भयानक दुष्काळ, लोकांना खायला अन्न नाही म्हणून Namibia देशात घेतला सर्व वन्यप्राणी मारण्याचा निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाला असणाऱ्या Namibia देशात भयंकर दुष्काळ ओढावला आहे. हा भाग दुष्काळ प्रवण म्हणूनच ओळखला जातो पण यावेळी पडलेला हा दुष्काळ गेल्या शंभर वर्षातील सर्वात मोठा दुष्काळ असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वीही नामिबियात दुष्काळ पडला आहे. २०१३, २०१६ आणि २०१९ सालचा दुष्काळ देखील असाच मोठा होता पण यंदा पडलेला हा दुष्काळ त्याहीपेक्षा अधिक व्यापक आणि भीषण आहे.

एक वर्षापासून झाली दुष्काळला सुरुवात

या भागात दुष्काळाची सुरुवात २०२३ मधील ऑक्टोबर महिन्यापासूनच झाली आहे. बोटस्वाना, त्यांनतर अँगोला, झांबिया, झिंबामवे आणि नामिबिया या देशांत दुष्काळ पडला आहे. एल निनोच्या प्रभावामुळे म्हणजेच एल निनोमुळे या भागातील वातावरणात अधिक कोरडे आणि उष्ण वारे वाहत आहेत त्याचाच परिणाम दुष्काळात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रभावामुळे दरवर्षी पडणाऱ्या पावसाच्या निम्मा पाऊसच पडल्यामुळे ही स्थिती ओढवली आहे.

पावसाअभावी लोकांना खायला यांना मिळेना

भयानक दुष्काळामुळे शेतातील पिके करपून गेली आहेत. या भीषण दुष्काळामुळे या देशातील नागरिकांना तसेच पाळीव प्राण्यांना खायला अन्नच मिळत नाहीये. याचा परिमाण म्हणजेच येथील असंख्य पाळीव प्राणी अन्न पाण्यावाचून तडफडून दगावली आहेत.

लोकांचीही ही दशा होऊ नये म्हणून या देशातील सरकारने आपला मोर्चा वन्य प्राण्यांकडे वळवला आहे. देशातील नागरिकांचे पोट भरण्यासाठी या वन्य प्राण्यांची कत्तल करण्याचा निर्णय येथील सरकारने घेतला आहे. बरं हा आकडाही तब्बल ७२३ असा आहे.

या शतकातील सगळ्यात मोठ्या दुष्काळाला तोंड देण्यासाठी आणि १४ कोटी जनतेचे पोट भरण्यासाठी हा प्राण्यांच्या कत्तलीचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे अन्न आणि पाण्यासाठी होणारा संघर्ष काही प्रमाणात कमी करता येईल आणि प्राण्यांच्या मांसाने लोकांचे पोट भरता येईल असा त्या मागचा हेतू आहे.

हे हि वाचा -  आनंदाची बातमी, लाल परीचा संप मिटला - ST Bus strike

एवढ्या वन्य प्राण्यांची कत्तल करण्यास परवानगी

या कत्तल करण्यात येणाऱ्या प्राण्यांच्या यादीत ३० पाणघोडे, ६० म्हंशी, १०० रानगवे, ५० इम्पाला, ८३ हत्ती, ३०० झेब्रा तर १०० वन गायींचा समावेश आहे. आत्तापर्यंत जवळजवळ १५० प्राण्यांची कत्तल करून येथील सरकारने लोकांना ६३ टन मांस उपलब्ध करून दिले आहे.

Namibia सरकार चा निर्णय

या सर्वांवर भाष्य करताना Namibia मधील पर्यावरण मंत्रालयाने असे सांगितले आहे की, मांसाच्या हेतूने केलेली ही कत्तल आमच्यासाठी गरजेची आहे. हे आमच्या संविधानाला धरून आहे. संविधानानुसार येथील नैसर्गिक साधनसंपत्तीवर सगळ्यात पहिला हक्क येथील नागरिकांचा आहे.

या संदर्भात अनेक गोष्टी सध्या जगभरातील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता यात अनंत अंबानी यांनी हस्तक्षेप करून नामिबियाला मदत करण्यासाठी तोडगा काढला आहे.

अनंत अंबानी यांनी घेतला Namibia मधील वन्य प्राणी वाचवण्यासाठी मोठा निर्णय

Namibia मधील ही भीषण परिस्थिती पाहून आणि तेथील वन्यजीवांना असलेला धोका पाहून अनंत अंबानी यांच्या वनतारा फाउंडेशनने नामिबिया सरकारला मदत देऊ केली आहे. गुजरातमध्ये स्थित असलेल्या आणि असुरक्षित प्राण्यांच्या प्रजातीचे संवर्धन करणाऱ्या या फाउंडेशनने काही पावले उचलली आहेत.

Namibia सरकारला लिहिलेल्या पत्रात वनतारा फाउंडेशनने या कत्तल होणाऱ्या प्राण्यांविषयी चिंता व्यक्त केली आहे. या पत्रात लिहिले आहे की, “वनतारा माध्यमातून आमचा हेतू हाच आहे की, कोणत्याही परिस्थितीवर मात करून प्राण्यांचे जीवन आणि त्यांचे हक्क अबाधित ठेवता आले पाहिजेत.”

वनताराने यासाठी प्राण्यांची आजीवन काळजी घेण्याची किंवा तात्पुरते स्थलांतर करून प्राण्यांना आश्रय देण्याची ऑफर दिली आहे. ज्या प्राण्यांच्या प्रजातींना धोका आहे अश्या प्राण्यांचे पुनर्वसन आणि बचाव हा वनतारा फाउंडेशनच्या उपक्रमाचा एक भागच आहे. वनताराने प्राण्यांच्या रक्षणासाठी प्रस्तावित प्रस्तावावर विचार करण्याचे आवाहन केले आहे.

नामिबियाला गंभीर संकटाला तोंड द्यावे लागत असताना वनताराचा प्रसार जगातील सर्वाधिक धोकादायक प्रजातींच्या रक्षणासाठी केलेल्या लढ्यात जागतिक एकतेचे प्रतिनिधित्व करत आहे.

हे हि वाचा -  जगातील सर्वाधिक वायू प्रदूषण असलेले शहरांच्या यादीत पहिल्या ५० मध्ये भारतातील ४२ शहरे (most air-polluted cities)

वनतारा फाउंडेशन कुणाचे

वनतारा हा अनंत अंबानी यांचा उपक्रम असून जंगली प्राण्यांची सुटका करणे, त्यांचे पुनर्वसन करणे आणि उपचार करणे यासाठी याची स्थापना झाली आहे. हे फक्त भारतात नाही तर जगातील इतर देशात देखील कार्यरत आहे. हे जामनगर येथील रिफायनरी कॉम्प्लेक्स मध्ये असलेल्या ३००० एकरच्या हरित पट्टयात निर्माण केले गेले आहे. यात जंगलाप्रमाणे निर्मिती करण्यात आली आहे जेणेकरून प्राण्यांना ते ते वातावरण अनुभवता येईल.

गेल्या काही वर्षात या फाउंडेशन मार्फत अनेक पक्षी, सरपटणारे प्राणी, २०० हून अधिक हत्ती वाचवण्यात आले असून आता मगरी, गेंडे, चित्ते असे प्राणीही वाचवण्यात येत आहेत. या संस्थेअंतर्गत मेक्सिको आणि व्हेनेझुएलामध्येही बचाव मोहीम राबवण्यात येत आहे.

Leave a Reply