पाहा का साजरा केला जातो रक्षाबंधन (Rakshabandhan) सण; वाचा संपूर्ण माहिती

By Pratiksha Majgaonkar

Published on:

Rakshabandhan
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rakshabandhan हा प्रत्येक बहीण भावासाठी जिव्हाळ्याचा सण असतो. बहीण भावाच्या प्रेमाचा, त्यांच्या नात्यातील गोडवा अजून वाढवण्याचा हा सण. वर्षभर बहीण भाऊ अगदी टॉम अँड जेरी सारखे भांडतील पण वेळ प्रसंगी आणि रक्षाबंधनाच्या दिवशी गळ्यात गळे घालून फिरतील असा हा दिवस.

रक्षाबंधन हा सण देशभरात साजरा केला जातो आणि वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. उत्तर भारतात रक्षाबंधन सण कजरी पौर्णिमा तर पश्चिम भारतात नारळी पौर्णिमा म्हणून हा सण ओळखला जातो.

हा सण भावाच्या हातावर राखी बांधून साजरा करण्यात येतो. काही ठिकाणी नोकर मालकाच्या हातावर राखी बांधून हा सण साजरा करतात. यात आपल्या कुटुंबाचे रक्षण आणि कौटुंबिक जबाबदारी तुमच्यावर आहे असा कृतज्ञतापूर्वक संदेश असतो. ही परंपरा जास्त करून उत्तर भारतात पाहायला मिळते.

आता बदलत्या काळानुसार बहीण देखील बहिणीला राखी बांधते. राखी बांधणे म्हणजे आपल्या नात्याचे रक्षण करणे हा त्याचा खरा भावार्थ आहे. आज काळ कितीही पुढे गेला असला तरीही हा भावा बहिणीचा हक्काचा रक्षाबंधन सण तितक्याच उत्साहात साजरा केला जातो.

राखी बांधल्यावर भाऊ प्रेमाने आपल्या बहिणीला काहीतरी भेट देतो. सणाच्या निमित्ताने कुटुंबे एकत्र येतात, एकमेकांना भेटी दिल्या जातात आणि आनंद अजून द्विगुणित होतो म्हणूनच सण साजरे केले जातात.

कोळी बांधव या दिवशी नारळी पौर्णिमा साजरी करतात. म्हणजेच या दिवशी कोळी बांधव समुद्राची पूजा करतात. समुद्रात सोन्याचे श्रीफळ म्हणजेच सोन्याचा नारळ वाहिला जातो आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते.

रक्षाबंधन (Rakshabandhan ) का साजरे केले जाते?

रक्षाबंधन दिवशी बहीण भावाचे औक्षण करून त्याच्या हातात राखी बांधते. राखी म्हणजे एक असे रेशमी बंधन ज्यात भाऊ आपल्या बहिणीची काळजी घेण्याचे, तिचे रक्षण करण्याचे वचन देतो.

बहीण भावाच्या नात्याची वीण अजून घट्ट व्हावी, त्यांच्या नात्यातील गोडवा वाढावा म्हणून हा सण साजरा केला जातो.

रक्षाबंधन (Rakshabandhan ) कधी साजरे केले जाते?

साधारणतः ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधन येते. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे केले जाते.

काय आहे रक्षाबंधन (Rakshabandhan ) मागचा इतिहास?

महाभारतात असे सांगितले आहे की, श्री कृष्णाच्या बोटाला जखम झाली होती आणि त्यातून रक्तस्त्राव होत होता. हे पांडवांची पत्नी द्रौपदी पाहते आणि आपल्या साडीची किनार फाडून त्यावर पट्टी करते. यामुळे रक्तस्त्राव थांबतो आणि श्री कृष्ण तिचे रक्षण करण्याचा संकल्प करतो. त्यानंतर आजीवन श्री कृष्ण द्रौपदीचे भाऊ म्हणून रक्षण करतो.

दुसरे उदाहरण असे सांगितले जाते की, राणी कर्मावती हिने बहादूरशाह पासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी मुघल बादशहा हुमायुला राखी बांधली होती. राखी बांधल्यावर बादशहा हुमायु याने राणी कर्मावती हिच्या रक्षणासाठी स्वतःच्या प्राणांची बाजी लावली होती असे सांगितले जाते.

रक्षाबंधन (Rakshabandhan ) कोणकोणत्या राज्यात कसे साजरे केले जाते?

महाराष्ट्रात कोळी बांधव नारळी पौर्णिमा साजरी करतात. यादिवशी समुद्राला श्रीफळ अर्पण करून त्याची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाचे औक्षण करून त्याला राखी बांधून हा सण साजरे करतात.

तामिळनाडू आणि केरळ राज्यात अवनी अवित्तम म्हणून हा सण साजरा करतात. हा सण कुटुंबातील पुरुष सदस्यांना समर्पित असतो. श्रावणात हा सण येत असल्याने या दिवशी आपल्या पापाचे क्षालन करण्यासाठी, क्षमा मागण्यासाठी पाण्यात डुबकी मारली जाते; शुध्दीकरण केले जाते. त्यांनतर जुन्या धाग्याच्या बदली नवीन धागा घातला जातो ज्याला जनेऊ म्हणतात. या दिवशी येणाऱ्या वर्षात पुण्यकर्म करण्याचे वचन दिले जाते. या महत्त्वाच्या दिवशी विद्वान यजुर्वेद पठण करण्यास आरंभ करतात ही प्रथा पुढील सहा महिने सुरू असते.

ओडिशामध्ये गम पौर्णिमा म्हणून हा सण साजरा केला जातो. हा सण गायी आणि बैल यांसारख्या प्राण्यांप्रती साजरा केला जातो. अगदी उत्साहात सगळे हा सण साजरा करतात. त्याचप्रमाणे हा दिवस श्री कृष्णाचा मोठा भाऊ बलराम याचा जन्मदिवस म्हणूनही साजरा होतो.

राजस्थानात हा दिवस लुंबा राखी म्हणून साजरा होतो. हल्ली आपण ज्या भय्या – भाभी राखी पाहतो ही तिथलीच संस्कृती आहे. तिथे मुलींना, आपल्या भावाच्या पत्नीला ही राखी बांधली जाते.

रक्षाबंधन (Rakshabandhan ) साजरे करण्यामागे काय शास्त्र आहे?

आपल्या भारतात प्रत्येक सणामागे काही ना काही शास्त्र असतेच. असे म्हणतात रक्षाबंधनाच्या दिवशी यम लहरींचे प्रमाण जास्त असते. असे मानले जाते की, यम लहरी या पुरुषांच्या शरीरात जास्त प्रमाणात गतिमान असतात. या लहरी जास्त प्रमाणत वाढल्या की सूर्यनाडी जागृत होऊन जीवाला त्रास होऊ शकतो. राखीचा दोरा बांधून सूर्यनाडी शांत करण्याचे काम बहिणी करतात असे शास्त्रात सांगितले गेले आहे.

यावर्षी 2024 मध्ये रक्षाबंधन (Rakshabandhan ) कधी आहे?
यावर्षी म्हणजेच 2024 मध्ये रक्षाबंधन 19 ऑगस्ट रोजी आहे.


FAQ

2024 मध्ये रक्षाबंधनाचा मुहूर्त काय आहे?

दुपारी १ वाजून ३२ मिनिटे ते रात्री ९ वाजून ८ मिनिटे हा राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त आहे.

भद्रा काळ कधी आहे?

१९ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजून ५३ मिनिटांनी भद्रा काळ सुरू होत आहे तो १ वाजून ३२ मिनिटापर्यंत आहे. या काळात भावाला राखी बांधली जात नाही. हा काळ अशुभ मानला जातो.

2024 मध्ये रक्षाबंधन किती तारखेला आहे?

2024 मध्ये रक्षाबंधन किती तारखेला आहे?

Leave a Reply