Magnificent Shreyas Iyer : 51-ball century in Vijay Hazare Trophy
Mumbai vs Karnataka : Vijay Hazare Trophy
- विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात
- पहिल्याच सामन्यात शतकी खेळी
Vijay Hazare Trophy : Shreyas Iyer rattles Karnataka with 50-ball century, 10 sixes : भारतात विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिल्याच दिवशी मुंबई आणि कर्नाटक या दोन्ही संघांमध्ये सामना पार पडला. या सामन्यात मुंबईचा कर्णधार श्रेयस अय्यरच्या फलंदाजीचा कहर पाहायला मिळाला आहे.
कर्नाटकविरुद्धच्या सामन्यात तुफान फटकेबाजी करताना, त्याने 51 चेंडूंचा सामना करत 114 धावांची खेळी केली आहे. त्याने आपल्या खेळीदरम्यान 5 चौकार आणि 10 षटकार मारले.
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा ही श्रेयस अय्यरसाठी अतिशय महत्वाची असणार आहे. येत्या काही दिवसात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात होणार आहे. अय्यर 4 महिन्यांपूर्वी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघासाठी खेळताना दिसून आला होता. त्यानंतर त्याला भारतीय संघासाठी खेळण्याची संधी मिळालेली नाही. या स्पर्धेत दमदार कामगिरी करुन तो भारतीय संघात कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. त्या दिशेने त्याने एक पाऊस टाकलं आहे.
या सामन्यात फलंदाजी करताना, अय्यरने 207 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. त्याने 55 चेंडूंचा सामना केला आणि 114 धावा केल्या. अय्यरला साथ देत आयुष म्हात्रेने 78, यष्टीरक्षक फलंदाज हार्दिक तामोरेने 84 धावांची खेळी केली. यासह शिवम दुबेने 63 धावांचे योगदान दिले. या तुफन फटकेबाजीच्या बळावर मुंबईने 50 षटकअखेर 382 धावा केल्या.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यरची दमदार कामगिरी सुरुच आहे. वर्ल्डकप 2023 स्पर्धेत अय्यरने दमदार फलंदाजी केली होती .मात्र त्यानंतर दुखापतीमुळे संघाबाहेर व्हावं लागलं होतं. त्यानंतर त्याने कमबॅक केलं, मात्र त्याने देशांतर्गत क्रिकेट सामन्यांना पाठ फिरवली होती. आता त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्येही दमदार कामगिरी करत भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी दावा ठोकला आहे.
#ShreyasIyer #VijayHazareTrophy #MumbaiCricket #KarnatakaCricket #Century #CricketHighlights #DomesticCricket #CricketIndia #Sixes #BattingPerformance #CricketFans #SportsNews #CricketLovers #IndianCricket #MatchHighlights #CricketLife #InstaCricket #CricketCommunity #CricketUpdates #CricketPassion