pan card and aadhar card link करण्याची संपूर्ण माहिती

By Pratiksha Majgaonkar

Published on:

pan card and aadhar card link
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आपण कुठलेही आर्थिक व्यवहार करायला गेलो की सगळ्यात पहिल्या ज्या दस्तैवजांची म्हणजेच डॉक्युमेंट्सची गरज असते ते म्हणजे pan card and aadhar card link

बँक खाते असो, पोस्टातील खाते असो, शेअर्स, म्युच्युअल फंड काहीही असले तरीही PAN card आणि आधार कार्ड हे लागतेच. आता तर PAN card आणि आधार card लिंक केलेले आहे. बहुतांश जणांनी हे करून घेतलेले आहेच. मग याचे फायदे काय आहेत?, जर हे दोन्ही लिंक नसेल तर काय नुकसान होऊ शकते? जर PAN card आणि आधार card अजूनही लिंक नसेल तर काय करावे लागेल? हे सर्व आज आपण या लेखातून पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया.

What are the benefits of linking PAN card and Aadhaar card

पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याचे खूप फायदे आहेत. आपल्याला माहीतच आहे सर्व बँकेत KYC साठी हे दोन डॉक्युमेंट मागितले जातातच. त्यामुळे ITR म्हणजेच Income Tax Return file करताना याचा फायदा होऊ शकतो.

आधार कार्ड आल्यापासून ते एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केल्यामुळे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला सर्व आर्थिक व्यवहारांचे ऑडिट मिळते. आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक नसतील तर ITR file करता येणार नाही. हे documents link झाले की सहजतेने ITR फाईल करता येईल. पावती किंवा e- signature ची गरज लागणार नाही.

टॅक्स चोरीला लगाम घालण्यासाठी हे एक महत्त्वाचे काम आहे. आधार कार्ड हे ओळखपत्र तसेच पत्त्याचा पुरावा (address proof) म्हणून काम करते त्यामुळे बाकी कागदपत्रांची गरज कमी झाले आहे म्हणूनच आर्थिक फसवणूक, टॅक्स चोरीला लगाम घालण्यासाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे गरजेचे आहे.

पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक नसल्यास काय नुकसान होऊ शकते? pan card and aadhar card link
टॅक्स डिपार्टमेंटने जाहीर केलेल्या नोटीस प्रमाणे जर पॅन कार्ड हे बायोमेट्रिक आधार कार्ड सोबत जोडलेले नसल्यास चालू दराच्या दुप्पट दराने TDS कट होईल.

या extra TDS कपातीपासून वाचण्यासाठी आधार आणि पॅन कार्ड एकमेकांना लिंक असणे गरजेचे आहे.

पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक नसल्यास काय काय अडचणी येऊ शकतात?- pan card and aadhar card link
पॅन कार्ड आणि आधार card link नसल्यास तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय केले जाते. दिलेल्या मुदतीत दोन्ही कार्ड लिंक न केल्यामुळे दंड भरून हे काम करून घ्यावे लागते. आधीच तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय केलेले असल्याने तुम्हाला आयकर विभागाकडून कोणताही परतावा मिळणार नाही. पॅन कार्ड बंद असल्याने त्यावरील व्याजही मिळणार नाही. याशिवाय चालू कर दराच्या दुप्पट दराने कर भरावा लागेल.

हे सर्व नुकसान टाळण्यासाठी तुमचे pan card and aadhar card link असणे गरजेचे आहे.

pan card and aadhar card link नसल्यास नंतर काय काय अडचणी येऊ शकतात?

जर तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक नसेल तर आयकर विभागाकडून पॅन कार्ड निष्क्रिय केले जाते त्यामुळे बँक खाते उघडण्यासाठी याचा काहीच उपयोग होत नाही.

निष्क्रिय पॅन कार्ड म्हणजेच संबंधित व्यक्तीकडे पॅन कार्ड नसल्या सारखेच झाले. तुमचे पॅन कार्ड आधार कार्डला लिंक नसले तरी तुमच्या आधीच असलेल्या बँक खात्यात पगाराचे पैसे जमा होतीलच पण याला वेळ लागू शकतो आणि पगारातून कापून जाणारा TDS तुम्हाला परत मिळण्यात अडचणी येऊ शकतात.

या सगळ्यांसोबत बऱ्याच योजना असतात ज्यात पॅन कार्ड हे मुख्य दस्ताऐवज म्हणून मागितले जाते. अश्यावेळी जर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय झालेले असेल तर तुम्हाला त्या योजनांपासून वंचित राहावे लागेल.

एकदा सरकारने दिलेली पॅन कार्ड, आधार कार्ड लिंक करण्याची तारीख उलटून गेल्यावर दंड भरून हे काम करून घ्यावे लागेल.

जर पॅन कार्ड निष्क्रिय झाले असेल तर काय करावे?

पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक नसल्याने जर निष्क्रिय झालेले असेल तर दंडाची रक्कम भरून ते आधार कार्ड सोबत लिंक केल्यावर पॅन कार्ड पुन्हा active होईल. यासाठी जास्तीत जास्त ३० दिवसांचा कालावधी लागू शकतो.

पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक कसे करावे? – pan card and aadhar card link

पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करण्यासाठी आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे.
त्यांनतर क्विक लिंक टॅब मधून लिंक आधार वर क्लिक करावे.
यावर अचूक आधार कार्ड आणि पॅन कार्डचा नंबर टाकावा.
तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर एक ओटीपी येईल तो टाकल्यावर validate ऑप्शन येईल.
दोन्ही कार्ड वरची माहिती अचूक असेल तर लगेच दोन्ही लिंक होतील.
जर कार्ड लिंक झाले नाही तर काय चुका आहेत हे पाहावे.

pan card and aadhar card link का होत नाही?

जर दोन्ही कार्ड वरील माहिती मिस्मॅच म्हणजेच जुळत नसेल तर ही अडचण येऊ शकते. दोन्ही कार्ड वर तुमचे नाव, जन्म तारीख, लिंग इत्यादी बरोबर आहे ना हे तपासा. जर यात चुका असतील तर दुरुस्त करून घ्या मग तुमचे आधार पॅन कार्ड सोबत लिंक करता येईल.

मग या लेखातील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा.

Leave a Reply