काल बिग बॉसमधील भाऊच्या धक्क्यामध्ये रितेश भाऊने बिग बॉसच्या घरातील सदस्यांना नाही तर प्रेक्षकांनाच धक्का दिला आहे. आणि त्या धक्क्यामुळे आता Riteish Deshmukh भाऊंवर जी नेटकरी आग पाखड करत आहेत त्यामुळे नक्कीच रितेश भाऊंना धक्का बसल्या शिवाय राहणार नाही.
दर शनिवारी आणि रविवारी भाऊच्या धक्क्यावर बिग बॉसमधील स्पर्धकांची शाळा घेतली जाते. त्यात आठवडाभर कोण चुकले कोण बरोबर आहे याबद्दल रितेश भाऊ स्पर्धकांची कान उघाडणी करत असतात. गेल्या शनिवारी जान्हवी किल्लेकरने जो धुमाकूळ घातला त्यामुळे तिला बिग बॉसच्या जेलमध्ये घालण्याची आणि रितेश भाऊंच्या धक्क्यावर न बसण्याची शिक्षा मिळाली तसेच निक्की तांबोळीची देखील त्यांनी खरडपट्टी काढली त्यामुळे सगळे प्रेक्षक Riteish Deshmukh यांच्यावर खुश होते. पण प्रेक्षकांचा हा आनंद जास्त काळ टिकला नाही आणि काल Riteish Deshmukh यांनी घरातील सगळे सदस्य कसे वाईट आणि निक्की तांबोळी एकटी कशी चांगली हे प्रेक्षकांच्या गळी उतरवण्याचा निष्फळ प्रयत्न केला.
पण रितेश भाऊ ‛ ये पब्लिक है ये सब जानती है’ असं म्हणत काल रात्रीपासून नेटकरी Riteish Deshmukh भाऊं वर चांगलीच आग पाखड करताना दिसत आहेत.
त्याचे झाले असे की या आठवड्यात निक्की तांबोळी-अरबाज पठाण आणि अभिजित सावंत यांचा लव्ह ट्रँगल पुन्हा एकदा हाय लाईट झाला. त्यात अरबाजच्या बाजूने आणि निक्कीच्या विरुद्ध सगळे घर उभे राहिले.
अरबाजने केली आदळ आपट
या आठवड्यात अरबाजने निक्की आणि अभिजितचा राग बिग बॉसच्या घरातील खुर्ची आणि भांड्यावर काढला. याबद्दल त्याला रितेश भाऊ बोलले ते योग्य होतेच पण त्याला असं वागायला भाग पाडले त्याला प्रोव्होक केले आणि जबरदस्ती अरबाजच्या गळ्यात निक्की पडली त्याबद्दल भाऊंनी एक शब्द ही उच्चारला नाही. सगळ्यांचे खापर अरबाज आणि घरातल्या इतर सदस्यांवर फोडून Riteish Deshmukh मोकळे झालेले दिसले
टास्क आणि बरेच काही
अभिजित आणि नक्की बंधनात बांधले गेले असताना सोन्याची नाणी शोधण्याच्या टास्कमध्ये अभिजितच्या पायाला लागलं असल्यामुळे त्याची जोडीदार निक्की हिने गुहेत जाणे अपेक्षित होते पण तिने मला ट्रॉमा आहे असं कारण पुढं करून मी जाणार नाही असे सांगितले. पण अशाच प्रकारच्या गुन्हेत ती नॉमिनेशन टास्कमध्ये गेली होती. घरात रात्री अंधार असतो आणि पूर्ण बिग बॉसचे घर बंदीस्त आहे मग ही जर नॉमिनेशनसाठी अशा प्रकारच्या गुन्हेत जाऊ शकते. ही रात्री अंधारात राहू शकते आणि बंदीस्त असलेल्या घरात इतके दिवस राहू शकते तर मग हिला कोणत्या गोष्टीचा ट्रॉमा आहे? हे Riteish Deshmukh नी विचाराने अपेक्षित होते पण त्यांनी तसे काही न विचारता अंकिता आणि पंढरीनाथ कांबळे यांच्यावर आगपाखड केली. आणि निक्की तांबोळीची पाठराखण केली.
पहिल्या फेरीत देखील निक्कीने नियमांवर बोट ठेवत मी नाणी मोजणार नाही असे सांगितलं पण मागे फ्रेंच फ्राईजच्या टास्कमध्ये हिनेच टास्कचे सगळे नियम धाब्यावर बसवले होते. आजपर्यंत तिने एक ही टास्क चिटिंग न करता खेळलेला नाही. हे सगळं रितेश भाऊ विसरले आणि घरातील सदस्य आणि प्रेक्षकांना निक्की कशी बरोबर आहे हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.
Riteish Deshmukh यांनी अंकीताला विनाकारण धरले धारेवर
काल Riteish Deshmukh नी विनाकारण अंकीताला धारेवर धरले असे प्रेक्षकांना वाटतेय कारण ज्या प्रकारे घन:शाम वर्षा उसगावकर यांच्याशी खेळात वागला त्यामुळे अंकिता कुठेही चुकीची वागली नाही असेच वाटते. रितेश भाऊंनी ‛घन:शाम म्हणजे एखादा पुरुष तुमच्याशी असा वागला तर कसे दिसेल?’ असा प्रश्न अंकिताला विचारला.
पण त्याच वेळी निक्कीला ‛ एखादा पुरुष तुझ्या मर्जीविरुद्ध तुझ्या अंगाला झटला तर तुला कसे वाटेल?’ हा प्रश्न विचारायला विसरले असे प्रेक्षकांना वाटते.
निक्की आणि अरबाजची बाथरूम एरियात गुटूर गूss
निक्की आणि अरबाज बाथरूम एरियामध्ये एकमेकांशी जे चाळे करत होते ते कोणालाही पाहण्या लायक नव्हते. पण त्यावर रितेश भाऊ काहीच बोलले नाही. मागे राजेश श्रुंगारपुरे आणि रेशन टिकेकर बिग बॉसमध्ये एकत्र बेडवर झोपले होते तर महेश मांजरेकरांनी त्यांची खरडपट्टी काढली होती पण निक्की आणि अरबाजच्या असल्या वागण्यावर Riteish Deshmukh हे मात्र मूग गिळून गप्प आहेत. आता फॅमिलीबरोबर हा शो पहावा की नाही? असा प्रश्न प्रेक्षक विचारत आहेत.
एकूण काय तर निक्की तांबोळी नावाच्या बाईला बिग बॉस आणि रितेश भाऊ निक्की तांबोळी कशी चांगली आहे हे दाखवण्याचा आटापिटा करताना दिसत आहेत.पण ती काय आहे हे स्वतःच लोकांना बिग बॉसमधून रोज दाखवत असते.ही बाई घरात ना काम करते! ना टास्क खेळते! मग हिला बिग बॉसच्या घरात काय आरडाओरडा करायला आणि अरबाजच्या अंगचटीला जायला ठेवले आहे का? हा प्रश्न ही उरतोच.
नक्की तांबोळी नॉमिनेशनमध्ये येताच वोटिंग लाईन्स बंद करण्यात आल्या त्यामुळे बिग बॉस टीआरपीसाठी तिला पाठीशी घालत आहे हे स्पष्ट आहे असे प्रेक्षकांचे मत आहे. असेच करायचे असेल तर निक्की तांबोळीला बिग बॉसची ट्रॉफी देऊन टाका आणि शो गुंडाळा अशी मागणी प्रेक्षकवर्ग करत आहे.
एकूण काय तर ज्या लेव्हलवर बिग बॉस मराठी शो सुरू आहे ती घसरलेली लेव्हल मराठी प्रेक्षकांना पहायची नाही. त्यात रितेश भाऊंनी काल जे काय निक्कीला हिरोईन बनवण्याचे केविलवाणे प्रयत्न केले त्यामुळे प्रेक्षक आणखीनच भडकले आहे.आता पुढे हा शो अशा परिस्थितीत किती दिवस टिकतो आणि प्रेक्षक यांची ही नाटकं किती दिवस सहन करतात हे पाहण्यासारखे आहे.
1 thought on “कालच्या मराठी बिग बॉस मध्ये रितेश देशमुखवर प्रेक्षक भडकले – the audience went wild on Riteish Deshmukh”