monkeypox virus वेगाने पसरतोय; पाहा काय आहेत लक्षणे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आत्ता कुठे कोरोनातून जग मोकळे होत होते तोवर monkeypox या आजाराने डोके वर काढले आहे. जगभरात या आजाराने थैमान घातले आहे. हा आजार आता अगदी भारताच्या बाजूच्या देशात; पाकिस्तान पर्यंत येऊन पोहोचला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दक्ष राहण्याच्या सूचना केल्या आहेत. नागपुरात यासाठी मेडिकल, मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय monkeypox च्या रुग्णांसाठी स्वतंत्र बेड्स तयार केले आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागानेही मेडिकल, मेयोला आवश्यक उपयोजना करण्याची पत्र देऊन विनंती केली आहे.

भारतासह महाराष्ट्रातही monkeypox चा धोका गंभीरतेने पाहत वैद्यकीय शिक्षण खात्याचे सचिव दिनेश वाघमारे यांनी मंगळवारी राज्यातील सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता व वैद्यकीय अधीक्षकांची ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीत monkeypox चा धोका अधोरेखित करत केंद्र आणि राज्य सरकारने काढलेल्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी अशी सूचना करण्यात आली आहे.

बैठकीनंतर नागपुरातील मेडिकल आणि मेयो रुग्णालयातील साथ रोग वॉर्डात तातडीने प्रत्येकी पाच पाच बेड्सची व्यवस्था या रुग्णांसाठी करण्यात आली आहे. बैठकीत वैद्यकीय सचिवांनी या आजाराचा संशयित रुग्ण आढल्यास त्याला लगेचच या आरक्षित विलागिकरण कक्षात ठेवण्यात यावे अशी सूचना केली आहे. त्याचप्रमाणे लक्षणानुसार आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्या रुग्णावर उपचार करण्यात यावेत अशी सूचना दिली आहे.

यावर दोन्ही रुग्णालय प्रशासनाने बुधवारी म्हणजेच आज औषधशास्त्र आणि इतर विभाग यांच्यात मार्गदर्शक तत्वे आणि उपचारांची पद्धत ठरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे नागपूर महापालिकेनेही मेडिकल आणि मेयोला आवश्यक त्या उपाययोजना करून तयार राहण्याची विनंती पत्राद्वारे केली आहे.

दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणातील अधिकाऱ्यांशी संपर्क करून तेथे संशयित रुग्णांची तपासणीसह इतर गोष्टींबाबत चर्चा केली आहे. याच संदर्भात लवकरच महापालिकेच्या आरोग्य विभागाची देखील बैठक होऊ शकते असे संकेत मिळत आहेत.

संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवणार

वैद्यकीय शिक्षण खात्याच्या बैठकीत monkeypox चे संशयित रुग्ण आढळल्यास त्यांचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत (एनआयव्ही) पाठविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. हे नमूने मेयोच्या एनआयव्हीच्या उपकेंद्रामार्फत तपासणीला जाण्याची शक्यता आहे.

हे हि वाचा -  Right to disconnect या कायद्यानुसार कामगार घरी असताना कंपनीकडून फोन आल्यास करता येणार केस

मेयो आणि मेडिकलचे अधिकारी काय म्हणाले?

मेयो चे अधिकारी डॉ. रवी चव्हाण म्हणाले; “मेयो रुग्णालयात सध्या रुग्णांचा भार जास्त आहे. त्यानंतरही monkeypox’ साठी तातडीने पाच रुग्णशय्यांची सोय केली जाईल. त्यांनतर औषधशास्त्रासह संबंधित डॉक्टरांची बैठक घेऊन उपचारांची दिशा ठरवली जाईल.”

मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे म्हणाले; “मेडिकलमध्ये पाच रुग्णशय्या साथरोग विभागाच्या वार्डात आरक्षित केल्या गेल्या आहेत. येथे तज्ज्ञांच्या देखरेखीत अद्ययावत उपचाराची सोय करण्यात आली आहे.”

नक्की monkeypox आहे तरी काय

Mpox म्हणजेच monkeypox ही आफ्रिका खंडातील देशांमध्ये पसरलेली साथ सार्वजनिक आरोग्यासाठी आणीबाणीची परिस्थिती असू शकते असे WHO ने म्हणले आहे. हा एक संसर्गजन्य आजार आहे.

हा monkeypox व्हायरसमुळे होणारा विषाणूजन्य आजार आहे. हा Zoonosis Disease म्हणजेच प्राण्यांमधून माणसाला होणारा एक आजार आहे. विविध प्रजातींची माकडे, उंदीर आणि खारी प्राण्यांमध्ये माणसाला या आजाराचा संसर्ग होतो. Smallpox म्हणजेच देवीच्या विषाणू सारखाच हा एक विषाणू आहे पण कमी घातक आहे.

या विषाणूचे दोन प्रकार आहेत. Clade1 आणि Clade2.

2022 मध्ये Clade2 या संसर्गाचा उद्रेक झाला होता पण यावेळी Clade1 या तुलनेने गंभीर आजाराची साथ पसरत आहे.

credit – The Hindu ( youtube)

Mpox ची लक्षणे काय आहेत?

monkeypox ची लागण झाल्यावर सुरुवातीला दिसणारी लक्षणे खालीलप्रमाणे आहेत :-

  1. ताप
  2. डोकेदुखी
  3. सूज येणे
  4. पाठदुखी
  5. अंगदुखी

यात ताप येऊन गेल्यावर अंगावर पुरळ उठायला सुरुवात होते. सुरुवात चेहऱ्यापासून होते आणि मग इतरत्र अंगावरही पुरळ उठतात.

हे पुरळ अतिशय वेदनादायक आणि खाजरे असतात. काही दिवसांनी यावर खपली धरते आणि पडून जाते पण त्या पुराळांचे व्रण शरीरावर कायमचे राहू शकतात.

हा संसर्ग आपोआप बरा होतो पण त्याला १४ ते २१ दिवसांचा अवधी लागतो.

अगदी गंभीर संसर्ग प्रकरणांमध्ये अंगभर पुरळ उठतात. विशेषतः डोळ्यात, तोंडात आणि गुप्तांवर हे पुरळ उठतात.

हे हि वाचा -  बाल संगोपन योजने अंतर्गत मुलांना मिळणार २२५० रुपये - bal sangopan yojana

monkeypox चा संसर्ग कसा पसरतो?

Mpox चा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या अतिशय जवळून संपर्क किंवा संबंध येणाऱ्या व्यक्तीला संसर्ग होऊ शकतो. बाधित व्यक्तीच्या शिंकण्याने, खोकल्याने व बोलताना उडणाऱ्या थुंकीमुळे संसर्ग पसरू शकतो. त्याचप्रमाणे बाधित व्यक्तीने स्पर्श केल्याने, बाधित व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवल्याने हा संसर्ग पसरतो. त्वचेला पडलेल्या भेगा, जखम, श्वसन मार्गे, तोंडावाटे हे विषाणू शरीरात शिरकाव करू शकतात. त्याचप्रमाणे बाधित व्यक्तीचे कपडे, टॉवेल, पांघरूण वापरल्याने संसर्ग पसरतो.

याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अलर्ट जारी करण्यात आला आहे. आरोग्य सेवा संचालनालयाकडून सर्व विमानतळांसोबतच बांगलादेश आणि पाकिस्तानच्या सीमेवरील भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

1 thought on “monkeypox virus वेगाने पसरतोय; पाहा काय आहेत लक्षणे”

Leave a Reply