बहुतांश आणि सामान्य जनतेला रेल्वेचा प्रवास परवडतो आणि आवडतोही. तिकीट दर, प्रवासात मिळणारी सोय इतर मध्यामापेक्षा सामान्य माणसाला परवडणारी असते आणि म्हणूनच लोक रेल्वेने प्रवास करण्याला प्राधान्य देतात. वाढती लोकसंख्या, सामान्य जनतेला परवडतील असे तिकीट दर आणि चांगली सोय मिळावी यासाठी vande bharat ट्रेनची सुरुवात झाली. सर्वात पहिली vande bharat ट्रेन नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर धावली आणि टप्प्याटप्प्याने इतर महत्त्वाच्या ठिकाणी हिरवा झेंडा दाखवला गेला. या ट्रेनला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
आता मुंबईकर आणि उत्तर महाराष्ट्रातील लोकांसाठी ही आनंदाची बातमी आली आहे. आधीच मुंबईत रेल्वे ही लाईफ लाईन मानली जाते. मुंबई आणि उपनगरातील बहुतांश चाकरमानी वर्ग रेल्वेने प्रवास करतो. रेल्वे हा एक त्यांच्यासाठी जिव्हाळ्याचा विषय आहे असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही.तर! आता vande bharat स्लीपर ट्रेन मुंबईत देखील सुरू होणार आहे. मुंबईतून उत्तर महाराष्ट्र मार्गे देशातील ही पहिली vande bharat स्लीपर ट्रेन सुरु होत आहे. याआधीच जवळजवळ ५२ मार्गावरून vande bharat ट्रेन धावत आहे.
पहिली vande bharat ट्रेन कशी सुरू झाली?
सर्वात पहिली vande bharat ट्रेन ही नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर धावली आणि हळूहळू इतर महत्त्वाच्या ठिकाणी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला गेला. मुख्य म्हणजे जिथे जिथे ही ट्रेन सुरु झाली तिथल्या प्रवाशांनी याला चांगला प्रतिसाद दिला आहे. यामुळेच आता या ट्रेन मधील स्लीपर व्हर्जन लाँच केले जाणार आहे.
चेअर कारvande bharat आणि vande bharat स्लीपर ट्रेनचा वेग यात काय फरक आहे?
मिळालेल्या माहितीनुसार चेअर कार वंदे भारत ट्रेन पेक्षा स्लीपर ट्रेनचा वेग कमी असणार आहे.
कसा असेल यातील प्रवास? / कोणाला मिळणार याचा लाभ?
वंदे भारत ट्रेनच्या तुलनेत वंदे भारत स्लीपर ट्रेनचा प्रवास अधिक आरामदायी असणार आहे. ही वंदे भारत स्लीपर ट्रेन मुंबई ते बरेली या मार्गावर धावणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील जनतेलाही या ट्रेनचा लाभ मिळणार आहे कारण ही ट्रेन मनमाड, जळगाव मार्गे बरेलीला जाणार आहे. यामुळे संपूर्ण उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशातील जनतेला सुसाट वेगाने मुंबईकडे जाता येणार आहे
vande bharat स्लीपर ट्रेनचा रूट कसा असेल? / वेग किती असेल?
या गाडीचा मार्ग लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ते बरेली असा असणार आहे. ही गाडी बरेली येथून सुटून चंदौसी, अलिगड, आग्रा, ग्वालियर, झासी, बिना, भोपाळ, इटारसी, खंडवा, जळगाव आणि मनमाड मार्गे मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथे दाखल होणार आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनचा कमाल ताशी वेग १३० किलोमिटर एवढा असणार आहे. या ट्रेनमुळे मुंबई ते आग्रा हा प्रवास फक्त दहा तासात पूर्ण करता येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तसेच मुंबई ते बरेली हा प्रवास फक्त ११ तासात पूर्ण होणार आहे. सध्या प्रवाशांना मुंबई ते बरेली हा प्रवास करायचा झाल्यास तब्बल २७ तास खर्च करावे लागत आहेत. या vande bharat स्लीपर ट्रेनमुळे प्रवाशांचा हा बहुमूल्य वेळ वाचणार आहे.
वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये किती प्रवासी प्रवास करू शकणार आहेत?
या ट्रेनमध्ये जवळजवळ ८२३ प्रवासी प्रवास करू शकतील. यात ८५७ बर्थ असणार आहेत पण ३४ बर्थ हे कर्मचाऱ्यांसाठी राखीव असतील. ही गाडी १६ कोचेसची असणार आहे. यातील ११ थर्ड एसीचे कोच, ४ सेकंड एसीचे कोच आणि १ फर्स्ट एसी कोच असणार आहे. यातील एसी 3 टियरमध्ये ६११, एसी 2 टियरमध्ये १८८ तर एसी 1st मध्ये २४ जण प्रवास करु शकतील.
आतून ही ट्रेन कशी आहे?
या ट्रेनच्या प्रत्येक कोच मध्ये लहानशी पॅन्ट्री असणार आहे. यासह वायफाय, एल.ई.डी. स्क्रीन अश्या सुविधा देण्यात येणार आहेत ज्या प्रवाशांना फायदेशीर असणार आहेत. अगदी five star hotel रूम सारखा comfort कोचमध्ये मिळणार आहे. यात वरच्या बर्थ वर जाण्यासाठी चांगल्या प्रकारचा जिना करण्यात येणार आहे त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना देखील अप्पर आणि मिडल बर्थ पर्यंत पोहोचणे सोयीचे होणार आहे.
वंदे भारत स्लीपर ट्रेनचे कोच कुठे बनले आहेत? / सुरक्षेसाठी काय व्यवस्था आहे?
मिळालेल्या माहितीनुसार या स्लीपर ट्रेनचे कोच हे चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) मध्ये तयार केले जातील. प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करता यात सी.सी.टीव्ही. कॅमेरे लावण्यात येणार आहेत.
FAQ:-
वंदे भारत स्लीपर ट्रेन कधी सुरू होणार आहे?
डिसेंबर २०२४ ते जानेवारी २०२५ पासून ही ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे.