मोटो चा Moto G45 हा स्मार्टफोन होणार आहे भारतात या तारखेला लाँच,बघा यातील जबरदस्त फीचर्स

By Pravin Wandekar

Published on:

Moto G45
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

थोडक्यात(About Moto G45 Launch)

  • Moto G 45 हा स्मार्टफोन 21 ऑगस्ट ला भारतात लाँच होणार आहे.
  • Moto G 45 या स्मार्टफोन मध्ये 5000 mAh ची बॅटरी असणार आहे.
  • हा स्मार्टफोन Brilliant Green, Viva Magenta, and Brilliant Blue या कलर मध्ये लाँच होणार आहे.

Moto G45 India Launch:प्रसिद्ध स्मार्टफोन उत्पादक कंपनी मोटोरोलाचा नवीन बजेट स्मार्टफोन, Moto G 45, भारतात फ्लिपकार्टच्या माध्यमातून लॉन्च होणार आहे.तसेच ई-कॉमर्स वेबसाइटने केवळ लॉन्च डेटच नाही, तर फोनच्या डिझाइन, रंग आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल माहिती उघड केली आहे. त्याचबरोबर, G45 च्या विविध रंगांच्या आणि डिझाइनचे फोटोज देखील देण्यात आलेले आहे, ज्यामुळे फोनच्या विविध कोनातून दिसणाऱ्या फोटोंची माहिती मिळते. या स्मार्टफोन मध्ये Snapdragon 6s Gen 3 SoC हे प्रोसेसर वापरलेले आहे. व यामध्ये 50MP मेन कॅमेरा असणार आहे. चला तर मग या कमी बजेट मधील स्मार्टफोनमध्ये काय स्पेसिफिकेशन्स आहे ते पाहूया.

Moto G45 Specifications

  • moto g45 design : या स्मार्टफोन च्या डिझाइन आणि रंगांची माहिती फ्लिपकार्टच्या पृष्ठावर उपलब्ध आहे. त्यामध्ये या स्मार्टफोनचे तीन रंग दाखवले आहेत,ज्यामध्ये ब्रिलियंट ग्रीन, विवा मॅजेंटा, आणि ब्रिलियंट ब्लू हे आहेत. याच रंगांचे फोटो सध्या लीक झालेले आहेत. Moto G 45 स्मार्टफोनला व्हेगन लेदर फिनिश असेल. तसेच तसेच फोनच्या मागील पॅनलवर दोन रियर कॅमेरे थोड्या उचललेल्या भागावर बसवलेले आहेत. फोनच्या बाजू सपाट आहेत आणि त्या कडय़ावर थोड्याशा गोलसर आहेत.
  • moto g45 processor : Qualcomm च्या Snapdragon 6s Gen 3 प्रोसेसरचा वापर करण्यात आलेला आहे, जो फोनला खूप जलद आणि कार्यक्षम 5G कनेक्टिव्हिटी देतो. तसेच हा प्रोसेसर नवीनतम 5G टेकनॉलॉजि ला समर्थन देतो. आणि हा स्मार्टफोन नवीन मल्टीटास्किंग आणि गेमिंग अनुभवासाठी डिझाइन केलेला आहे, त्यामुळे उच्च गती मिळते.
  • moto g45 memory : G45 मध्ये 8GB RAM आणि 128GB स्टोरेजसह उपलब्ध आहे.व यामध्ये 8GB RAM दिलेली आहे, त्यामुळं स्मार्टफोन मध्ये वेगवेगळे अँप्स गेमिंग आणि इतर कामे सहजपणे करता येतील, तसेच यामुळे मोबाईल अतिशय स्मूथपने चालतो. तसेच तुम्हाला यामध्ये 128GB स्टोरेज मिळणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात फाइल्स, अँप्स , आणि डेटा साठवण्याची सुविधा मिळणार आहे.
  • moto g45 display : या फोनमध्ये 6.5-इंचाचा 120Hz डिस्प्ले दिलेला आहे, जो एक चांगला आणि फ्लुइड अनुभवदेतो, विशेषत गेमिंग आणि व्हिडिओ पाहताना या चा उत्तम अनुभव भेटतो. तसेच Gorilla Glass 3 संरक्षणासह हा डिस्प्ले टिकाऊ आहे आणि यामध्ये पंच-होल कटआउटचा वापर स्क्रीनवरील कॅमेरा साठी केला गेला आहे, त्यामुळे पूर्ण स्क्रीनचा अनुभव मिळतो.
  • moto g45 camera : G45 च्या मागील कॅमेरा सेटअपमध्ये 50MP क्वाडपिक्सल मुख्य कॅमेरा दिलेला आहे, जो उच्च रिजोल्यूशनसह स्पष्ट फोटोज घेतो. तसेच यामध्ये 2MP डेप्थ सेंसर पोर्ट्रेट मोडमध्ये बॅकग्राउंड ब्लर करण्यास दिलेले आहे, ज्यामुळे फोटो अधिक आकर्षक आणि प्रोफेशनल दिसतात.
  • moto g45 battery: हा फोन 5,000mAh बॅटरीसह येणार आहे, जी दीर्घकाळ टिकणारी बॅटरी आहे. यामुळे तुम्हाला एक पूर्ण दिवस फोनचा वापर करता येईल, आणि अत्यधिक वापराच्या परिस्थितीतही फोन दीर्घकाळ चालू राहील.
  • moto g45 bother future : G45 मध्ये Dolby Atmos, Hi-Fi Audio, आणि Smart Connect यासारखी अतिरिक्त वैशिष्ट्ये आहेत, ज्यामुळे उत्कृष्ट ऑडियो अनुभव मिळतो आणि इतर स्मार्ट डिवाईज सहज कनेक्ट होणे शक्य होते. साइड-माउंटेड फिंगरप्रिंट रीडर आणि फेस अनलॉक सुविधा सुरक्षित लॉगिनसाठी यामध्ये दिलेली आहे.

Moto G45 Launch Date In India

भारतात 21 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता लाँच होईल. हा फोन Flipkart, Motorola.in आणि इतर रिटेल आउटलेट्सवर उपलब्ध असेल. तर Flipkart वर G45 साठी एक विशेष मायक्रोसाइट तयार करण्यात आलेली आहे, ज्यावर फोनची सर्व माहिती दिली आहे. या मायक्रोसाइटवर फोनच्या वैशिष्ट्यांची आणि फिचर्सची माहिती पाहता येईल.


FAQ

Moto G 45 भारतात कधी लॉन्च होणार आहे ?

भारतात 21 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता लॉन्च होणार आहे .

Moto G 45 ची किंमत किती असेल?

Smartprix Website च्या माहितीनुसार, Moto G 45 ची भारतात अंदाजे किंमत ₹15,000 असू शकते.तसेच अंतिम किंमत लॉन्चनंतर स्पष्ट होईल.

Moto G 45 मध्ये किती mAh बॅटरी असणार आहे?

Moto G 45 मध्ये 5,000mAh ची बॅटरी असणार आहे, जी दीर्घकालिक बॅटरी लाइफ प्रदान करेल.

Moto G 45 खरेदी साठी कुठे उपलब्ध होईल?

Moto G 45 खरेदी साठी Flipkart, Motorola.in आणि इतर रिटेल आउटलेट्सवर उपलब्ध होईल

Moto G 45 मध्ये किती मेगापिक्सल चे कॅमेराज आहेत ?

Moto G 45 मध्ये 50MP क्वाडपिक्सल मुख्य कॅमेरा आणि 2MP डेप्थ सेंसर असतील, जे उत्कृष्ट फोटो आणि पोर्ट्रेट मोडसाठी उपयुक्त असतील.

1 thought on “मोटो चा Moto G45 हा स्मार्टफोन होणार आहे भारतात या तारखेला लाँच,बघा यातील जबरदस्त फीचर्स”

Leave a Reply