वास्तू कलेचा अद्भुत नमुना असलेल्या kopeshwar temple, खिद्रापूर मंदिराला संवर्धनासाठी 21 कोटींचा निधी

Swamini Chougule
5 Min Read
kopeshwar temple

आपल्या महाराष्ट्रात अनेक पुरातन आणि ऐतिहासिक वास्तू आहेत. आपल्या राज्यात वास्तू कलेचे खूप सुंदर आणि उत्कृष्ट नमुने आपल्याला पाहायला मिळतात. मग अजंठा वेरूळच्या लेण्या असो वा मग गडकोट असोत. असाच वास्तुकलेचा एक सुंदर आणि अद्भुत नमुना कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर या ठिकाणी आहे. kopeshwar temple बाराव्या शतकातील शिल्पकलेचा अद्भुत नमुना आहे.

कोपेश्वर मंदिराची आख्यायिका – Legend of Kopeswara Temple

कोपेश्वर महादेव हे वास्तुकलेचा आणि शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले हे मंदिर या मंदिराची आख्यायिका ही खूप रोचक आहे. इथल्या महादेवाचे नाव कोपेश्वर आहे. कोपेश्वर म्हणजे रागावून तिथे जाऊन बसलेला महादेव. दक्ष कन्या सतीने दक्षाने आयोजित केलेल्या यज्ञात वडिलांनी महादेवाचा अपमान केला म्हणून सतीने उद्धविग्न होऊन यज्ञात उडी घेतली आणि महादेवांनी दक्षाचा यज्ञ उध्वस्त केला.त्यानंतर सतीच्या विरहाने ते कोपुन खिद्रापूरमध्ये जाऊन बसले. मग त्याची समजूत काढण्यास विष्णू गेले. त्यामुळे मंदिराच्या गर्भगृहात दोन शाळुंका आहेत. एक कोपेश्वर आणि दुसरा त्याहून उंच धोपेश्वर! दुसरे एक वैशिष्ट्य म्हणजे इथे मंदिरात नंदी नाही. तो काही बारा किलोमीटर अंतरावर मंदिराच्या नैऋत्य दिशेला कर्नाटकातील यडूर या गावी आहे.आणि खिद्रापूर येथील kopeshwar temple पूर्व दिशेला तोंड करून आहे तर यडूर येथील नदीचे तोंड पश्चिम दिशेला आहे.

कोपेश्वर मंदिराची रचना कशी आहे? – How is the structure of Kopeshwar Temple?

मुख्य मंडपापासून किंचित विलग असलेला खुला मंडप, आच्छादित मंडप, अंतराळ आणि गर्भगृह असा कोपेश्वर मंदिराची रचना आहे. गर्भगृहाच्या कपोतालीवर मुख्य शिखराची प्रतिकृती असलेल्या छोट्या शिखरांची ओळ आहे. अंतराळ आणि मंडप यांचे मूळ छप्पर अस्तित्वात नाही. मंडपापासून काहीसा विलग असलेला खुल्या मंडपाला स्वर्गमंडप म्हणून ओळखले जाते, त्याला कधीच छत नव्हते. कोपेश्वर मंदिर हे पूर्वाभिमुख असून सर्वात पुढच्या बाजूस मुखमंडपाऐवजी त्रिरथ तलविन्यासाचा पूर्णमंडप आहे. मंडपाच्या मध्यभागी वर्तुळाकार रंगशिळा असून तिच्याभोवती अपूर्ण घुमटाकार छताला पेलणारे बारा स्तंभ आहेत. या स्तंभांच्या आतील भागावर कार्तिकेय आणि अष्टदिक्पाल वाहनांसह दाखविलेले आहेत. या बारा स्तंभांच्या मागे तुलनेने कमी रुंदीचे नऊ स्तंभ आहेत.

स्वर्गमंडपाच्या आत सभामंडप आहे. या सभामंडपाच्या उत्तर आणि दक्षिण दिशांना प्रवेशद्वारे आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला लगतच एकेक स्तंभ व त्याखालील कोनाड्यात व्याल आहेत. सभामंडपाच्या मधल्या बारा स्तंभांभोवती वीस चौकोनाकृती स्तंभ आहेत. या स्तंभांच्या रांगांपलीकडे सभामंडपाच्या भिंती आहेत. या सभामंडपाच्या दोन्ही बाजूंना प्रकाशासाठी गवाक्षे आहेत. मंडपातून अंतराळात जाताना प्रवेशमार्गापाशी दोन्ही बाजूंना द्वारपालाच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाचे द्वार पंचशाख प्रकारचे आहे. गर्भगृहात दोन शिवलिंगे आहेत.

सभामंडपात जाताना दरवाजाच्या दोन्ही बाजूस नक्षीदार जाळ्या बसवलेल्या आहेत. त्या जाळ्यांवरचे दगडात कोरलेले हत्ती खूप सुंदर आहेत. दरवाजाच्या पायथ्याशी दोन्ही बाजूला पाच-पाच द्वारपाल आहेत. मुख्य सभामंडपही खूप सुंदर आहे. पुढे गर्भगृहात जाताना प्रवेशद्वाराच्या पायाशी रांगोळीसारखी सुरेख नक्षी कोरलेली दिसते. गर्भगृह जरासे अंधारे आहे. परंतु डोळे सरावल्यानंतर आतमध्येही सुंदर मूर्ती आहेत असे लक्षात येते. या सर्व मूर्तीमध्ये त्यांचा आकार, प्रमाणबद्धता विशेष उठून दिसतात.

A huge fund of Rs 21 crores for the conservation of Kopeshwar temple

हे मंदिर बाराव्या शतकातील शिल्पकलेचा अद्भुत नमुना असलेल्या हेमाडपंथी श्री kopeshwar temple जनत आणि संवर्धनासाठी तसेच परिसराचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून 21 कोटी रुपयांचा भरघोस निधी प्राप्त झाल्याने श्रीक्षेत्र कोपेश्वर मंदिर परिसराचा विकास होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या बजेटमध्ये या कामाचा समावेश करण्यात आला आहे.या कामाची निविदा प्रक्रिया प्रसिद्ध झाली असून प्रत्यक्षात या कामाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती डॉ. राजेंद्र पाटील- यड्राकर यांनी दिली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने खिद्रापूर येथील kopeshwar templeदुरुस्ती व सुशोभीकरण करण्यासंदर्भात किमया कॉन्सर्वेशन व आर्किटेक या फर्मची नेमणूक केली होती. त्या अनुषंगाने त्यांनी मंदिराचा अहवाल सादर केला.

अतिवृष्टी व सातत्याने आलेला महापूर या नैसर्गिक आपत्तीमुळे kopeshwar temple ला तडे गेले आहेत व झीज झाली आहे. त्या ठिकाणी रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली जाणार आहे. याशिवाय मंदिर परिसराचे सुशोभीकरण या निधीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. हे मंदिर पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असल्याने या मंदिरच्या जतन व संवर्धनाच्या प्रस्तावाला केंद्रीय पुरातत्व विभागाने मान्यता दिली आहे.

त्यानुसार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने खिद्रापूर कोपेश्वर मंदिराचे जतन, संवर्धन, दगडी फरस बंदी तसेच परिसराचा विकास करण्यासाठी २१ कोटींच्या कामाची निविदा प्रसिद्ध केली असून प्रत्यक्षात लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. या कामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे सहकार्य लाभले. प्राचीन शिल्पकलेचा अद्भूत नमुना असलेल्या हेमाडपंथी कोपेश्वर मंदिराला अनेक नैसर्गिक आपत्तींमुळे तडे जाऊन व झीज होऊन मंदिराला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या मंदिराचे जतन व संवर्धन करणे गरजेचे होते. त्यानुसार या मंदिराला निधी प्राप्त झाला असल्याचे आमदार यड्रावकर यांनी सांगितले. आता या मंदिराचे जतन, संवर्धन आणि सुशोभिकरन होणार आहे त्यामुळे खिद्रापूरचे नागरिक आणि भाविकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

- Advertisement -
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *