3 dead, 6 injured after drunk truck driver runs over them in Pune
3 killed in Pune after dumper driver runs over them on footpath
पुणे : अमरावतीवरून कामासाठी पुण्यात आलेल्या 9 जणांना पुण्यातील वाघोली केसनंद परिसरात डंपरने चिरडलं. पुण्यात काम शोधण्यासाठी आलेल्या या कामगारांनी फुटपाथवर आसरा घेतला होता. पण भरधाव वेगाने आलेल्या डंपरने 9 जणांना चिरडले. यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर मृतांमध्ये एक आणि दोन वर्षांच्या चिमुकल्यांचा समावेश आहे.
3, including 2 toddlers, killed after drunk truck driver runs over family of migrant workers on footpath in Pune
पोलिसांनी तात्काळ डंपर चालकाला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींनी माहिती देताना सांगितलं की, जर तो डंपर दुसऱ्या बाजुला वळला असता तर आणखी 15-16 जणांचा बळी गेला असता, घटनास्थळी असलेल्यांनी आरडाओरड केली आणि डंपर दुसऱ्या बाजुला घालायला सांगितलं मात्र, त्यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत.
मद्यधुंद अवस्थेत असलेल्या डंपर चालक गजानन शंकर तोट्रे (26 वर्षे रा. नांदेड) याला अटक केली असून त्याच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी गजानन हा मुळचा नांदेडचा आहे, अपघातातील मृत कामगार हे मुळचे अमरावतीतील आहे. ही घटना रात्री बारा ते एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. जखमी कामगारांवर सध्या ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. हे सर्व कामगार आहेत
रविवारी रात्री ते अमरावतीवरून पुण्यात कामासाठी आले होते. या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींनी माहिती देताना सांगितलं, आम्ही 40 जण कामासाठी इथे पुण्याते आलो आहोत, इकडे काम भेटतं म्हणून आम्ही अमरावती वरून पुण्याला काल रात्री आलो. आम्ही चार वर्षाआधी पण इथे काम करत होतो. आम्ही इथेच राहतो. गेल्या चार वर्षापासून आम्ही इथून कुठे गेलो नाही, आम्ही इथे झोपल्यानंतर डंपर चालक सरळ अंगावर आला, आणि बाळांच्या अंगावर घातला’.
दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शीनी या घटनेबाबत बोलताना सांगितलं, सर्वजण झोपले होते. बारा एक वाजण्याच्या सुमारास डंपर फुटपाथवरून आत घुसल्यानंतर आरडाओरडा सुरू झाली. त्यानंतर आम्ही सगळे उठलो, डंपर चालकाने मुलांना चिरडलं होतं. तसाच तो पुढे गेला. आम्ही कालच अमरावती वरून पुण्याला आलो होतो, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.
जखमीमधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास पुण्यातील वाघोलीतील केसनंद फाटा येथे घडली. डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. वैभवी रितेश पवार ( वय 1 वर्ष ), वैभव रितेश पवार (वय 2 वर्ष), रीनेश नितेश पवार (वय 3) वर्षे अशी मृत्युमुखी झालेल्यांची नावे तर इतर सहाजण जखमी आहेत.
मृत झालेल्यांची नावं –
1. विशाल विनोद पवार वय 22 वर्ष, रा. अमरावती मूळ जिल्हा
2. वैभवी रितेश पवार वय 1 वर्ष
3. वैभव रितेश पवार वय 2 वर्ष
जखमी झालेल्यांची नावं-
1. जानकी दिनेश पवार, 21 वर्षे
2. रिनिशा विनोद पवार 18
3. रोशन शशादू भोसले, 9 वर्षे
4. नगेश निवृत्ती पवार, वय 27 वर्षे
5. दर्शन संजय वैराळ, वय 18
6. आलिशा विनोद पवार, वय 47 वर्षे
#Pune #Accident #DumpTruck #RoadSafety #Injury #Fatalities #Witness #EmergencyResponse #PoliceArrest #DrunkDriving #ConstructionWorkers #Amravati #TrafficAccident #SafetyFirst #CommunitySupport #Victims #LocalNews #Awareness #JusticeForVictims #TragicEvent
3 killed in Pune dumper driver footpath
3 killed in Pune dumper driver footpath