Vijay Kadam Passed Away Today – ‘हळद रुसली कुकू हसला’ मधील प्रसिद्ध हास्य सम्राट आणि अभिनेते विजय कदम यांचे आज दिनांक १०/०८/२०२४ रोजी दुखद निधन झाले. विजय कदम (Vijay kadam) हे मागील जवळजवळ १८ ते वीस वर्ष अंथरुणाला धरून होते. त्यांना कर्करोग झाला होता आणि चांगल्या हॉस्पिटल मध्ये त्यांचा उपचारही चालू होता. परंतु उपचार दरम्यान शरीराने साथ सोडल्याने वयाच्या ६७ वर्षातच त्यांचा मृत्यू झाला. या बातमीने मराठी सिनेमा सृष्टीवर शोककळा पसरली आहे. ते मुंबईतच रहात असल्याने आज संध्याकाळी अंधेरी या ठिकाणी त्यांचे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
Vijay Kadam – वयाच्या ६७ वर्षी निधन झाल्यामुळे सर्व मराठी कलाकारांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचा मागे त्यांचा छोटासा परिवार म्हणजेच पत्नी आणि मुलगा आहे. मुंबई मधील अंधेरी या ठिकाणी ओशिवरा मध्ये त्यांचे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.
Vijay Kadam Filmi Life
जेष्ठ अभिनेते विजय कदम ( Vijay Kadam ) यांनी आपल्या करियरची सुरुवात हास्य नाटकांमधून केली. त्यांनी कम केलेली खूप नाटके गाजली हि. त्यांचा ‘ विच्छा माझी पुरी करा’, ‘रथचक्र’, ‘टूरटूर’ यांसारखी अनेक नाटके प्रेक्षकांनी डोक्यावर उचालुन धरली. विनोदी भूमिका मुळे त्यांची नाटके खूप प्रसिद्ध झाली त्यामुळे Vijay Kadam त्यांना मराठी चित्रपट हि काम मिळाले. अलका कुबल यांचा लोकप्रिय झालेला ‘हळद रुसली कुकू हसला’ या चित्रपटातील विजय कदम (Vijay Kadam) यांची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली. त्याचप्रमाणे त्यांनी ‘चष्मेबहाद्दर’, ‘पोलीसमन’, ‘ आम्ही दोघ राजाराणी’ असे अनेक प्रसिद्ध चित्रपट त्यांच्या पदरात पडले.
आज त्यांच्या (Vijay Kadam) पार्थिवावर अंधेरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, या ठिकाणी अनेक मराठी कलाकार, अनेक हिंदी सुपरस्टार तसेच राजकारणी लोक सुद्धा येण्याची शक्यता आहे.
विजय कदम (Vijay Kadam) यांच्या कारकिर्दीला मानाचा मुजरा आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
1 thought on “मराठी प्रसिद्ध अभिनेता विजय कदम यांचे दुखद निधन – Vijay Kadam Passed away today ”