₹ 100 Crores To Develop Saundatti Yallamma Temple
बेळगाव—belgavkar—belgaum : केंद्र सरकारच्या पर्यटन खात्याच्या डेव्हलपमेंट ऑफ आयकॉनिक टुरिस्ट सेंटर्स टू ग्लोबल स्केल योजनेंतर्गत सौंदत्तीतील श्री रेणुका यल्लम्मा देवी मंदिराचा विकास केला जाणार आहे. त्यासाठी ₹ 100 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाल्याची माहिती खासदार जगदीश शेट्टर यांनी दिली.
सौंदत्ती मंदिराच्या विकासासंदर्भात चर्चा करण्यासाठी सोमवारी बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. मंदिराचा सर्वांगीण विकास आणि भाविकांना मुलभूत सुविधा उपलब्ध देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, पर्यटन खात्याचे अधिकारी आणि मंदिर व्यवस्थापन मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत विकासाचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष विकासकामांना सुरवात होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
development of infrastructure facilities at Saundatti Yallamma temple
The Union government has sanctioned a ₹100 crore grant for the development of infrastructure facilities at Saundatti Yallamma temple and in the temple town
₹ 100 Crores To Develop Saundatti Yallamma Temple