सध्या बाजारात नवीन नवीन प्रकारचे मोबाईल्स येत आहेत. बदलत जाणारी गरज, एक्स्ट्रा फीचर्स यांसह कंपनी आपल्या ग्राहकांना अधिकाधिक काय काय देऊ करता येईल ते सर्व अभ्यासून नवीन नवीन मॉडल्स बाजारात आणत आहे. याला xiaomi mix flip 14 ही अपवाद नाही.
आजकाल सगळेच डिजिटल झाल्यामुळे सगळ्यांचाच स्क्रीन टाईम वाढला आहे. कामासाठी आणि बदलत्या काळानुसार upgrade होण्याच्या नादात हे अपरिहार्य झाले आहे. प्रवासात, जरा निवांत वेळ मिळाला किंवा अगदी कोणत्याही परिस्थितीत सहज मोबाईल काढून सोशल मीडियावर फेरफटका मारायला सुरुवात होते आणि म्हणूनच आपला स्क्रीन टाईम अजूनच वाढत आहे. वर्तमान पत्रे, पुस्तके देखील आता ऑनलाईन वाचली जातात आणि यात अजूनच भर पडते.
ज्यांना ज्यांना स्क्रीन टाईम कमी करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी असे फ्लीप मोबाईल खूप उपयोगाचे आहेत. Fold मोबाईलमध्ये जेवढा स्क्रीन टाईम कमी होऊ शकणार नाही तेवढा flip mobile मध्ये शक्य होऊ शकतो. याचे डिझाईन सतत सोशल मीडियावर फेरफटका मारणाऱ्या लोकांच्या सवईसाठी चांगलेच औषध बनू शकते. Xiaomi चा हा पहिलाच flip mobile आहे. Xiaomi mix 14 flip हा मोबाईल चीनमध्ये लाँच झाला असून लवकरच भारतात देखील लाँच होण्याची शक्यता आहे. हा मोबाईल सॅमसंग, रियलमी अश्या कंपन्यांना बरोबरीची टक्कर देऊ शकतो. हा भारतातील पहिलावहिला क्लॅमशेल डिझाईनमधील foldable mobile आहे. चला तर मग बघूया या flip mobile ची संपूर्ण माहिती.
या मोबाईलमुळे स्क्रीन टाईम कसा कमी करता येईल?
Flip डिझाईनमुळे screen चा आकार निम्मा होतो आणि त्यामुळे जास्त सोशल मीडियावर suffering करणे हळूहळू कमी होऊ शकते. या मोबाईल मध्ये सगळ्यात लेटेस्ट चीप सेट वापरण्यात आला आहे. स्नॅप ड्रॅगन ८ जेन ३ चीप सेटचा यात वापर करण्यात आला आहे.
xiaomi mix flip 14 या मोबाईलचा डिस्प्ले कसा आहे?
यात दोन डिस्प्ले आहेत. आतील डिस्प्ले म्हणजेच मोबाईल ओपन केल्यावर असणारा मोठा डिस्प्ले ६.८६ इंचाचा आहे. बाहेरील लहान डिस्प्ले म्हणजेच मोबाईल फोल्ड केल्यावर असणारा लहान डिस्प्ले ४.०१ इंचाचा आहे. दोन्ही डिस्प्ले चे ब्राईटनेस, पिक्सेल खूपच उत्तम आहेत. दोन्ही डिस्प्ले AMOLED आहेत. दोन्ही डिस्प्लेचा रिफ्रेश रेट १२० hz एवढा आहे त्यामुळे अगदी उन्हात देखील हा मोबाईल चांगला वापरता येतो.
xiaomi mix flip 14 – कसे आहेत या मोबाईलचे कॅमेरे?
xiaomi mix flip 14 या मोबाईलमध्ये दोन बॅक कॅमेरे आणि एक फ्रंट कॅमेरा आहे. दोन्ही बॅक कॅमेरे ५० मेगा पिक्सेलचे आहेत तर फ्रंट कॅमेरा ३२ मेगा पिक्सेलचा आहे. या मोबाईल मधल्या कॅमेरांचे डिझाईन जरा वेगळे आहे. हे दोन्ही कॅमेरे व्हर्टिकल देण्यात आले आहेत त्यामुळे मोबाईल flip करूनही सहज स्क्रीन वापरता येते. Vertical दिसणारे व्हिडिओ, reels सहज flip स्क्रीनवर पाहता येतात. तेच इतर कंपनीच्या मोबाईल चे कॅमेरे horizontal असल्याने मोबाईल flip केल्यावर स्क्रीन वापरण्यात जास्त सोयीचे नसतात.
Xiaomi mix 14 flip ची बॅटरी / स्टोरेज / फीचर्स
xiaomi mix flip 14 या मोबाईल मध्ये ४७८० mAh ची बॅटरी आहे आणि ही बॅटरी ६७w च्या चार्जरला सपोर्ट करते. १२ जिबी RAM आणि २५६ जीबी ROM असे या मोबाईलच्या बेस व्हेरीयंटचे storage आहे. तर १६ जीबी RAM, १ टीबी ROM यातही हा मोबाईल उपलब्ध आहे. Flip डिझाईनमुळे screen चा आकार निम्मा होतो आणि त्यामुळे जास्त सोशल मीडियावर suffering करणे हळूहळू कमी होऊ शकते. या मोबाईल मध्ये सगळ्यात लेटेस्ट चीप सेट वापरण्यात आला आहे. स्नॅप ड्रॅगन ८ जेन ३ चीप सेटचा यात वापर करण्यात आला आहे.
कसे आहे या मोबाईलचे डिझाईन?
मोबाईलचे डिझाईन चांगले आहे. बॉडी स्लीपरी आहे त्यामुळे एका हाताने फोन उघडताना काळजी घ्यावी लागेल. फिंगरप्रिंट सेन्सर बाजूलाच आहेत. या flip mobile मध्ये आलेला कॉल उचलण्यासाठी फोन ओपन करण्याची गरज नाही. Flip असलेल्या लहान स्क्रीन वरूनच फोन उचलता येतो. बाकीच्या flip मोबाईलमध्ये ही सोय नाही.
- हा मोबाईल खरेदी केल्यावर यासोबत चार्जर अडोप्टर, चार्जिंग केबल, कव्हर आणि युजर manual मिळेल.
- xiaomi mix flip 14 या मोबाईलचे वजन किती आहे?
- अंदाजे या मोबाईल चे वजन १९३ ग्रॅम आहे.
अंदाजे या मोबाईलची किंमत काय असेल?
xiaomi mix flip 14 हा मोबाईल अजून भारतात लाँच झालेला नाही आणि चीन मधील किमतीच्या अंदाजानुसार आपण भारतात हा मोबाईल किती रुपयांपर्यंत लाँच होऊ शकेल याचा फक्त अंदाज बांधू शकतो.
चीन मध्ये हा मोबाईल ५९९९/- युआन मध्ये लाँच झालेला आहे. जर आपण हे भारतीय रुपयांमध्ये कन्व्हर्ट केले तर अंदाजे ७० ते ७५ हजार असेल. जर भारतात हा मोबाईल लाँच झालाच तर अंदाजे याची किंमत ९९०००/- किंवा त्यापेक्षा जास्त असू शकेल.
तुम्हाला काय वाटतंय कधी होईल हा मोबाईल भारतात लाँच? ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा.
2 thoughts on “बाजारात येणार या कंपनीचा हा पहिलावहिला फ्लिप फोन – Xiaomi mix Flip 14 चे पाहा काय आहेत फीचर्स”