बेळगाव—belgavkar—belgaum : उचगाव बसस्थानकाशेजारी असलेल्या राहत्या घरांच्या समोर लावलेल्या 2 दुचाकी वाहने चोरट्यांनी लांबवल्याने या वाहनधारकांना दोन लाखाचा भुर्दंड सहन करावा लागला असून उचगाव परिसरात या घटनेमुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
घटनेची अधिक माहिती अशी की, उचगाव अॅप्रोच रोडपासून शंभर फूट अंतरावर असलेल्या गुंडू लक्ष्मण जाधव या नागरिकाची स्प्लेंडर मोटारसायकल ही गाडी रात्री साडेतीनच्या सुमाराला चोरीला गेली आहे. तर सबिर जमादार यांची उचगाव अॅप्रोच रोडवरील रस्त्याच्या दुतर्फा लावलेली हिरो होंडा गाडी चोरीला गेली आहे. रात्री बाराच्या सुमाराला चोरी गेली असावी, असा जमादार यांचा अंदाज आहे.
सदर ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असल्याने सीसीटीव्ही कॅमेरामध्ये सदर चोर कैद झाल्याचेही जमादार यांच्याकडून सांगण्यात आले. मोटारसायकली चोरी गेल्याची नोंद काकती पोलीस स्टेशनमध्ये केली असून पोलीस स्टेशनकडून याचा तपास सुरू आहे.
2 two-wheelers stolen Uchgaon bus stand Belgaum
2 two-wheelers stolen Uchgaon bus stand Belgaum