सलमान खानच्या बॉडीगार्ड शेरा (Shera) पगार ऐकून व्हाल थक्क

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इंस्टाग्राम 1 मिलियन फोलोअर्स असलेला शेरा (Shera) सध्या खूपच चर्चेत आहे तो म्हणजे त्याच्या पगारावरून. शेरा च नाव घेतलं तर पाहिलं आठवते ती व्यक्ती म्हणजे सलमान खान. सलमान खानसंगे (Salman Khan) अगदी सावलीसारखा पाठीमागे उभा असतो शेरा. सलमानचा बॉडीगार्ड हा शेरा वर आधारित एक चित्रपट हि आला होता तो खूप फेमस झाला होता. शेरा ने एका मुलाखतीत सांगितले आहे कि त्याच्या आयुष्याचा प्रवास किती खडतर होता.

१९ मे १९६९ मध्ये अंधेरी येथे जन्म झालेल्या शेराचे (Shera) पूर्ण नाव गुरुमीत सिंग जोली आहे. शेरा लहानपणापासून सुदृढ असल्यामुळे बॉडीबिल्डिंग ची आवड निर्माण झाली. १८८७ साली त्याची ज्युनिअर मिस्टर मुंबई म्हणून निवड झाली होती आणि १८८८ साली त्याची मिस्टर महाराष्ट्र म्हणून निवड झाली होती. तो मुंबईलाच वडिलांच्या गरेज मध्ये काम करून वडिलांना हातभार लावायचा. शेरा ने पुढे जाऊन सिक्युरिटी कंपनी चालू केली. त्या कंपनीचे नाव टायगर सिक्युरिटी (Tiger Security)असे ठेवले.

सलमान खान (Salman Khan) चा छोटा भाऊ सोहेल खान (Sohel Khan) याने एकदा सलमान खान विदेशी दौर्यावर जायला निघाल्यावर शेरा (Shera) च्या कंपनीकडून सिक्युरिटी मागितले होते, त्यावेळेस शेरा ने सलमान खान ला सिक्युरिटी दिली होती. शेरा ची सिक्युरिटी आवडल्यावर सोहेल खान ने शेरा ला कायमस्वरूपी सलमान खान चा बॉडीगार्ड (Bodyguard) बनवून टाकले. तेव्हापासून शेराने सलमान ची साथ कधीच नाही सोडली. तो आता सलमान च्या कुटुंबाचा एक सदस्य झाला आहे. शेरा म्हणतो कि सलमान ने मला भावासारखे प्रेम दिले आहे त्याच्या साठी मी जीव द्यायला हि तयार आहे.

सध्या सलमान खान कडून शेरा (Shera) ला बॉडीगार्ड च्या कामासाठी वर्षाला २ कोटी रुपये मिळतात, म्हणजेच महिन्याला १६ लाख रुपये मिळतात. शेरा चे हि इंस्टाग्राम वर एखाद्या सेलिब्रिटी सारखे 1 मिलियन पेक्षा जास्त फोलोअर्स आहेत. शेरा ची सिक्युरिटी कंपनी सलमान सोबतच अनेक सेलिब्रेटी ना सुरक्षा देते. शेरा ला हि खूप अवार्ड भेटले आहेत. आरोग्य रत्न पुरस्कार, बेस्ट सिलिब्रिटी बॉडीगार्ड अवार्ड, बेस्ट सेक्युरिटी एजन्सी अवार्ड, पंजाब युथ आयकोन, दादासाहेब फाळके आयकोन अवार्ड यासारखे अवार्ड शेरा ला मिळालेले आहेत.

हे हि वाचा -  २०२४ च्या शेवटी या आठ जबरदस्त Marathi movies होणार रिलीज

Leave a Reply