बेळगाव : सराफी दुकान फोडण्याचा प्रयत्न… कणबर्गीतील 2 जणांना अटक

Belgaum Belgavkar
2 Min Read

बेळगाव—belgavkar—belgaum : रामतीर्थनगर येथील सराफी दुकान फोडण्यासाठी जय्यत तयारी करून आलेल्या दोघांना माळमारुती पोलिसांनी जेरबंद केले. गस्तीवर असलेल्या पोलिस कॉन्स्टेबलच्या प्रसंगावधानामुळे चोरट्यांना पकडण्यात यश आले. किरण कृष्णा येळ्ळूरकर (वय 28) व रोहित केदारी उचगावकर (वय 24, दोघेही रा. सिद्धेश्वर गल्ली, कणबर्गी) अशी संशयितांची नावे आहेत.

 

 

उपरोक्त दोघे संशयित गुरुवारी पहाटेच्या सुमारास रामतीर्थनगर परिसरात फिरत होते. ते फिरत असलेल्या भागातच चेतन वासुदेव शिरोडकर (रा. बसवेश्वर गल्ली, रामतीर्थनगर) यांच्या मालकीचे कामाक्षी ज्वेलर्स हे सराफी दुकान आहे. उपरोक्त दोघे संशयित पहाटे 4.30 च्या सुमारास सराफी दुकान फोडण्याचा प्रयत्न ऑक्सिजन सिलिंडर, एलपीजी सिलिंडर गॅस कटर घेऊन फिरत होते. गॅस कटरद्वारे सराफी दुकानाचे लॉक तोडून चोरीचा त्यांचा प्रयत्न होता.

- Advertisement -

 

 

 

माळमारुती पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल मल्लिकार्जुन गाडवी हे पहाटेच्या वेळी परिसरात गस्तीवर होते. त्यांच्या वाहनाचा प्रकाशझोत पडताच सावध झालेले हे संशयित दुकानापासून काही अंतरावर जाऊन थांबले होते. त्यांनी त्यांच्याकडील साहित्य बाजूला फेकले होते. तरीही गाडवी यांना दोघांचा संशय आला. संशयावरून त्यांना पोलिस ठाण्यात आणले. पोलिसी खाक्या दाखवताच त्या दोघांनी चोरीसाठी गेल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांनी सराफी दुकानापासून काही अंतरावर फेकलेली दोन सिलिंडर व गॅस कटर जप्त करण्यात आले.

बेळगाव शहरातील बहुतांशी चोऱ्या व घरफोड्या रात्री अथवा पहाटेच्या वेळी होत आहेत. पोलिसांनी नियमित गस्त घातली की चोरट्यांना पकडणे अवघड नाही, हेच या कॉन्स्टेबलने दाखवलेल्या तत्परतेतून दिसून येते. या कार्यतत्परतेमुळे लाखो रुपयांचे दागिने चोरी होण्यापासून वाचले आहेत. त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.

 

#Belgaum #Kanbargi #JewelryRobbery #PoliceArrest #CrimeNews #SafetyFirst #CommunityWatch #VigilantPolice #LocalNews #BelgaumPolice #RobberyAttempt #CrimePrevention #PublicSafety #NeighborhoodWatch #PolicePatrol #JewelryStore #ThievesCaught #LawEnforcement #CrimeAlert #BelgaumCity

2 people arrested Kanbargi Robbery jewelry shop Belgaum
2 people arrested Kanbargi Robbery jewelry shop Belgaum

2 people arrested Kanbargi Robbery jewelry shop Belgaum

TAGGED:
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *