या तंत्रज्ञानाच्या युगात सगळेच ऑनलाईन झाले आणि बहुतांश सगळेच सोशल मीडिया वापरू लागले. Youtube, Instagram, facebook अश्या ठिकाणी अनेक क्रियेटर्स आपली कला दाखवू लागले.
यातच समावेश आहे एका आजीचा (AapliAajiOfficial)! हो अगदी बरोबर ओळखलंत; आपली आजी या नावाने असणारे Youtube Channel अगदी कमी वेळात लोकप्रिय झाले. आपली आजी यावर सुमन आज्जी तिच्या खास रेसिपी दाखवत असतात. त्यांचा हा प्रवास कसा होता आणि त्यांना हे Channel काढण्याची प्रेरणा कशी मिळाली हे पाहूया.
अगदी कमी वेळात सगळ्यांच्या लाडक्या झालेल्या या आजींचे नाव Suman Dhamane असे आहे. Ahemednagar मधून दहा किलोमिटर आत सरोला कसार गावात त्या राहतात. सत्तरी पार केलेल्या आजीने (AapliAajiOfficial) कधीही शाळेचे तोंड पाहिलेले नाही तरीही त्या आज एक यशस्वी Youtuber आहेत. त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर वेगवेगळ्या पदार्थांचे १५० हून अधिक व्हिडिओ टाकलेले आहेत. आज त्यांच्या चॅनलचे १७.३ लाखांहून अधिक subscriber’s आहेत.
आपली आजी (AapliAajiOfficial) हे YouTube Channel सुरू करावे हा विचार कसा समोर आला?
आजी सांगतात; त्यांना कधी स्वप्नातही वाटले नव्हते त्या यूट्यूबवर झळकतील. त्यांना स्वयंपाकाची आवड! एके दिवशी त्यांच्या नातवाने म्हणजेच Yash Pathak याने त्यांना पावभाजी करण्यासाठी सांगितले. आजीने आपल्याला पावभाजी करता येत नसल्याचे सांगितल्यावर यशने त्यांना यूट्यूब व्हिडिओ दाखवले आणि आजी म्हणाली; याहून चवदार पावभाजी तर मी बनवू शकते आणि त्यांनी तसे करूनही दाखवले. घरातील सगळ्यांना ती पावभाजी खूप आवडली आणि यशला आजीच्या रेसिपी युट्यूबवर टाकता येतील ही कल्पना सुचली. यातूनच आपली आजी Youtube Channel चा विचार आजीच्या नातवाच्या; यशच्या मनात आला.
कसा होता आजींचा हा नवा प्रवास? (AapliAajiOfficial)
आजी म्हणतात, त्यांना आधी काय करावं हेच कळत नव्हतं. त्यांनी कधीच कॅमेरा फेस केला नव्हता अर्थात त्या कधीच कॅमेरा समोर आल्या नव्हत्या. यशने जेव्हा यूट्यूब चॅनल सुरू केलं तेव्हा त्यांच्या पोटात गोळा आला. सुरुवातीला त्या ना खुशीने आणि कॅमेरा चे दडपण बाळगून कसेबसे व्हिडिओ काढत होत्या. सुरुवातीला कॅमेरा समोर उभं राहिल्यावर त्यांना नक्की काय बोलायचे आहे हेच त्या विसरून जायच्या पण हळूहळू त्यांना त्याची सवय झाली. काही काही इंग्रजी शब्द जसे मिक्सर, केचप, सॉस, बेकिंग पावडर याचे योग्य उच्चार त्यांना यशने शिकवले आणि त्यांनीही आठवडाभरात सगळे आत्मसात केले.
एक दिवस त्यांना यूट्यूब कडून Youtube Creaters Award मिळाला आणि त्यांना स्वतःचा अभिमान वाटू लागला. त्यांच्यात एक आत्मविश्वास जागा होऊ लागला. सगळे नातेवाईक आणि कुटुंबीय त्यांचे कौतुक करू लागले आणि त्या अजून पुढे जाण्यासाठी आत्मविश्वासाने उभ्या राहिल्या.
त्यांच्या (AapliAajiOfficial) चॅनलचे तीन महिन्यातच एक लाख subscriber’s झाले होते. यूट्यूब कडून त्यांना सिल्व्हर play button मिळाल्यावर तर आजी खूपच खुश झाल्या होत्या.
यूट्यूब चॅनल सुरू करण्यात त्यांना कोणत्या अडचणी आल्या?
जेव्हा AapliAajiOfficial हे चॅनल सुरू झाले तेव्हा आजींना इंग्रजी शब्दांचे योग्य उच्चार शिकावे लागले. त्यांना कॅमेराची सवय नसल्याने सुरुवातीला त्या काय बोलायचे आहे हेच विसरत होत्या. यश सांगतो सगळं काही जेव्हा सुरळीत झालं तेव्हा अचानक ऑक्टोबर महिन्यात हे यूट्यूब चॅनल हॅक झालं. तोपर्यंत आजीला याची सवय झाली होती आणि जेव्हा आजीला हे चॅनल हॅक झालं आहे असे समजले तेव्हा तिने जेवणही केलं नाही. यशने यूट्यूबला मेल करून याबद्दल सांगितले आणि चार दिवसांनंतर त्यांना त्यांचे चॅनल परत मिळाले.
आजींना AapliAajiOfficial यात कसे यश मिळाले?
यश ने आठवीत असताना AapliAajiOfficial यूट्यूब चॅनल सुरू केले होते पण त्यावर तो जास्त व्हिडिओ शेअर करत नव्हता. आजीचे चॅनल २०१९ मध्ये सुरू झाले आणि त्यावर काही व्हिडिओ पोस्ट केल्यावर “कारल्याच्या भाजीचा” व्हिडिओ यावर पोस्ट झाला आणि काही दिवसातच त्या व्हिडिओला एक मिलियन व्ह्यूज मिळाले. आजीची बोलण्याची पद्धत, घरगुती मसाले आणि पारंपरिक पद्धतीने केलेले सर्व पदार्थ यामुळे त्यांना देशभरातून प्रेम मिळू लागले आणि त्याचेच रूपांतर या चॅनलच्या प्रगतीत झाले असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
आता आजी महाराष्ट्रीयन डिश सोबतच घरच्या घरी करता येणारे केक, पेप्सी, विविध प्रकारचे फळांचे ज्यूस, आइस्क्रीम यांसारखे व्हिडिओ पोस्ट करतात.
आजींच्या यूट्यूब चॅनलमधून किती कमाई होते?
आपली आजी (AapliAajiOfficial) या यूट्यूब चॅनल मधून महिन्याला एक लाखाहून अधिक कमाई होते.
आजी आता त्यांच्या चॅनलवर रेसिपी व्यतिरिक्त कोणते व्हिडिओ टाकतात?
आजी आता रेसिपी व्यतिरिक्त किचन टिप्स, नैसर्गिक पद्धतीने त्वचेची काळजी घेण्यासाठी करता येण्यासारखे उपाय अश्या वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ देखील शेअर करतात.
तर मग कसा वाटला आपली आजीचा प्रवास हे नक्की सांगा. एका सामान्य आजीपासून ते सर्वांची लाडकी आजी होण्याचा त्यांचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. फक्त आणि फक्त पाककला, कुटुंबाचा पाठिंबा आणि आत्मविश्वास या जोरावर आज आजी सगळ्यांना परिचयाच्या आहेत.
1 thought on “पाहा एका सामान्य आजीचा प्रवास; आता आहे पूर्ण देशाची आजी (AapliAajiOfficial)”