चित्रपट अभिनेता आणि निर्माता भगवान दादा (Bhagwan Dada) यांचे शेवटचे दिवस का गेले गरिबीत?

By Swamini Chougule

Published on:

Bhagwan Dada
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


हिंदी सिनेमा जगतातील एक प्रसिद्ध अभिनेता म्हणून आपण भगवान आबाजी पलव म्हणजेच भगवान दादा (Bhagwan Dada) यांना ओळखतो. भगवान दादांनी त्यांच्या चित्रपट करिअरची सुरुवात चित्रपट ‛ क्रिमिनल’ ने अभिनेता म्हणून केली होती. चित्रपट अभिनेते भगवान दादा (Bhagwan Dada) यांचा जन्म 1 ऑगस्ट 1913 ला मुंबई इथे झाला.त्यांनी सुरवातीच्या काळात स्टंट चित्रपटात काम केले. पुढे त्यांनी स्वतःची चित्रपट कंपनी काढली.त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये त्यांनी अनेक उत्कृष्ट चित्रपट केले. त्यांनी फक्त अभिनेता म्हणून नाही तर चित्रपट निर्माता म्हणून ही चित्रपटसृष्टीत काम केलं. ते त्यांच्या काळातील पहिले डांन्सिंग आणि एक्शन हिरो मानले जातात. भगवान दादांनी त्यांच्या काळात त्यांच्या धडाकेबाज चित्रपटांच्यामुळे चित्रपटसृष्टीवर राज्य केलं.


भगवान दादांची चित्रपट कारकिर्द – Film career of Bhagwan Dada

बदला, बहाद्दूर, जलन, दोस्ती, शेक हॅंड, मतलबी,जीते रहो, भेदी बंगला, बचके रहना हे सिनेमे म्हणजे चाळीस आणि पन्नासच्या दशकातील एक वेगळा मार्ग चोखाळणाऱ्या प्रवृत्तीचे प्रतिक होते. त्याकाळातील इतर स्टंटपटांशी तुलना करता (फियर लेस नादिया-जोन कावस यांचे चित्रपट) भगवान यांच्या सिनेमात भावनाप्रधानता असायची, आईच वात्सल्यमय कॅरेक्टर असायचं. त्यामुळे दादांच्या स्टंटपटाला सोशल सिनेमाचा कुटुंब वत्सल प्रेक्षक वर्ग लाभत असे. भगवान दादांनी त्यांच्या करिअरमध्ये निर्माता म्हणून ‛बहादूर’ ‛किसान’ सारखे हिट चित्रपट बनवले होते.त्यांचा चित्रपट ‛आलबेला’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता


त्याच्या चित्रपट कारकिर्दीला लागलेली उतरती कळा

पण झमेला आणि लबेलासारख्या चित्रपटांमुळे त्यांचा स्वप्नभंग होऊ लागला. त्यानंतर भगवान दादांच्या (Bhagwan Dada) आयुष्यातील सगळ्यात कठीण काळ सुरू झाला होता. लाल्लू भाई मेन्शन या चाळीत त्यांचे बालपण गेले भगवान दादांना त्यांच्या आलिशान बंगल्यातून त्याच चाळीत पुन्हा राहायला जावे लागले. जणू नियतीचे एक चक्र पूर्ण झाले. ज्याकाळात लोकांकडे एक सुद्धा चारचाकी गाडी नव्हती त्या काळात भगवान दादांकडे सात चारचाकी गाड्या होत्या.ते पंचवीस खोल्यांच्या बंगल्यात राहत होते.एकेकाळी ऐशो आरामात आयुष्य घालवणारे भगवान दादा त्याच्या शेवटच्या काळात चाळीत राहत होते


भगवान दादा (Bhagwan Dada) का आले अर्शवरून फर्षवर?

भगवान दादांनी ( Bhagwan Dada ) ‛हसते रहना’ चित्रपटाची निर्मिती करायला सुरुवात केली आणि त्यात लिड रोल करण्यासाठी किशोर कुमारला घेतले. पण बोलले जाते की किशोर कुमारनी इतके नखरे केले की त्यांना त्या चित्रपटाची निर्मिती मध्येच बंद करावी लागली. भगवान दादांनी या चित्रपट बनवण्यासाठी आयुष्य भराची कमाई लावली होती. पण चित्रपटाची निर्मिती मध्येच बंद करायला लागली त्यामुळे त्यांना त्यांची सगळी मालमत्ता विकावी लागली आणि नाईलाजास्तव चाळीत जाऊन आयुष्य घालवावे लागले.


भगवान दादांची डान्स करण्याची एक वेगळी शैली – Bhagwan Dada’s unique style of dancing

खरं तर डान्सची वेगळी शैली हाच भगवान दादांचा ( Bhagwan Dada ) ‛ प्लस पॉईंट’ होता.नाचता नाचता हळुवार खांदे उडवण्याची त्यांची अफलातून शैली प्रचंड लोकप्रिय ठरली. सुपरस्टार अमिताभ बच्चन, कमल हसन आदी कलाकारांनी हीच शैली जशीच्या तशी उचलली. चोरी चोरी, झनक झनक पायल बाजेमधील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या.


उतरत्या काळात डान्सनेच तारले


अलबेलाचे त्यांचे यश शापित ठरले आणि त्यांचे झमेला, कर भला तो हो भला, लाबेला, शोला जो भडके, रंगीला यातील एकाला ही यश मिळाले नाही.सिनेमा निर्मिती उद्योगात हात पोळून निघालेल्या दादांनी काळाची पावले ओळखली आणि त्यांनी त्यांचे पूर्ण लक्ष डान्सवर केंद्रित केले.पुढे अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटात ते नाचू लागले.आपल्या दादा कोंडके यांच्या बरोबर ही भगवान दादांची जोडी छान जमली होती.


‛एक अलबेला’ भगवान दादांच्या बायोपिकबद्दल

भगवान दादांचा चरित्रपट ‛एक अलबेला’ या नावाने 24 जून 2016 ला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची निर्मिती मंगलमूर्ती फिल्मस आणि किमया मोशन पिचर्स या चित्रपट कंपन्यांनी केली असून या चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर सारतांडेला यांनी केले. चित्रपटात भगवान दादांच्या भमिकेसाठी बऱ्याच कलाकार आणि लुक्स पाहिल्या नंतर मंगेश देसाई यांना ही भूमिका करायला मिळाली होती. मेकअपमन विद्याधर भट्टे असतील हे आधीच ठरले होते कारण त्यांनी भगवान दादांबरोबर काम केलं होतं. पण खरं आव्हाहन तर मंगेश देसाई यांच्या समोर होते कारण भगवान दादांच्या चित्रपटाच्या सगळ्या रीळ त्यांच्या गोडावूनला आग लागली तेंव्हा जळल्या होत्या. सुदैवाने त्यांच्या ‛अलबेला’ या एकाच चित्रपटाची रीळ वाचली होती आणि तो एकच चित्रपट भगवान दादांची भूमिका साकारताना अभ्यासण्यासाठी मंगेश देसाई यांच्याकडे होता. मंगेश देसाई यांनी तो चित्रपट भगवान दादांची भूमिका साकारताना अनेक वेळा पाहिला होता असं मंगेश देसाई यांनी सांगितले होते.

भगवान दादांना त्यांच्या जुहूमधील बंगाला आणि सात गाड्या विकाव्या लागल्या. ते आठवड्यातील सात दिवस वेगवेगळ्या वारी वेगवेगळ्या कारचा वापर करत असत. राजासारखे आयुष्य जगलेल्या भगवान दादांना त्यांचे शेवटचे दिवस लल्लू भाई मेशन्स चाळीतील छोट्या खोलीत घालवले. भगवान दादांचा मृत्यू 4 फेब्रुवारी 2002 मध्ये वयाच्या 88 व्या वर्षी हार्ट अटॅकने झाला.

या महिन्यात श्रद्धा कपूर चा हॉरर स्त्री दोन (STREE 2) चित्रपट येतोय, पहायला विसरू नका

Leave a Reply