2025 Karnataka 2nd PUC preparatory exam
बेळगाव—belgavkar—belgaum : @कर्नाटक : पीयुसी द्वितीय वर्षाची पूर्वतयारी परीक्षा बुधवार दि. 15 जानेवारी पासून होणार आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मुख्य परीक्षा होणार असल्याने पूर्वतयारी परीक्षा लवकर घेतली जाणार आहे. पदवीपूर्व शिक्षण विभागाने पूर्वपरीक्षेची जय्यत तयारी केली असून निकालवाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे.
15 ते 27 जानेवारी दरम्यान बारावीची पूर्वतयारी परीक्षा
विद्यार्थ्यांच्या आयुष्यात महत्त्वाची असलेली बारावीची मुख्य परीक्षा लवकरच होणार आहे. या परीक्षेची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, यासाठी पूर्वतयारी परीक्षा घेतली जाते. 15 ते 27 जानेवारी दरम्यान बारावीची पूर्वतयारी परीक्षा होणार आहे. विज्ञान, वाणिज्य व कला शाखेतील विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
पीयुसी द्वितीय वर्षात सध्या शिकत असलेले 21 हजार 517 नियमित विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. याबरोबरच यापूर्वी अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थीदेखील बहिस्थ पद्धतीने परीक्षा देणार आहेत. त्यामुळे ही संख्या 23 ते 24 हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकते. त्यादृष्टीने पदवीपूर्व शिक्षण विभागाने परीक्षेची तयारी सुरू केली आहे.
निकालवाढीसाठी अनेक उपक्रम : पीयुसी द्वितीय वर्षाची परीक्षा जवळ आल्याने निकालवाढीसाठी पदवीपूर्व विभागाने अनेक उपक्रम राबविले आहेत. सध्या अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांचे अधिक वर्ग भरविले जात आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे गट तयार करण्यात आले असून निकालवाढीसाठी प्रयत्न केला जात आहे.
– एम. एम. कांबळे (पदवीपूर्व शिक्षणाधिकारी)
Karnataka 2nd PUC preparatory exam
Karnataka 2nd PUC preparatory exam