अनिल अंबानी यांना २५ कोटीचा दंड : Anil Ambani fined 25 crores; सेबीने पाच वर्षांसाठी केले Ban

By Pratiksha Majgaonkar

Published on:

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Anil Ambani fined 25 crores News: अंबानी हे एक बहुचर्चित आणि प्रसिद्ध नाव! दिग्दज उद्योगपती अनिल अंबानी आणि इतर २४ लोकांवर सेबीने कडक कारवाई केली आहे. या कारवाई सोबतच त्यांना पाच वर्षांसाठी सिक्युरिटी मार्केटमध्ये बंदी घालण्यात आली आहे. रिलायन्स होम फायनान्सचे पैसे इतरत्र वळवल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

सेबीने आपल्या आदेशात काय म्हणले आहे? (Anil Ambani fined 25 crores)

सेबीने २२२ पानांचा अंतिम आदेश काढला आहे. सेबीने त्या आदेशात असे म्हणले आहे की, भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (SEBI) ला असे आढळले आहे की अनिल अंबानी यांनी आर. एच. एफ. एल.च्या प्रमुख व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने, आर.एच.एफ.एल.कडून संबंधितांना कर्ज देऊन निधी काढून टाकण्यासाठी एक खोटा कट रचला.

आता या पाच वर्षांमध्ये अनिल अंबानी (Anil Ambani fined 25 crores) यांना कोणत्याही लिस्टेड कंपनीमध्ये किंवा बाजार नियामकाकडे नोंदणीकृत कोणत्याही मध्यस्तीत संचालक किंवा प्रमुख संचालक म्हणून सिक्युरिटी मार्केटमध्ये सामील होऊ शकणार नाहीत.

काय घडली चूक? : Anil Ambani fined 25 crores

सेबीने सांगितल्यानुसार त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीत मोठी चूक होती. सेबीने आर. एच. एफ. एल.च्या संचालक मंडळाला अशी कर्जे देणे बंद करा अश्या सूचना दिल्या होत्या. परंतु कंपनीच्या संचालक मंडळाने या सूचनांकडे दुर्लक्ष केले. म्हणूनच नियामक सेबीच्या म्हणण्यानुसार कंपनीच्या कामकाजात मोठी चूक झाली आहे असे सांगण्यात येत आहे.

Anil Ambani fined 25 crores : सेबीने पुढे असे देखील म्हणले आहे की, आर. एफ. एच. एल. कडून पैश्याची उधळपट्टी झाली आहे. इतर संस्थांनी बेकायदेशीर कर्ज घेणाऱ्यांची भूमिका बजावली आहे किंवा RHFL कडून बेकायदेशीर पैसे वळवण्याच्या भूमिकेत कामगिरी केली आहे. RHFL ने अपात्र कर्जदारांना कर्ज देऊन पैश्याची उधळपट्टी केली आहे.

सेबीने असे सांगितले आहे की, अंबानी यांनी आपल्या ADA समूहाचे अध्यक्ष असल्याचा गैरफायदा घेतला आहे. या समूहाचे अध्यक्ष आणि RHFL चे महत्त्वाच्या शेअर होल्डिंगचा वापर करून फसवणूक केली आहे. सेबीने यात कंपनीच्या व्यवस्थापन आणि प्रवर्तकांच्या निष्काळजीपणाचा उल्लेख केला आहे. याद्वारे कंपनीने अश्या कंपन्यांची कर्जे मंजूर केली आहेत ज्यांच्याकडे रोख प्रवाह, मालमत्ता किंवा महसूल नाही.

नियामकाने कोणा कोणाला किती दंड ठोठावला आहे?

नियामकाने बापना यांना २७ कोटी, सुधाळकर यांना २६ कोटी, अनिल अंबानी यांना २५ कोटी (Anil Ambani fined 25 crores) आणि शहा यांना २१ कोटी दंड ठोठावला आहे. याशिवाय रिलायन्स युनिकॉर्न enterprises, reliance exchange Next LT, reliance commercial finance Ltd, reliance क्लीनजेन लिमिटेड, reliance broadcast news holdings Ltd आणि रिलायन्स बिग एन्टरटेन्मेंट फायनान्स लिमिटेड या संस्थांना प्रत्येकी २५ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

सेबीने काय सांगितले?: Anil Ambani fined 25 crores

SEBI ने सांगितले की त्यांच्या निष्कर्षांनुसार, “फसवणूक करण्याचा कट नोटीस क्रमांक 2 (अनिल अंबानी) द्वारे रचला गेला आणि RHFL च्या KMP द्वारे अंमलात आणला गेला. “या षड्यंत्राद्वारे, सार्वजनिक सूचीबद्ध कंपनी (RHFL) कडून निधी काढून घेतला गेला आणि अपात्र कर्जदारांना “कर्ज” म्हणून दिले गेले जे नोटीस क्रमांक 2 (अनिल अंबानी) शी संबंधित संस्थांचे प्रवर्तक असल्याचे आढळले.”

1 thought on “अनिल अंबानी यांना २५ कोटीचा दंड : Anil Ambani fined 25 crores; सेबीने पाच वर्षांसाठी केले Ban”

Leave a Reply