In Short About POCO Pad
- POCO कंपनी चे पहिले टॅब्लेट लवकरच भारतात लाँच होणार आहे.
- हे टॅब्लेट Flipkart वर खरेदीसाठी उपलब्ध होईल.
- POCO Pad मध्ये 10,000mAh क्षमतेची बॅटरी असणार आहे.
POCO कंपनी चे टॅब्लेट भारतात लाँच होण्यासाठी सज्ज आहे, ज्याची जागतिक बाजारात मे 2024 मध्ये घोषणा झाली होती. विशेष म्हणजे हे POCO चं पहिले टॅब्लेट आहे. भारतातील लाँचच्या पूर्वी, Flipkart ने एक टीझर जारी केला आहे ज्यात POCO Pad च्या उपलब्धतेची आणि लवकरच होणाऱ्या लाँचची माहिती देण्यात आली आहे. POCO Pad च्या भारतातील लाँचसंबंधी सध्या आपल्याला माहित असलेले सर्व तपशील पाहूया.तसेच या टॅबलेट मध्ये काय विशेष आहे, याबद्दल संपूर्ण माहिती पाहूया.
About POCO Pad launch
Flipkart च्या POCO- Pad च्या टीझरने पुष्टि केली आहे की POCO Pad Flipkart वरून खरेदीसाठी उपलब्ध असेल. तरीही, POCO Pad च्या लाँचची नेमकी तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. पण, Digit शीच्या अलीकडील मुलाखतीत POCO इंडिया प्रमुख हिमांशू तांडनने सूचित केले की, POCO Pad ऑगस्ट 2024 पर्यंत भारतीय बाजारात उपलब्ध होईल.POCO Pad हे Redmi Pad Pro 5G च्या मॉडेलशी समान असू शकते, म्हणजेच या दोन टॅब्लेट्समध्ये सारख्याच तांत्रिक वैशिष्ट्यांचा समावेश आहे. यामुळे असे लक्षात येते की, भारतात उपलब्ध होणारा POCO Pad देखील समान हार्डवेअर कॉन्फिगरेशनसह येऊ शकतो. म्हणजेच, भारतातील POCO Pad च्या हार्डवेअरमध्ये Redmi Pad Pro 5G सारख्या प्रमुख वैशिष्ट्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे, जसे की प्रोसेसर, RAM, स्टोरेज, आणि इतर गोष्टी .
Poco- Pad Specifications
Specification | Details |
---|---|
Display | 12.1-inch 1.5K IPS LCD |
SoC | Qualcomm Snapdragon 7s Gen 2 with Adreno 710 GPU |
RAM | 8GB |
Storage | 256GB UFS 2.2, expandable via dedicated MicroSDXC slot |
Battery | 10,000mAh with 33W charging support |
Rear Camera | 8MP single sensor |
Front Camera | 8MP |
OS | Android 14-based HyperOS |
- डिस्प्ले: POCO- Pad मध्ये 12.1-इंच आकाराचा 1.5K IPS LCD पॅनेल आहे. याचा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला समर्थन देतो, म्हणजेच स्क्रीनवरिल अनुभव अत्यंत स्मूथ आणि प्रवाही होतो. Dolby Vision सपोर्टमुळे रंग खूप चान्गले दिसतात. यामध्ये 600 निट्स ब्राइटनेस म्हणजेच उजेडात देखील डिस्प्ले चांगल्या प्रकारे दिसेल.तसेच Corning Gorilla Glass 3 संरक्षणामुळे डिस्प्लेवर स्क्रॅच कमी पडतील, ज्यामुळे दीर्घकालीन टिकाऊपणा मिळतो.
- SoC (सिस्टम-ऑन-चिप): POCO Pad मध्ये Qualcomm Snapdragon 7s Gen 2 चिपसेट आहे, जो एक भारी प्रोसेसर आहे. हा चिपसेट Adreno 710 GPU सह जोडलेला आहे, जो ग्राफिक इंटेंसिव्ह अॅप्स आणि गेम्ससाठी उपयोगी आहे. त्यामुळे उच्च कार्यक्षमता आणि उत्तम ग्राफिक प्रदर्शनाची अपेक्षा केली जाऊ शकते.
- RAM आणि स्टोरेज: या टॅब्लेटमध्ये 8GB RAM आहे, ज्यामुळे मल्टीटास्किंग आणि संसाधनांची वापर सहजतेने केली जाऊ शकतो. 256GB UFS 2.2 स्टोरेज म्हणजेच डिव्हाइसवर भरपूर डेटा, अॅप्स आणि मीडिया साठवण्याची क्षमता आहे. स्टोरेज वाढवण्याची आवश्यकता असल्यास, एक समर्पित MicroSDXC स्लॉट उपलब्ध आहे, ज्यामुळे 256GB पर्यंत अतिरिक्त स्टोरेज मिळवता येईल.
- बॅटरी आणि चार्जिंग: POCO Pad मध्ये 10,000mAh क्षमता असलेली बॅटरी आहे, जी लांब समयासाठी टिकणारी बॅटरी आहे. 33W चार्जिंग सपोर्टमुळे बॅटरीला जलद चार्जिंगची सुविधा आहे, त्यामुळे दीर्घकाळचा वापर करण्यासाठी कमी वेळात बॅटरी चार्ज केली जाऊ शकते.
- मागचा कॅमेरा: मागील बाजूस 8MP कॅमेरा आहे, जो साधारणत, दर्जेदार फोटो आणि व्हिडिओसाठी काढण्यासाठी आहे. हा एकच सेंसर आहे, त्यामुळे बहुपरकारी कॅमेरा सेटअपची अपेक्षा नसते.
- फ्रंट कॅमेरा: फ्रंट कॅमेरा देखील 8MP आहे, जो सेल्फीज आणि व्हिडिओ कॉलिंग साठी उपयुक्त आहे. ह्या कॅमेऱ्यामुळे उच्च-गुणवत्तेच्या कॉल्स आणि सेल्फीजची सुविधा मिळते.
- OS: Pad Android 14 आधारित HyperOS वर कार्यरत आहे. HyperOS हा सॅमसंगच्या सॉफ्टवेअर इंटरफेसचा एक आवृत्ती आहे, जो Android 14 वर आधारित आहे. त्यामुळे यूजर इंटरफेस ताजं, सहज वापरण्यास योग्य आणि अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह असावे.
- संपूर्णपणे, Pad एक चांगला आणि सर्वसमावेशक टॅब्लेट आहे ज्यातचांगली कार्यक्षमता,चांगला डिस्प्ले, आणि दीर्घकालीन बॅटरी यासह एक उत्तम वापरकर्ता अनुभव प्रदान करण्याचे वचन दिले जाते.
FAQ
POCO- Pad भारतात कधी उपलब्ध होईल?
भारतात Flipkart वर उपलब्ध होईल. याच्या लाँच च्या तारखे बद्दल अद्याप जाहीर झालेले नाही, परंतु ऑगस्ट 2024 पर्यंत बाजारात येण्याची शक्यता आहे.
POCO Pad किती RAM आणि स्टोरेज सह येईल?
8GB RAM आणि 256GB UFS 2.2 स्टोरेजसह येईल, जे MicroSDXC स्लॉटद्वारे वाढवता येते.
POCO Pad ची बॅटरी क्षमता किती आहे?
0,000mAh बॅटरी आहे, जी 33W चार्जिंग सपोर्टसह आहे.
1 thought on “POCO कंपनी चे पहिले POCO Pad होणार आहे भारतात लाँच! बघा काय असतील स्पेसिफिकेशन्स .”