परफेक्ट वर्डप्रेस पोस्ट लिहून पैसे कमवा – post on WordPress

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

how to post on WordPress याबद्दल बोलायचे झाले तर, सध्या वेबसाईट बनवणे WordPress मुळे खूपच सोप्पे झाले आहे. वेबसाईट बनविण्यासाठी इथे कोडींग शिकण्याची गरज भासत नाही. Blogging साठी WordPress हा एक लोकप्रिय प्लॅटफॉर्म मानला जातो. WordPress वरती एक चांगली वेबसाईट बनवून त्या साईट वर चांगली पोस्ट लिहिली हि साईट वरून आपण चांगले पैसे कमवू शकतो. जर तुम्हालाही wordpress वर पोस्ट कशी टाकायची (how to post on WordPress) याचा प्रश्न पडला असेल तर या लेखातून आपण त्याची माहिती घेणार आहोत.

Process of making post on WordPress

  • तुम्ही word file किंवा नोट्समध्ये लिहिलेली माहिती wordpress वर पोस्ट करण्यासाठी ती स्टेप बाय स्टेप कॉपी पेस्ट करायची असते.
  • WordPress हे एक असे सॉफ्टवेअर आहे जिथे हेडिंग, सब हेडिंग, paragraph असे विविध ऑप्शन्स वापरून तुम्ही तुमची पोस्ट आकर्षक बनवू शकता.
  • यासाठी तुम्ही तुमचे साहित्य साईटवर पेस्ट केले की तिथे येणाऱ्या बॉक्स वर क्लिक करून हेडिंग, paragraph असे पर्याय निवडू शकता.
  • H1 नावाने असलेली हेडिंग ही नेहमी आपल्या मेन टायटलला असते. सब हेडिंग टाकताना तुम्ही H2 to H6 पर्यंत पर्याय निवडू शकता.
  • यामुळे त्या त्या मुद्द्या खाली त्याची माहिती येते आणि ब्लॉग दिसायला अगदी आकर्षक आणि मुद्देसुत दिसतो. ब्लॉग जेवढा सुटसुटीत आणि मुद्देसुत असेल तेवढे वाचक जास्त आकर्षित होतात आणि यामुळे ऑरगॅनिक ट्रॅफिक वाढून तुमच्या ब्लॉगला नियमित वाचक मिळतात.
हे हि वाचा -  11,000 पेक्षा कमी किमतीत सॅमसंगने केला Samsung Galaxy F14 5G स्मार्टफोन लाँच! बघा फीचर्स.
post on WordPress
post on WordPress

ब्लॉग पोस्ट करताना की-वर्ड्सचे महत्त्व (importance of keywords)

Key words म्हणजे जे शब्द सर्च होऊन तुमचा ब्लॉग वाचकांना दिसणार आहे. उदाहरण द्यायचे झाले तर समजा तुम्ही वर्डप्रेस वर कशी पोस्ट टाकायची हे शोधत असाल तर त्यात post on WordPress हे keyword असणार आहेत. मग या शब्दांचा योग्य पद्धतीने वापर करून तुम्ही तुमची पोस्ट अधिकाधिक लोकांच्या वाचनात येईल अशी सोय करू शकता.

कीवर्डमुळे आपली पोस्ट जास्त वाचली जाईल असा समज करून घेऊन त्याचा अतिरेक मात्र करू नये. जर असे झाले तर ती पोस्ट स्कॅम होऊ शकते. कीवर्ड चा योग्य वापर करावा पण अतीही करू नये.

ब्लॉगसाठी हेडिंग लिहिण्याची पद्धत

आपण सगळा कंटेंट म्हणजेच सगळी माहिती तर पटकन गोळा करून लिहितो पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो तो हेडिंगचा! हेडिंग लिहिताना काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर हेडिंग आकर्षक होतेच आणि ब्लॉग जास्तीत जास्त सर्च देखील होतो.

हेडिंग लिहिताना खालील गोष्टींची काळजी घ्यावी

  • हेडिंग मध्ये आपला फोकस कीवर्ड आला पाहिजे.
  • आता आपण ज्या विषयावर लिहीत आहोत त्याचा कीवर्ड नक्की काय हे शोधण्यासाठी गूगलवर त्या संबंधी सर्च करावे.
  • येणाऱ्या रिझल्ट मधून जे suggestions दिसतात त्यातून आपण कीवर्ड ठरवू शकतो.
  • कीवर्ड मिळाले की त्याला अनुसरून आकर्षक हेडिंग लिहावी.
  • हेडिंगमध्ये जे इंग्लिश शब्द वापरले जातात त्याच्या सर्व शब्दांचे पहिले अक्षर कॅपिटल ठेवा.
  • शक्य असल्यास हेडिंग मध्ये आकड्यांच्या वापर करा. जसे:- Top 5, Below 4 lakhs किंवा चालू वर्षाचा अंक इत्यादी.

जर या गोष्टींची काळजी घेऊन हेडिंग लिहिली तर ब्लॉग लवकरात लवकर टॉप रँकिंग मध्ये येण्याची शक्यता असते.

ब्लॉग मधील मुख्य कंटेंट लिहिण्याची पद्धत

हेडिंग मध्ये जसे आपण कीवर्ड वापरतो तसेच मुख्य कंटेंट मध्येही ते समाविष्ट केले पाहिजेत.

हे हि वाचा -  पावसाळा चालू झालाय water proof मोबाईल घ्यायचाय हाच बेस्ट ऑप्शन -  OPPO F27 PRO+ 5G

मुख्य कंटेंट लिहिताना घ्यायची काळजी

  • कंटेंट लिहिताना आपण चुकीची माहिती लिहीत नाहीये याची काळजी घ्या.
  • उगाच कुठेही लिहायचे म्हणून कीवर्ड वापरू नका.
  • हेडिंग आणि विषयाला अनुसरून मजकूर लिहा.
  • माहिती लिहिताना सुटसुटीत आणि सोप्या भाषेत लिहा.
  • शब्द संख्या फार कमी ठेवू नका.
  • गरज असल्यास table (तक्ता) बनवून सांख्यिकी माहिती मांडा यामुळे लवकर आणि महत्त्वाची माहिती वाचकांपर्यंत पोहोचते.
Video Credit – Satish K Videos EXTRA (post on wordpress)

WordPress मध्ये इमेज add करणे

सर्व लिहून झाले तरीही आपला ब्लॉग फोटो शिवाय अपूर्ण असतो. WordPress मध्ये फोटो add करण्यासाठी उजव्या बाजूला असलेल्या इमेज ऑप्शन मधून फोटो अपलोड करा. इमेजवर आपला फोकस कीवर्ड लिहिलेला असेल याची काळजी घ्या.

इमेज घेताना घ्यायची काळजी (Post On WordPress )

  • इमेज कोणत्याही इतर कंटेंट creator website वरुन घेऊ नका.
  • ऑफिशियल साईट किंवा फ्री इमेज साईट वरून घेतलेल्या फोटोवर कीवर्ड येतील असे हेडिंग टाका.
  • जर कोणत्या ऑफिशियल साईट वरून फोटो घेतला असेल तर त्या फोटोला इमेज क्रेडिट द्या.

SEO साठी करण्याच्या काही महत्त्वाच्या गोष्टी

  • ब्लॉग लिहून झाल्यावर उजव्या बाजूला स्कोअर दिसत असलेला एक ऑप्शन असतो ज्याला Rankmath म्हणतात त्यावर क्लिक करा.
  • इथे क्लिक केल्यावर SEO चेक लिस्ट दिसेल.
  • त्या लिस्ट नुसार सगळे काही केले आहे का पाहा.
  • जशी जशी हिरव्या रंगाची टिक मार्क येत जाईल तसा तसा rankmath स्कोअर वाढत जाईल.
  • यात इंटर्नल लिंक, external link टाकायचे काही पर्याय असतात ते अवश्य टाका.
  • Snippet, permalink, Description याठिकाणी कीवर्ड आला पाहिजे हे लक्षात ठेवा.

अश्या पद्धतीने सर्व काही तपासून झाल्यावर जर तुमच्या विषयाला अनुसरून FAQ असतील तर ते अवश्य ब्लॉगच्या शेवटी टाका.

1 thought on “परफेक्ट वर्डप्रेस पोस्ट लिहून पैसे कमवा – post on WordPress”

Leave a Reply