रिन्सेस किको यांचा एकुलता एक मुलगा हिसाहितो याने 18 वा वाढदिवस साजरा केला. अशा प्रकारे तब्बल चार दशकानंतर राज घराण्यातील व्यक्ती तारुण्यात पदार्पण करत आहे त्यामुळे राज घराण्याला थोडासा दिलासा मिळाला आहे.

प्रिन्स हिसाहितो हा जपानी सम्राट नारूहीतोचा पुतण्या आहे आणि जपानच्या क्रायसॅन्थेमम सिंहासनाच्या पंक्तीत दुसरा आहे. प्रिन्स हिसाहितो हे 58 वर्षीय क्राऊन प्रिन्स फुमिहितो आणि 57 वर्षीय क्राऊन प्रिन्सेस किको यांचा एकुलता एक मुलगा आहे. प्रिन्स हिसाहितो शुक्रवारी 18 व्या वाढदिवशी तारुण्यात पाऊल ठेवले असताना, त्याने प्रत्येक अनुभवातून शिकण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

कमी होत जाणारी लोकसंख्या आणि वाढते वृद्ध Japan साठी डोकेदुखी

वाढते वय आणि कमी होत जाणारी लोकसंख्या ही जपानमधील मोठी समस्या बनत आहे. जपनाचे राज घराने देखिल या समस्येला अपवाद नाही. हे कुटुंब शेकडो वर्षांपासून जपानवर राज्य करत आहे.पण गेल्या चार दशकांपासून या कुटुंबातील एक ही सदस्य प्रौढ झाला नव्हता. अशा परिस्थितीत हिसाहितो 18 वर्षांचे होणे राज घराण्यासाठी खूपच आनंदाचे आणि दिलासादायक बातमी आहे.

“ प्रत्येक अनुभवातुन मला अधिक जाणून घेण्यासाठी, विविध पैलू आत्मसात करून आणि त्यातून पुढे जाण्यासाठी मी उत्सुक आहे.” त्यांच्या वाढदिवसा दिवशी प्रिन्स हिसाहितो यांनी अशा भावना व्यक्त केल्या असे प्रिन्स इंपिरियल हाऊसहोल्ड एजन्सी जपानच्या शाही कुटूंबांशी संबंधित बाबींशी संबंधित असलेल्या प्रशासकीय मंडळाने म्हणले आहे.

हे हि वाचा -  धक्कादायक सर्वे, Employed women लग्नापासून राहतात दूरच

2006 मध्ये जन्मले प्रिन्स हिसाहितो

बुधवारी एका निवेदनात, क्योडो न्यूजनुसार, ज्यांनी त्यांना अनेक वर्षांपासून पाठींबा दिला त्या सर्वांचे त्यांनी आभार मानले.

“ मला माझा उरलेला वेळ हायस्कूलमध्ये घालवायचा आहे.” असे ही प्रिन्स हिसाहितो यांनी सांगितले 6 सप्टेंबर 2006 रोजी जन्मलेला, प्रिन्स हिसाहितो ओत्सुका येथील वरीष्ठ माध्यमिक शाळेत शिकत आहे आणि त्सुकुबा विद्यापीठात तृतीय वर्षाचा विद्यार्थी आहेत. जपानचा राजा होण्याच्या शर्यतीत त्याचे वडील क्राऊन प्रिन्स फुमिहितो यांच्या नावावरून याचे नाव आले आहे.

Japan मध्ये प्रौढत्वाचे वय कमी करण्यात आले.

ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे की Japan च्या सुधारित नागरी संहितेनुसार प्रौढत्व गाठणारे ते शाही कुटुंबातील पहिले सदस्य आहेत. एप्रिल 2022 मध्ये, सुधारित संहितेने प्रौढत्वाचे वय 20 वरून 18 पर्यंत कमी केले. सम्राट नारूहितो आणि सम्राज्ञी मासाको यांची एकुलती एक मुलगी, 22 वर्षीय राजकुमारी आयकोने 2021 मध्ये 20 वर्षांची झाल्याची तिचा वाढदिवस साजरा केला होता.

हिताहिसो एके दिवशी होणार सम्राट

हिताहिसो हा एक दिवस Japan चा सम्राट होणार असल्याचे सांगितले जाते. विद्यमान सम्राट नारीहितो यांचा तो भाचा आहे. मुकुटधारी राजकुमार अकिशिने यांनी 1985 साली 18 वर्षांचा टप्पा गाठला होता. शाही कुटुंबात प्रौढत्व प्राप्त करणारे ते शेवटचे पुरुष होते. 17 सदस्यांच्या या शाही कुटुंबात हिसाहितो हे सर्वात लहान आहे. या कुटुंबात केवळ चार पुरुष आहेत. हिसाहितो हा शेवटचा पुरुष या शाही घराण्यात उरल्यामुळे त्याच्याकडे शेवटचा वारस म्हणून पाहिले जाते. जपानच्या व्यवस्थेसाठी ही मोठी चिंतेची बाब असल्याने मानले जाते. त्यामुळेच कुटुंबातील महिलांवर विसंबून न राहता गादीवर एखादा पुरुषच कसा बसेल, यावर अनेकदा वाद घातले गेले आहेत.

काय आहे इंम्पीरियल हाऊस कायदा?

जपानमध्ये 1947 साली दुसऱ्या महायुद्धानंतर इंम्पीरियल हाऊस कायदा मंजूर करण्यात आला.या कायद्यानुसार Japan युद्धपुर्व काळातील पुराणमतवादी विचार जोपासतो. या कायद्यानुसार केवळ पुरुषांनाच गादीवर बसण्याची परवानगी आहे. तसेच कुटूंबातील एखाद्या महिलेने शाही कुटुंबाबाहेर व्यक्तीशी लग्न केल्यास, तिला शाही घरण्यातून बेदखल करण्यात येते.

विद्यमान सम्राट नारूहितो आणि त्यांची पत्नी मासाको यांना राजकुमारी आयको ही एकच मुलगी आहे. राणी मासोका या हार्वर्डमधून शिक्षण घेतलेल्या आणि माजी मुत्सद्दी अधिकारी आहेत. जपानची सामान्य जनता त्यांनाच पुढचा सम्राट म्हणून पसंती देते. पण कायदा महिलेला गादीवर बसण्याची परवानगी देत नाही.

Japan सध्या घटती लोकसंख्या आणि वाढत्या वयोवृद्ध लोकांच्या समस्येने ग्रासला आहे. त्यामुळे जपानी सरकार चिंतीत आहे.

हे हि वाचा -  सर्वात फायदेशीर आणि रिस्क फ्री गुंतवणूक म्हणजे GOLD

सकाळ टाइम वेब स्टोरी


Leave a Reply

अंकिता करणार लवकरच लग्न, कोण आहे हा प्रसिद्ध संगीतकार तुम्ही ओळखलंत का या मून्नीला, कोण आहे ही नवरात्रीचा उपवासात एक्स्ट्रा एनर्जी साठी जेवणातील पर्याय कोण आहे ही पलक सिंधवानी, मानसिक त्रास दिल्याचे आरोप वजन कमी करायचे – रामदेव बाबांचा सल्ला ऐका
अंकिता करणार लवकरच लग्न, कोण आहे हा प्रसिद्ध संगीतकार तुम्ही ओळखलंत का या मून्नीला, कोण आहे ही नवरात्रीचा उपवासात एक्स्ट्रा एनर्जी साठी जेवणातील पर्याय कोण आहे ही पलक सिंधवानी, मानसिक त्रास दिल्याचे आरोप वजन कमी करायचे – रामदेव बाबांचा सल्ला ऐका
अंकिता करणार लवकरच लग्न, कोण आहे हा प्रसिद्ध संगीतकार तुम्ही ओळखलंत का या मून्नीला, कोण आहे ही नवरात्रीचा उपवासात एक्स्ट्रा एनर्जी साठी जेवणातील पर्याय कोण आहे ही पलक सिंधवानी, मानसिक त्रास दिल्याचे आरोप वजन कमी करायचे – रामदेव बाबांचा सल्ला ऐका