Akshay Raskar Networth : पूर्वीच्या काळी उत्पन्नाचे म्हणा किंवा करिअरचे पर्याय मोजके होते पण आता तसे नाही. बदलत्या काळानुसार आणि बदललेल्या तंत्रज्ञानाच्या जोरावर कधी ऐकले नव्हते असे उत्पन्नाचे मार्ग निघाले आहेत. पूर्वी मोजक्या क्षेत्रातील नोकऱ्या, शेती किंवा खानदानी व्यवसाय हेच पर्याय माहित असल्याने पूर्वीचे लोक यातच करिअर करत होते. दोन वेळचे पोटभर खाऊन, थोडी बचत आणि दानधर्म करता आला म्हणजे त्या व्यक्तीला सुखी समजले जात पण आता असे नाही.
आजच्या काळात जुन्या पर्यायांसोबत फ्रीलान्सिंग, यूट्यूबर्स, ब्लॉगर्स असे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. इंटरनेट आल्यापासून ते माहितीचा महासागर आहे असे म्हणले जाते पण इंटरनेट वर ही सर्व माहिती कशी येते? तर कोणीतरी ती टाकत असतो. लिहून पोस्ट केलेल्या माहितीला सोप्या भाषेत ब्लॉगिंग म्हणतात तर यूट्यूब वर व्हिडिओ स्वरूपात पोस्ट होणाऱ्या माहितीला यूट्युबिंग म्हणतात.
अश्याच ब्लॉगिंगच्या माध्यमातून एका सामान्य शेतकऱ्याने कसे स्वतः सोबत गावकऱ्यांचे जीवन पालटले आणि कसे यात यश मिळवले याचा संपूर्ण प्रवास आपण यात पाहणार आहोत. हा प्रवास आहे शेतकरी पुत्र Akshay Raskar यांचा!
कोळगावला ब्लॉगर्सचे गाव अशी ओळख कशी मिळाली?
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात हे गाव आहे. या गावात जवळजवळ २५० जण ब्लॉगिंग करतात. यात बारावी पास तरुणांपासून इंजिनियर मध्ये शिक्षण पूर्ण केलेले तरुण देखील सामील आहेत. या गावात आता रोज कोणी किती डॉलर्स कमावले याची चर्चा रंगते. गावातील इतके जण ब्लॉगिंग करत असल्याने या गावाला ब्लॉगर्सचे गाव म्हणून ओळख मिळाली आहे.
Akshay Raskar यांचा या क्षेत्रातील प्रवास कसा होता?
शेतकरी पुत्र अक्षय रासकर (Akshay Raskar) यांनी ब्लॉगिंगची सुरुवात केली. त्यांच्यामुळेच आज कोळगावमध्ये अनेक जण या क्षेत्रात उतरले आहेत. अक्षय हे पुण्यात नोकरीला होते. त्यांचं नोकरीत मन रमेनासे झाल्यावर ते पुन्हा गावात आले त्यातच मध्यंतरी त्यांचे नाशिकला जाणे झाले. तिथे शेतकऱ्यांनी पिकांवर फवारणीसाठी केलेला जुगाड पाहिला आणि त्याचा व्हिडिओ यूट्यूबवर टाकला. तो व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आणि त्यांना त्यांचे पहिले पेमेंट मिळाले.
यूट्यूब किंवा ब्लॉग मधून कमवता येत नाही असा समज असणाऱ्या Akshay Raskar यांनी मग हे सिरीयसली घेतले आणि त्यांचा या क्षेत्रातील प्रवास सुरू झाला.
ते म्हणतात; जेव्हा त्यांना पहिले २२२ डॉलर्सचे पेमेंट मिळाले तेव्हा त्यांनी यूट्यूबवरुन ब्लॉगिंग बद्दलची माहिती गोळा करायला सुरुवात केली. त्यांना यात अजून काय काय करता येऊ शकते याची माहिती हवी होती. त्यांना या क्षेत्रातील कोणीही काहीही शिकवले नाही तर ते स्वतः यूट्यूब, गूगल अश्या माध्यमांचा वापर करत स्वतःच शिकत गेले.
Akshay Raskar यांनी त्यांचा पहिला ब्लॉग टेक्निकल सपोर्ट या त्यांच्या यूट्यूब चॅनलच्या नावाने सुरू केला. त्यांनतर त्यांनी डोमेन विकत घेऊन ब्लॉग्ज सोशल मीडियाचा पुरेपूर फायदा घेत सगळ्यांना शेअर करायला सुरुवात केली.
Akshay Raskar यांनी ब्लॉगमध्ये कंटेंट काय ठेवायचा हे कसे ठरवले?
अर्थातच शेतकरी पुत्र असल्याने आणि आजूबाजूचे लोक शेती करत असल्याने त्यांनी त्या विषयी ब्लॉग लिहायचा असे ठरवले. त्यांच्या गावात शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या शेतकरी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणतेही साधन नव्हते. यामुळे सरकार कडून मंजूर होणारे जी.आर. एकतर सरकारी अधिकारी गावात येऊन माहिती देतील तेव्हा किंवा ग्रामपंचायतीत याची माहिती मिळेल तेव्हाच शेतकऱ्यांना समजत होते. याच गोष्टीचा फायदा घेऊन त्यांनी शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या योजना आपल्या ब्लॉग मधून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला.
त्यांच्या या उपयोगी आणि खरंच गरज असलेल्या माहितीमुळे त्यांची कमाई चांगलीच वाढली. सध्या अक्षय एकूण ८ ब्लॉग चालवतात. त्यांचे सब डोमेन २४ आहेत. असे एकूण ३० ब्लॉग अक्षय चालवत आहेत.
अक्षय रासकर यांची कमाई किती आहे? – Akshay Raskar net worth
जेव्हा त्यांना त्यांच्या एका वेबसाईटच्या कमाई विषयी विचारले तेव्हा त्यांनी त्यांचे adsense अकाऊंट ओपन करून दाखवले. जानेवारी २०२३ मध्ये त्यांच्या एका वेबसाईटवर १५००० डॉलर्सची कमाई झालेली होती. भारतीय रुपयात सांगायचे झाल्यास अंदाजे बारा लाख रुपये.
ब्लॉगवर कमाई कशी होते? – Akshay Raskar blogging income
Akshay Raskar यांना जेव्हा असे विचारले गेले तेव्हा त्यांनी एक ब्लॉग उघडून दाखवला. ते म्हणाले; यात ज्या जाहिराती दिसत आहेत त्यामुळे कमाई होते. आपल्या ब्लॉगवर गूगल जाहिराती लावते आणि त्यातूनच कमाई होते.
त्यांनी यात पुढे पुढे जाण्यासाठी कोणती पावले उचलली?
जेव्हा ते फक्त ब्लॉगवर होते तेव्हा त्यांना डायरेक्ट आणि शेअर केलेल्या लिंकवरून ट्रॅफिक मिळत होते. हळूहळू त्यांनी वर्डप्रेस, SEO अश्या काही टेक्निकल गोष्टी शिकून घेतल्या ज्यामुळे गूगल त्यांचा ब्लॉग कसा रँक करेल हे त्यांना समजले. यामुळे ब्लॉग शेअर न करताही गूगल स्वतः ऑरगॅनिक ट्रॅफिक घेऊन येईल आणि कमाई होत राहील हे लक्षात आल्यावर त्यांनी वर्डप्रेसमध्ये त्यांचा ब्लॉग सुरु केला.
आज त्यांच्याकडे वेबसाईट सांभाळण्यासाठी मुले आहेत. कमाईच्या ६०% रक्कम अक्षय स्वतः ठेवतात तर ४०% रक्कम मुलांमधे वाटली जाते. सध्या गुंतवणूक फक्त माझ्या होस्टिंगवरती आणि डोमेनवरतीच करतो. माझ्याकडे इतर काही टुल्स नाहीयेत. यामध्ये माझी सध्याची दरमहा गुंतवणूक एका डोमेनसाठी 10 ते 12 हजार रुपये आहे.”
ग्रामीण भागात ब्लॉगिंग करताना काय आव्हाने होती?
ग्रामीण भागात आजही ब्लॉगिंग विषयी मार्गदर्शन करणारे कोणी नाही. मार्गदर्शनाचा अभाव हे सगळ्यात मोठे आव्हान आहे. दुसरे आव्हान म्हणजे वीज कपात. ग्रामीण भागात लोड शेडींग चे प्रमाण जास्त असल्याने ब्लॉगिंग करताना अडथळे निर्माण होतात.
Akshay Raskar यांनी सगळ्या आव्हानांना सामोरे जाऊन, येणाऱ्या अडचणींवर मात करून आज एवढी मोठी मजल मारली आहे. नक्कीच यात त्यांचे कष्ट आहेत. तुम्हाला कसा वाटला हा त्यांचा संपूर्ण प्रवास हे नक्की सांगा.
FAQ:-
ब्लॉग सुरु करायचा झाल्यास किती investment लागते?
फक्त तुमचा मोबाईल आणि महिन्याचे इंटरनेट एवढ्या investment वर देखील ब्लॉग सुरु करता येऊ शकतो.
ब्लॉगिंगमध्ये यश कसे संपादन करावे?
ज्या क्षेत्रात तुम्ही काम करत आहात त्यात लोकांना तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत हे समजल्यावर त्यानुसार काम करुन नक्कीच यात जास्तीत जास्त revenue generate करता येतो.
1 thought on “कोळगाव ते ब्लॉगर्सचे गाव! पाहा कशी मिळाली ही नवी ओळख – akshay raskar”