Google Pixel 9 Pro XL लवकरच भारतात लाँच होणार आहे.,बघा लीक झालेली किंमत,स्पेसिफिकेशन्स आणि Al फीचर्स.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Google Pixel 9 Pro XL: गुगल कंपनी ची Google Pixel 9 सिरीज 13 ऑगस्ट रोजी जागतिक स्तरावर आणि 14 ऑगस्ट रोजी भारतात लाँच होणार आहे. यातिल फोनच्या नवीन लीक आणि रिपोर्ट्स दररोज समोर येत आहेत. ताज्या लीकनुसार, Google Pixel 9 Pro XL ची किंमत, स्पेसिफिकेशन्स, पूर्णपणे उघड झाली आहे. या लीकमध्ये AI फीचर्ससंबंधी माहितीही दिली आहे.आजच्या या लेखात आपण Google Pixel 9 सिरीज मधील Pixel 9 Pro XL या स्मार्टफोन बद्दल संपूर्ण ,माहिती बघणार आहोत.

Google Pixel 9 Pro XL Expected Specifications

  • लीकनुसार, Google Pixel 9 Pro XL मध्ये 6.8 इंचाचा मोठा OLED डिस्प्ले असेल असे समोर आले आहे, ज्याचं रिजोल्यूशन 2992 x 1344 पिक्सल्स असेल आणि ब्राइटनेस 3,000 निट्स इतका असेल.तसेच यासाठी Corning Gorilla Glass Victus 2 सुरक्षा प्रदान करण्यात येईल. या प्रकारचा डिस्प्ले Pixel 8 Pro मध्ये दिलेला आहे 6.7 इंचाचा डिस्प्ले आहे. तसेच, काही लीकमध्ये Pixel 9 Pro XL च्या डिस्प्लेमध्ये 6.73 इंचाचा आकार आणि 2,050 निट्स ब्राइटनेस असण्याची माहिती दिली आहे.
  • Pixel चा हा फोन Tensor G4 चिपसेट आणि Titan M2 सुरक्षा चिपसह चालवला जाईल. या नवीन चिपसेटमुळे Pixel 8/8 Pro वरच्या Tensor G3 पेक्षा जास्त सुधारणा अपेक्षित आहे. तसेच अलीकडील आलेल्या रिपोर्टनुसार, Pixel 9 Pro XL Android 14 OS वर चालणार आहे, तर Android 15 वर नाही. कारण, या फोनचा लाँच सामान्यतः ऑक्टोबरच्या पूर्वी करण्यात येणार आहे.
  • Camera- Pixel 9 Pro XL या स्मार्टफोन मध्ये मागच्या बाजूला 50MP प्राथमिक कॅमेरा असेल. तसेच 48MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स असणार आहे.आणि 48MP टेलीफोटो सेंसर असेल आणि तसेच यामध्ये 5x टेलीफोटो जूम उपलब्ध असेल. जे की Pixel 8 Pro मध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा, 48MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा, आणि 48MP 5x जूम सेंसर दिलेला आहे.त्याचबरोबर सेल्फी काढण्यासाठी फ्रंटवर, Pixel 9 Pro XL मध्ये 42MP सेल्फी कॅमेरा असण्याची अपेक्षा आहे, जो Pixel 8 Pro च्या 10.8MP कॅमेराच्या तुलनेत एक मोठी सुधारणा असू शकते.ज्याने हा स्मार्टफोन सेल्फी साठी उपयुक्त होऊ शकतो.
  • लीकनुसार, Pixel 9 Pro XL मध्ये 16GB RAM आणि 1TB पर्यंत स्टोरेज पर्याय असेल. गुगल ने शेअर केलेल्या फोटोज मध्ये Google Pixel 9 Pro XL गुलाबी रंगात दिसत आहे. तसेच या मध्ये दिसत आहे की डिस्प्लेच्या एजेस फ्लॅट आहेत आणि बेजल्स पातळ आहेत. सेल्फीसाठी मध्यभागी पंच-होल कापलेले आहे. व फोनची बॉक्सी चेसिज गोलसर एजेससह आहे. मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा हॉरिझॉन्टल सेटअप दिलेला आहे,आणि त्याच्या बाजूला LED फ्लॅश दिलेला आहे. एका प्रतिमेत कॅमेरा UI मध्ये 10x जूम आणि Night Sight असलेला दिसत आहे.
  • Battery- Google Pixel 9 Pro XL मध्ये 5060mAh क्षमतेची बॅटरी असु शकते, जी जास्त कॅपॅसिटीसाठी ओळखली जाते. तसेच या फोनमध्ये 45W फास्ट चार्जिंग, 25W वायरलेस चार्जिंग आणि रिव्हर्स चार्जिंग यासारख्या सुविधांचा समावेश असू शकतो. यामुळे फोनची बॅटरी जलद चार्ज होईल, तसेच वायरलेस चार्ज होईल आणि इतर डिवाइस चार्ज करण्याची सुविधा देखील मिळेल.
  • AI– Google Pixel 9 Pro XL या स्मार्टफोन मध्ये Google AI च्या विविध सुविधांचा समावेश असणार आहे. या सुविधांमध्ये Pixel Studio असू शकतो, ज्याद्वारे AI द्वारे चित्रे तयार करता येतील. फोनमध्ये AI-प्रेरित Weather अँप असतील, Reimagine फंक्शन वापरून फोटोमधील वस्तू बदलता येईल, शेवटी, Screenshot Search फिचर तुमच्या इमेज गॅलरीतून विशिष्ट स्क्रीनशॉट शोधण्यासाठी दिलेले असतील. या बरोबर बरेच Ai फीचर्स या स्मार्टफोन मध्ये दिलेले असाव शकतात.
हे हि वाचा -  कोळगाव ते ब्लॉगर्सचे गाव! पाहा कशी मिळाली ही नवी ओळख - akshay raskar

Google Pixel 9 Pro XL Expected Price

Google Pixel 9 Pro XL च्या किंमतीसंबंधी माहिती अशी आहे की, 16GB RAM आणि 128GB बेस स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत $1,100 (सुमारे ₹92,300) असेल. तर 256GB स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत $1,200 (सुमारे ₹1,01,000) असण्याची शक्यता आहे. तर 512GB स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत EUR 1,429 (सुमारे ₹1,31,000) आणि EUR 1,689 (सुमारे ₹1,54,900) असेल. यासंबंधी US मध्ये अन्य मॉडेल्सच्या किंमतीची माहिती अद्याप उपलब्ध नाही.


FAQ

Google Pixel 9 Pro XL कधी लॉन्च होईल?

Google Pixel 9 Pro XL जागतिक स्तरावर 13 ऑगस्ट 2024 रोजी आणि भारतात 14 ऑगस्ट 2024 रोजी लॉन्च होणार आहे.

Google Pixel 9 Pro XL ची किंमत किती असु शकते ?

या स्मार्टफोन ची किंमत ही खालील प्रमाणे असू शकते
128GB स्टोरेज: $1,100 (सुमारे ₹92,300)
256GB स्टोरेज: $1,200 (सुमारे ₹1,01,000)
512GB स्टोरेज: EUR 1,429 (सुमारे ₹1,31,000)

Pixel 9 Pro XL आणि Pixel 8 Pro यामध्ये काय फरक आहे?

Pixel 9 Pro XL मध्ये थोडा मोठा डिस्प्ले असणार आहे,तसेच सुधारित AI फीचर्स, आणि अधिक भारी Tensor G4 चिपसेट असणार आहे. व फ्रंट कॅमेरा 10.8MP वरून 42MP पर्यंत वाढवलेला असणार आहे.

1 thought on “Google Pixel 9 Pro XL लवकरच भारतात लाँच होणार आहे.,बघा लीक झालेली किंमत,स्पेसिफिकेशन्स आणि Al फीचर्स.”

Leave a Reply