सरकार जनतेला जास्तीत जास्त लाभ मिळावेत यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवत असते. सध्याची लाकडी बहीण योजना, मुलींना मोफत शिक्षण योजना आणि शेतकऱ्यांचा विचार करून त्यांच्यासाठी राबवण्यात येणाऱ्या योजना देखील आहेत पण आता लहान मुलांचा विचार करून bal sangopan yojana आणली गेली आहे. चला तर मग जाणून घेऊया या योजनेची संपूर्ण माहिती.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले bal sangopan yojana अंतर्गत एकल पालक असणाऱ्या मुलांना आता २२५०/- रू. मिळणार आहेत. आधी ही रक्कम ११००/- रू. होती. यात आता वाढ करून २२५०/- रू. या योजने अंतर्गत मिळणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी निराधार महिला, घटस्फोटित महिला, निराधार महिला यांनी नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागात अर्ज करणे गरजेचे आहे.
bal sangopan yojana अंतर्गत मिळणार २२५०/- रू.
कोरोना काळापासून या योजनेच्या लाभार्थी संख्येत चांगलीच वाढ झाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला व बालकल्याण विभागातील कुटुंब संरक्षण अधिकाऱ्यांकडून अर्ज भरून तो भरावा.
या योजनेसाठी पात्रता ठरवताना सर्वात आधी अर्जदाराची गृह चौकशी करण्यात येते. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत असेल आणि खरंच अर्जदार गरजू असेल तरच या योजनेचा लाभ घेता येतो.
bal sangopan yojana अंतर्गत मिळणारा लाभ
bal sangopan yojana अंतर्गत मुलांना आधी दरमहा ११००/- रू. मिळत होते ते आता २२५०/- रू. केले असून स्वयंसेवी संस्थांच्या सहायक अनुदानात १२५/- रू. वरुन २५०/- रू. अशी वाढ करण्यात आली आहे.
या योजने अंतर्गत बालकांना अन्न, वस्त्र, निवारा, वैद्यकीय सुविधा, शिक्षण इत्यादी सुविधा कुटुंबा मार्फत देण्यात येतात.
बाल संगोपन योजनेची उद्दिष्ट्ये
१. ज्या बालकांचे पालक काही कारणांमुळे जसे आजार, विभक्त होणे, मृत्यू किंवा काही आपत्तीमुळे काळजी घेण्यास असमर्थ असणे यामुळे मुलांना तात्पुरते दुसरे कुटुंब उपलब्ध करून देणे.
२. राज्यातील निराधार, बेघर व संरक्षण, निवाऱ्याची गरज असलेल्या ० ते १८ वयोगटातील मुला मुलींना संस्थेत दाखल करून घेण्याऐवजी पर्यायी कुटुंब उपलब्ध करून देणे.
३. प्रत्येक बालकाचा एक कुटुंब असणे हा हक्क असतो. कुटुंबात ज्याप्रमाणे काळजी घेतली जाते त्याप्रमाणे घेतली जाणे प्रत्येकाचा हक्क आहे म्हणूनच जोपासना कार्यक्रमाअंतर्गत मुलांना अल्प किंवा दीर्घ काळासाठी कुटुंब उपलब्ध करून देणे.
बाल संगोपन योजनेच्या नियम व अटी
- bal sangopan yojana या योजनेचा लाभ एकल पालक म्हणजेच सिंगल पालक असलेल्या मुलांना मिळतो. ज्या मुलांचे आई किंवा वडील वारले आहेत, ज्या मुलांच्या पालकांना कॅन्सर, HIV किंवा कोणता दुर्धर आजार आहे किंवा कैद्यांच्या मुलांना या योजनेचा लाभ मिळतो.
- या योजनेचा लाभ फक्त दोन अपत्यांना मिळतो. वरील मुद्द्यातील जे पालक ग्राह्य आहेत त्यांच्या दोन अपत्यांना दरमहा २२५०/- (दोन हजार दोनशे पन्नास रुपये) अनुदान म्हणून मिळतात. यासाठी दोन्ही अपत्यांचे वेगवेगळे फॉर्म भरणे गरजेचे आहे. मुलांच्या वयाच्या १८ व्या वर्षी पर्यंत या योजनेचा लाभ घेता येतो.
- घटस्फोटीत किंवा कुमारी माता असलेल्या महिलांच्या मुलांनाही या योजनेचा लाभ घेता येतो. यासाठी घटस्फोटीत महिलांनी तसे पुरावे सादर करणे आवश्यक असते.
बाल संगोपन योजने साठी लागणारी कागदपत्रे
- योजनेचा अर्ज (कुटुंब संरक्षण अधिकाऱ्यांकडून हा अर्ज घेता येतो.)
- पालकाचे आणि अपत्याचे आधार कार्ड
- अपत्याचे शाळेचे डोमेसाईल certificate
- उत्पन्नाचा दाखला
- पालकांचा मृत्यू झालेला असल्यास मृत्यू प्रमाणपत्र (Death certificate)
- ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेचा पालकांचा रहिवासी दाखला
- अपत्याचे बँक खाते पासबुक (जर अपत्याचे खाते नसेल तर पालकाचे बँक खाते पासबुक)
- Covid मुळे पालकाचा मृत्यू झालेला असल्यास मृत्यू अहवाल
- रेशन कार्ड
- ४ बाय ६ म्हणजेच पोस्ट कार्ड आकाराचा घरासमोर काढलेला पालकाचा आपल्या अपत्यासोबतचा रंगीत फोटो. जर दोन अपत्ये असतील तर दोन्ही अपत्यांसोबत वेगवेगळे फोटो.
- अपत्याचे passport आकाराचे तीन फोटो.
Apply for Bal Sangopan Yojana (बाल संगोपन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया)
- bal sangopan yojana या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अंगणवाडी सेविका, स्वयंसेवी संस्था, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (नागरी, ग्रामीण आदिवासी) किंवा जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद या ठिकाणी अर्ज करणे गरजेचे आहे.
- अर्ज केल्या नंतर स्वयंसेवी संस्था व जिल्हा बाल संरक्षण कक्ष अर्जांची छाननी करून परिपूर्ण अर्ज जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयात सादर करतील.
- जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी सूचित करून दिलेल्या स्वयंसेवी संस्था त्यांच्या कार्यक्षेत्रातील अर्ज जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचेकडे सादर करतील. तसेच इतर कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांचे अर्ज अंगणवाडी सेविका मार्फत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, वन स्टॉप क्रायसिस सेंटर), चाईल्ड लाईन, एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालय, तालुका स्तरीय संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) यांचेमार्फत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय यांच्या कार्यालयात प्रस्ताव पाठवतील.
- ग्राम बाल संरक्षण समिती, तालुका बाल संरक्षण समिती व वॉर्ड बाल संरक्षण समिती या ठिकाणी त्यांच्या पातळीवर बालकांचे अर्ज घेऊन प्रत्यक्ष अथवा अंगणवाडी सेविकेमार्फत संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयात सादर करता येतील.
- जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय येथे बालसंगोपन योजनेच्या लाभासाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर गृहभेट व सामजिक तपासणी अहवालाकरिता आदेश मिळण्यासाठी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांनी ०८ दिवसाच्या आत बाल कल्याण समितीकडे प्रस्ताव पाठवतील.
2 thoughts on “बाल संगोपन योजने अंतर्गत मुलांना मिळणार २२५० रुपये – bal sangopan yojana”